169. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 डिसेंबरला साजरा करण्यात येणाऱ्या 'शेतकरी दिवसाच्या' पार्श्वभूमीवर सदरील लेखातून "भारतातील शेतकऱ्यांच्या स्थितीविषयक" काही महत्वपूर्ण बाबी समजून घेऊया...

सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) मध्ये 16 ते 18 टक्के हिस्सा शेती क्षेत्राचा आहे. ग्रामीण भागातील जवळ-जवळ 70% लोकसमुह शेतीवर अवलंबून आहे. देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले दिसत नाही. 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)' च्या 2023 च्या आकडेवारीनुसार, देशात 10,786 शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नोंदी मिळतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात 'महाराष्ट्र (38.5%)' आणि 'कर्नाटक (22.5%)' ही दोन राज्ये आघाडीवर आहेत.

बाजार समितीतल्या दलालांकडून होणारी पिळवणूक, बँकद्वारे कर्ज देण्यात दिरंगाई, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांमधील महागाई, कर्जबाजारीपणा इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्याच्या वाटेला अनेक समस्या आलेल्या दिसतात.

या समस्यांच्या सोडवणुकीसाठी शेतकऱ्यांना पिके, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, खते, बी-बियाणे याबद्दल पुरेशी माहिती करून द्यावी लागेल. केंद्र आणि राज्य सरकारद्वारे शेतकरी हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. या 'योजनांची यादी' या लेखासोबतच उपलब्ध करून देत आहे.

यापूर्वीही लेख क्र. 3/4, 14/3, 15/4, 21/3 आणि 35/4 मध्ये शेती आणि शेतकऱ्यांविषयक मी लेख प्रकाशित केले आहेत. वाचकांनी त्याचाही आढावा जरूर घ्यावा..!

~ सचिन विलास बोर्डे

39/3

Farmers | Farming | Issues of Farmers & Agriculture | Economics | Food Security | Agriculture | Reforms in Agriculture | Agriculture Sector | Schemes & Policies | Indian Economy | GDP | Corruption | National Crime Records Bureau | NCRB | Suicides


Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!