Posts

Showing posts with the label Suicides In India

169. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 डिसेंबरला साजरा करण्यात येणाऱ्या ' शेतकरी दिवसाच्या ' पार्श्वभूमीवर सदरील लेखातून " भारतातील शेतकऱ्यांच्या स्थितीविषयक " काही महत्वपूर्ण बाबी समजून घेऊया... सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) मध्ये 16 ते 18 टक्के हिस्सा शेती क्षेत्राचा आहे. ग्रामीण भागातील जवळ-जवळ 70% लोकसमुह शेतीवर अवलंबून आहे. देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले दिसत नाही. ' नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ' च्या 2023 च्या आकडेवारीनुसार, देशात 10,786 शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नोंदी मिळतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात ' महाराष्ट्र (38.5%) ' आणि ' कर्नाटक (22.5%) ' ही दोन राज्ये आघाडीवर आहेत. बाजार समितीतल्या दलालांकडून होणारी पिळवणूक, बँकद्वारे कर्ज देण्यात दिरंगाई, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांमधील महागाई, कर्जबाजारीपणा इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्याच्या वाटेला अनेक समस्या आलेल्या दिसतात. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी शेतकऱ्यांना पिके, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, खते, बी-बियाणे याबद्दल पुरेशी माहिती करून द्यावी लागेल. केंद्र आणि राज्य...

127. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या या स्पर्धात्मक युगात मानवाच्या जीवनात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसतेय. हेच नैराश्य डोईजड झालं की अनेकजण " आत्महत्येचा वैफल्य मार्ग " स्वीकारताना दिसताय. "भारताची स्थिती" - 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'च्या (NCRB) वार्षिक अहवालानुसार, 2022 मध्ये 1.7 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 4.2 टक्क्यांनी आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ झालेली दिसते. या जुन्या आकडेवारीवरून सध्याच्या परिस्थितीचे आकलन करता येईल. गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेम-प्रकरणे, कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या अशा काही कारणांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे दिसते. अलीकडे तर काहींनी आत्महत्या करण्यापूर्वी आपण आत्महत्या का करतोय?, आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण?, याचे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केलेत. मात्र यामुळे तरुणांमध्ये चुकीचा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता दिसतेय. ' आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात ' हीच बाब मला या अनुषंगाने नमूद करावीशी वाटतेय. "उपाययोजना...

116. विकासाच्या वाटेवरील भारत!

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचे वृत्त नेहमीच कानावर पडते. अलीकडेच ' पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या ' केल्याचं वृत्त वाचनात आलं. बेंगळुरूतील " अतुल सुभाष " या 34 वर्षीय अभियंत्याने 24 पानी सुसाईड नोटमध्ये आणि दीड तासाच्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे पत्नी, पत्नीचे नातेवाईक आणि उत्तर प्रदेशातील एका न्यायाधीशाने केलेल्या छळामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं स्पष्ट केलंय. ' वैवाहिक वादामुळे ' त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर अनेक ' खोटे गुन्हे ' दाखल केलेत तसेच सेटलमेंट साठी 3 कोटी रुपयांची मागणी पत्नीने केल्याचंही त्यांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केलंय. या संपूर्ण प्रकरणामुळे स्त्रीविषयक कायदे तथा नियमांचा होणारा गैरवापर आणि कायद्यामध्ये पुरुषांकडे होणारे दुर्लक्ष या दोन बाबी चर्चेचा विषय बनल्या आहेत.  भारतातील स्त्रियांसाठी काही विशेष तरतुदी/कायदे राज्यसंस्थेने पारित केले आहेत. स्त्रिया सक्षम व्हाव्यात ही यामागील भूमिका. या तरतुदींचा स्वहितासाठी गैरवापर व्हायला नको. स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक छळाची प्रकरणे साधारणपणे तातडीने ...

12. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या स्पर्धात्मक युगात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसते. अन् यातून तरुण आत्महत्येचा वैफल्य मार्ग स्वीकारतो. याचे विविध मासले पहावयास मिळतात. या समस्येचे आकलन करून विविध सरकारी तथा गैर सरकारी आस्थापना आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करत असतात. "भारताची स्थिती" - ' नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो 'च्या (एनसीआरबी) वार्षिक अहवालानुसार, 2021 मध्ये 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 'राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरणाच्या' अहवालानुसार, 2020 ची आकडेवारी लक्षात घेता एकंदरीत आत्महत्यांच्या प्रकरणामध्ये 71% पुरुष तर 29% महिलांचा समावेश आहे.  65% आत्महत्या 18-45 वयोगटातील आहेत. गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेमप्रकरण, लग्नाशी संबंधित समस्या तथा इतर काही कारणांमुळे अनेकांनी आपले जीवित संपविलेले दिसते. "उपाययोजना" -   'मानसिक आरोग्य कार्यक्रमाची' आखणी करणे, शैक्षणिक स्तरावर मानसिक स्वास्थ्यासाठी अभ्यासक्रम सुरू करणे, समाज प्रबोधन, ‘ नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम ’, ‘ नॅशनल पॅलिएटिव्ह केअर ...