Posts

Showing posts with the label DEC25

170. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..! वर्षाची सुरुवात आपण अनेक ध्येय-धोरणे समोर ठेऊन करीत असतो. वर्षभरात आपल्याला ती गाठायची असतात. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आपण वर्षभरात पार पाडलेल्या कार्यांची पडताळणी करतो. याच अनुषंगाने आपण या वर्षात सादर केलेल्या विविध विषयांच्या लेखासंदर्भातील वर्षभराचा आढावा घेऊया... शिक्षण क्षेत्रातील गुण-दोष, विद्यार्थ्यांच्या समस्या, परीक्षांतील गैरप्रकार, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, निवडणुकांविषयक गैरप्रकार, दहशतवाद, नक्षलवाद, पर्यावरणीय समस्या, आरोग्य विषयक समस्या, शेतकरी-कामगारांच्या समस्या, महिलांवरील अन्याय-अत्याचार, घरगुती हिंसाचार, गुन्हेगारी, आत्महत्या अशा अनेक समस्यांचे आकलन तसेच यावरील उपाय-योजनांची चर्चा आपण केली. सोशल मीडियाचे गुण-दोष, शेतीव्यवस्थेचे विश्लेषण, वनांचे महत्व, भारतीय राज्यघटनेचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य प्रवास इत्यादी बाबी अगदी सोप्या भाषेत वाचकांसमोर मी प्रस्तुत केल्या. गाडगे बाबा, तुकोबा, नामदेव यांसारख्या संतांच्या शिकवणीही आपण थोडक्यात समजून घेतल्या. अमेरिका, पाकिस्तान इत्यादी देशांच्या राजकारणाचा भारतावर पडणारा प्रभाव देखील आपण जाणून घेतला. आ...

169. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 डिसेंबरला साजरा करण्यात येणाऱ्या ' शेतकरी दिवसाच्या ' पार्श्वभूमीवर सदरील लेखातून " भारतातील शेतकऱ्यांच्या स्थितीविषयक " काही महत्वपूर्ण बाबी समजून घेऊया... सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) मध्ये 16 ते 18 टक्के हिस्सा शेती क्षेत्राचा आहे. ग्रामीण भागातील जवळ-जवळ 70% लोकसमुह शेतीवर अवलंबून आहे. देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले दिसत नाही. ' नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ' च्या 2023 च्या आकडेवारीनुसार, देशात 10,786 शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या नोंदी मिळतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात ' महाराष्ट्र (38.5%) ' आणि ' कर्नाटक (22.5%) ' ही दोन राज्ये आघाडीवर आहेत. बाजार समितीतल्या दलालांकडून होणारी पिळवणूक, बँकद्वारे कर्ज देण्यात दिरंगाई, खते, बी-बियाणे, कीटकनाशके यांमधील महागाई, कर्जबाजारीपणा इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्याच्या वाटेला अनेक समस्या आलेल्या दिसतात. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी शेतकऱ्यांना पिके, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, खते, बी-बियाणे याबद्दल पुरेशी माहिती करून द्यावी लागेल. केंद्र आणि राज्य...

168. विकासाच्या वाटेवरील भारत!

" HIV अन् AIDS " बाबत जनजागृती व्हावी याकरिता सदरील लेख प्रकाशित करीत आहे. विविध माध्यमातून एचआयव्ही चा विषाणूसंसर्ग शरीरात पसरतो. फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा यासह विविध अवयवांना नुकसान पोहोचवतो, तेव्हा या स्थितीला आपण एड्स म्हणू शकतो! भारताची स्थिती - ' राष्ट्रीय एड्स नियंत्रण (NACO) ' संस्थेच्या 'India HIV Estimations 2024-25' नुसार भारतात HIV बाधितांची संख्या 25.61 लाख आहे. यातील 18.60 लाख बाधितांवर अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (ART) चा उपचार सुरू आहे. नवीन एचआयव्ही संसर्गाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 2010 च्या तुलनेत 48.7% ने घट झालेली दिसते. तसेच 2010 च्या तुलनेत एड्स संबंधित मृत्यूंमध्ये 81.4% टक्क्यांची घट नोंदवली गेलेली आहे. सर्वाधिक HIV बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र (3.99 लाख) , आंध्र प्रदेश (3.10 लाख) , कर्नाटक (2.91 लाख) ही राज्ये आघाडीवर आहेत. मिझोरम आणि नागालँड या दोन राज्यांत HIV प्रसाराचा दर 1 टक्क्यापेक्षा जास्त नोंदविण्यात आला आहे. उपाययोजना -  'राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था ( NACO ), राज्य पातळीवर एड्स नि...

167. विकासाच्या वाटेवरील भारत!

लेख क्र. 38/2 मध्ये ' स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ' निवडणुकांचे महत्व आपण समजून घेतले होते. त्यानंतर दोन डिसेंबरला महाराष्ट्र राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुका कशा पार पडल्या याची चाचपणी आजच्या लेखातून करूया... ' मतदारांना पैशांचे वाटप, दुबार मतदार, आचारसंहितेचे उल्लंघन, हाणामारी, मतदान यंत्रात बिघाड, मतदान यंत्रांची तोडफोड ' अशा वातावरणात लोकशाहीचा गाभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. मतदारांना मतदान केंद्राचा तपशील, तसेच आपल्या प्रभागातील अधिकृत उमेदवारांचा तपशील वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे जराही कष्ट राज्य निवडणूक आयोगाने घेतले नाही. या निवडणुका केवळ देखाव्यासाठी घेतल्या गेल्या असे प्रश्नचिन्ह उभे केले जाताय. या निवडणुकांसंदर्भातील ' माझा व्ययक्तिक अनुभव ' मी याठिकाणी नमूद करीत आहे. आमच्याकडे ऐनवेळेवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने नवीन मतदान यंत्रे सुरू केली गेली. मतदान झाल्यावर तातडीने बोटाची शाई पुसणारे दुबार मतदार दिसले. अशिक्षित, वृद्ध, दिव्यांग व्यक्तींना ...