182. विकासाच्या वाटेवरील भारत!
हल्ली इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण अशा भारताच्या विविध आयामांना चित्रपटांतून समजून घेणं अनेकांना सोईचं झालं आहे. "चित्रपटांतून तथ्ये (Facts) समजून घेणं" कुठवर सोईस्कर ठरतं हेच आजच्या लेखातून समजून घेऊयात...
भारताविषयक विविध आयाम पुस्तकांतून समजणे अनेकांना डोईजड जाते. परिणामी चित्रपटांतून मनोरंजनात्मक दृश्यांच्या अन् संभाषणाच्या साहाय्याने या आयामांचे 'मनोरंजनात्मक विश्लेषण (Entertaining Analysis)' सादर केले जाते. चित्रपटातली दृश्ये डोळ्यांना अन् चित्रपटातली संभाषणे मनाला मनमोहक वाटतात. यामुळे पुस्तकांऐवजी चित्रपटांकडे जनतेचा कल वाढलेला दिसतो.
मात्र अलीकडच्या काही काळांपासून चित्रपट निर्मितीत 'नफा' हा केंद्रबिंदू असल्याने चित्रपटांचे विषय, चित्रपटांची कथा, चित्रपटातले अभिनेते नफ्याला केंद्रस्थानी ठेऊन ठरविले जातात. परिणामी 'चित्रपटांत दर्शविलेल्या सर्वच बाबींत तथ्यांश असत नाही.' अनेकदा तथ्यावर आधारित चित्रपटांतही मनोरंजनाच्या (Entertainment) अथवा इतर हेतूने काही बाबी नव्याने घातल्या जातात किंवा काढून टाकल्या जातात. परिणामी चित्रपटातील तथ्यांची आपण 'पुन्हा पडताळणी (Cross-Check)' करने गरजेचे असते.
यासाठी " चित्रपटांच्या तीन मोजपट्ट्यांचा (Three Scales of Cinema)" चा आधार घेता येईल.
पहिली मोजपट्टी पंचवीस-पंच्याहत्तरची (25-75) -
यात 25% तथ्ये आणि 75% मनोरंजन असलेले चित्रपट वर्गीकृत करता येतील.
दुसरी मोजपट्टी पन्नास-पन्नासची (50-50) -
यात 50% तथ्ये आणि 50% मनोरंजन असलेले चित्रपट वर्गीकृत करता येतील.
तिसरी मोजपट्टी पंच्याहत्तर-पंचवीसची (75-25) -
यात 75% तथ्ये आणि 25% मनोरंजन असलेले चित्रपट वर्गीकृत करता येतील.
कोणता चित्रपट किती तथ्य-सत्य मांडतो हे दर्शकांना समजण्याकरिता उपरोल्लेखित मोजपट्टया आवश्यक ठरतील. या मोजपट्ट्यांच्या साहाय्यानेच 'तथ्यपट' आणि 'मसालापट' यातला भेद करणे शक्य होईल. या आकलनातूनच मी 'चित्रपटांच्या तीन मोजपट्ट्यांची अथवा Three Scales of Cinema' ची मांडणी सदरील लेखातून विश्लेषित करीत आहे..!
~ सचिन विलास बोर्डे
42/4
Film | Movies | Cinema | Entertaining Analysis | Entertainment | Media Literacy | Cinema Vs Reality | Three Scales of Cinema | Awareness
NEXT 🔹 PREVIOUS
Comments
Post a Comment