170. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..!

वर्षाची सुरुवात आपण अनेक ध्येय-धोरणे समोर ठेऊन करीत असतो. वर्षभरात आपल्याला ती गाठायची असतात. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात आपण वर्षभरात पार पाडलेल्या कार्यांची पडताळणी करतो. याच अनुषंगाने आपण या वर्षात सादर केलेल्या विविध विषयांच्या लेखासंदर्भातील वर्षभराचा आढावा घेऊया...

शिक्षण क्षेत्रातील गुण-दोष, विद्यार्थ्यांच्या समस्या, परीक्षांतील गैरप्रकार, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, निवडणुकांविषयक गैरप्रकार, दहशतवाद, नक्षलवाद, पर्यावरणीय समस्या, आरोग्य विषयक समस्या, शेतकरी-कामगारांच्या समस्या, महिलांवरील अन्याय-अत्याचार, घरगुती हिंसाचार, गुन्हेगारी, आत्महत्या अशा अनेक समस्यांचे आकलन तसेच यावरील उपाय-योजनांची चर्चा आपण केली.

सोशल मीडियाचे गुण-दोष, शेतीव्यवस्थेचे विश्लेषण,
वनांचे महत्व, भारतीय राज्यघटनेचा इतिहास, भारताचा स्वातंत्र्य प्रवास इत्यादी बाबी अगदी सोप्या भाषेत वाचकांसमोर मी प्रस्तुत केल्या. गाडगे बाबा, तुकोबा, नामदेव यांसारख्या संतांच्या शिकवणीही आपण थोडक्यात समजून घेतल्या. अमेरिका, पाकिस्तान इत्यादी देशांच्या राजकारणाचा भारतावर पडणारा प्रभाव देखील आपण जाणून घेतला.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेमविवाह, महिला सक्षमीकरण, धर्माची ज्वलनशीलता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भौतिकवाद, आदर्शवाद, व्यापार युद्धे, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संघर्ष, देशाचा अर्थसंकल्प, भारतीय करप्रणाली, वासना अथवा लैंगिक इच्छा, लैंगिक शिक्षण, मानसिक आरोग्य इत्यादी संकल्पनांचे विश्लेषण करून त्या समजून घेण्याचा प्रयत्न देखील आपण केला.

शासन-प्रशासनाच्या आणि भारतीय नागरीकांच्या, मतदारांच्या भूमिका/कर्तव्ये/जबाबदाऱ्या याविषयीचे आकलन देखील आपण समजून घेतले. विविध राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय अहवालांचे विश्लेषण करणारे लेख प्रकाशित केले.

05 जानेवारी 2025 ते 28 डिसेंबर 2025 पर्यंतचे सर्व लेख एकत्रितपणे 'PDF' स्वरूपात उपलब्ध करून देत आहे.
येणाऱ्या वर्षातही 'विकासाच्या वाटेवरील भारताची' विकासकथा प्रकाशित होतच राहील.
तसेच येणारे वर्ष सर्वांसाठी सुखमय व्हावे हीच इच्छा...

धन्यवाद..!

~ सचिन विलास बोर्डे

39/4

2025 | Evaluation | Articles | Gist | Yearly Compilation 



Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!