168. विकासाच्या वाटेवरील भारत!
"HIV अन् AIDS" बाबत जनजागृती व्हावी याकरिता सदरील लेख प्रकाशित करीत आहे.
विविध माध्यमातून एचआयव्ही चा विषाणूसंसर्ग शरीरात पसरतो. फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा यासह विविध अवयवांना नुकसान पोहोचवतो, तेव्हा या स्थितीला आपण एड्स म्हणू शकतो!
भारताची स्थिती -
'राष्ट्रीय एड्स नियंत्रण (NACO)' संस्थेच्या 'India HIV Estimations 2024-25' नुसार भारतात HIV बाधितांची संख्या 25.61 लाख आहे. यातील 18.60 लाख बाधितांवर अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) चा उपचार सुरू आहे. नवीन एचआयव्ही संसर्गाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 2010 च्या तुलनेत 48.7% ने घट झालेली दिसते. तसेच 2010 च्या तुलनेत एड्स संबंधित मृत्यूंमध्ये 81.4% टक्क्यांची घट नोंदवली गेलेली आहे.
सर्वाधिक HIV बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र (3.99 लाख), आंध्र प्रदेश (3.10 लाख), कर्नाटक (2.91 लाख) ही राज्ये आघाडीवर आहेत. मिझोरम आणि नागालँड या दोन राज्यांत HIV प्रसाराचा दर 1 टक्क्यापेक्षा जास्त नोंदविण्यात आला आहे.
उपाययोजना -
'राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO), राज्य पातळीवर एड्स नियंत्रण संस्था (SACS), राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP)' ह्या सरकारी योजना/आस्थापना याविषयीची दखल घेतच असतात. सोबतच उपरोक्त उल्लेख केलेल्या राज्यांकडे विशेष लक्ष पुरवावे लागणार आहे.
योग्य उपचार (अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी -ART), कंडोम चा वापर तसेच याविषयीची जनजागृती, सोबतच खाजगी आस्थापनाद्वारे उचलेली पाऊले यातून एड्सची स्थिती आटोक्यात आणणे सुलभ होईल.
नागरिकांनीही 'माझे आरोग्य-माझा हक्क अन्
माझी सुरक्षा-माझी जबाबदारी' या सूत्राचे पालन करायलाच हवे. जेणेकरून एचआयव्ही/एड्स ला 2030 पर्यंत नियंत्रित करण्याकडे भारताची वाटचाल गतिमान होईल..!
~ सचिन विलास बोर्डे
39/2
Acquired Immune Deficiency Syndrome-AIDS | Human Immunodeficiency Virus-HIV | EndAIDS | AIDS | HIV | Antiretroviral Therapy - ART | NACO | SACS | NACP | Awareness | Health | Maharashtra | Andhra Pradesh | Karnataka | Mizoram | Nagaland
Comments
Post a Comment