Posts

Showing posts with the label Society

180. विकासाच्या वाटेवरील भारत!

जागतिक महिला दिनाविषयक लेख क्र. 30/2 काही बदलांसह पुनः प्रकाशित करीत आहे. 8 मार्चला जगभर " जागतिक महिला दिन " साजरा केला जातो. जगभरातील महिलांना या दिनी भरपूर महत्व अन् विशेष वागणूक दिली जाते. सर्वच समाज माध्यमांवर शुभेच्छावर्षाव केला जातो. मात्र इतक्याच बाबी पार पाडून महिलांचा विकास आणि महिलांचं सक्षमीकरण होणारं नाही. भारतीय समाजात इतिहास काळापासूनच महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेने महिलांना ' मूलभूत हक्क नसलेली शोषक समाजरचना ' निर्माण केली. या व्यवस्थेने पुरुषांना श्रेष्ठत्व प्रदान केलं. ज्यातून ' पुरुषसत्ताक व्यवस्था ' जन्माला आली. या शोषक व्यवस्थेत स्त्रियांना पुरुषांची लालसा भागविणारी गुलाम अन् मुलांना जन्माला घालणारे एक यंत्र अथवा साधन मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात अनेकांच्या प्रयत्नाने स्त्री-पुरूष समान असलेल्या अन् स्त्रियांना प्रतिनिधित्व देणाऱ्या व्यवस्थेची गरज अधोरेखित झाली. अन् याच गरजांची पूर्तता ' संविधानाच्या चौकटीत ' स्त्रियांविषयक तरतुदींचा स्वीकार करून केली गेली. आज बोटावर मोजता येतील इतक्या महिलांनी भली-मोठी प्रगती केली य...

171. विकासाच्या वाटेवरील भारत!

" शिक्षण " हा व्यक्तीच्या, समाजाच्या अन् देशाच्या विकासाला गतिमान करणारा घटक आहे. ' एखादा व्यक्ती, समाज आणि देश जितका शिक्षित, सुशिक्षित असेल तितका तो व्यक्ती, समाज आणि देश गतिशील असतो, प्रगतिशील असतो. ' शिक्षणातून ' चिकित्सा ' जन्मला येते. चिकित्सा ' प्रश्नांना ' जन्म देते. हेच प्रश्न ' मानवी विवेक ' जागृत करतात. अन् हाच मानवी विवेक मानवाला सत्य-असत्य, चांगलं-वाईट, खर-खोट या स्वरूपाचं वर्गीकरण करण्याची ताकद देतो. सत्याचा, चांगल्याचा, खऱ्याचा स्वीकार करून असत्याला, वाईटाला, खोट्याला नाकारलं की शिक्षणाचा उद्देश पूर्ण झाला असं म्हणता येत. आता जरा भारताच्या इतिहासाचा संदर्भ घेऊया. भारताच्या इतिहासात डोकावल्यास शिक्षणावर ' पुरुषी वर्चस्व ' असल्याचं आपल्याला समजत. परिणामी स्त्रीयांना प्रश्न जन्माला घालणाऱ्या चिकित्सक आणि विवेकी शिक्षणापासून वंचित ठेवलं गेल. ' शिक्षणावर मक्तेदारी प्रस्थापित करून सत्ता टिकविली गेली. अन् समाजातल्या शिक्षण नसलेल्यांवर ही सत्ता गाजविली गेली.' याच विषम समाजरचनेची चिकित्सा करून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्...

164. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच पार पडलेल्या " बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल " एक-दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला.  बिहारच्या निवडणुका अन् निवडणुकांचे निकाल आजच्या लेखातून समजून घेऊयात... विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 202 जागांवर National Democratic Alliance (NDA) चा विजय बघायला मिळाला. तसेच महागठबंधनच्या वाटेला 35 जागा आलेल्या दिसताय.  निवडणूक आयोगानुसार बिहारमध्ये 67.13% मतदान झाल्याचे समजते. (1951 सालानंतरचा हा आजवरचा सर्वात मोठा आकडा समजला जातोय.) यापैकी 62.98% पुरुष मतदार आणि 71.78% महिला मतदारांनी मते नोंदवल्याचे दिसते. कायमच अविकसित गणल्या गेलेल्या बिहारच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. विविध मतदारसंघात अटी-तटीची लढत दिसून आली. थोड्या-बहुत फरकाने अनेक उमेदवारांची हार-जीत देखील बघायला मिळाली. निवडून आलेल्या उमेदवारांच्या हाती आता बिहारच्या विकासाची दोर असेल. यामुळेच येणाऱ्या काळात नागरिक राजकारणापासून फारकत न घेता राजकारणाच्या प्रक्रियेत मोठ्या टक्क्याने सहभागी होतील तसेच येणाऱ्या पाच वर्षांकरिता आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण आपल्या विजयी उमेदवारांना जबाबदार धराल याच...

154. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 35/5 मध्ये आपण एका गृहितकाच्या आधारे आर्थिक विषमता समजून घेतली होती. आजच्या लेखातून " भारतातील आर्थिक विषमता " जाणून घेऊया... भारतातील आर्थिक विषमता समजून घेण्याकरिता ' ऑक्सफॅम अहवाल (Oxfam Report) ' हा महत्वाचा दस्तऐवज आहे. या अहवालाच्या मते, भारतातील 10 टक्के लोकांकडे एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या 77 टक्के संपत्ती एकवटलेली आहे. एकीकडे 2017 मध्ये निर्माण झालेल्या संपत्तीचा 73 टक्के वाटा 1% श्रीमंत व्यक्तींकडे गेलाय. अन् दुसरीकडे 670 दशलक्ष जनतेच्या संपत्तीत केवळ 1% वाढ झाल्याचे अहवाल नमूद करतो. भारतातील सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या ' आरोग्य सेवाही ' मिळत नाही. आरोग्यविषयक खर्चामुळे दरवर्षी 63 दशलक्ष लोकांच्या वाट्याला ' गरिबी ' येते. एका आघाडीच्या भारतीय वस्त्र कंपनीतील सर्वोच्च पगाराच्या अधिकाऱ्याला एका वर्षात मिळणाऱ्या कमाईइतके पैसे मिळविण्यासाठी ग्रामीण भागातील एका किमान वेतन कामगाराला 941 वर्षे लागतील. हे आर्थिक विषमता स्पष्ट करणारे उदाहरणही ऑक्सफॅम अहवाल अधोरेखित करतो. वसाहतवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, नव-वसाहतवाद (Neo-Colonialism...

153. विकासाच्या वाटेवरील भारत!

" संपत्तीचे विषम वितरण " हे गरिबीचे एक मुख्य कारण मानले जाते. हीच ' आर्थिक विषमता आणि गरिबीचा जन्म ' पुढील उदाहरणातून समजून घेता येईल. समजा, 100 लोकसंख्या असलेल्या ' X ' नावाच्या देशात 1000 रुपयांची एकूण संपत्ती आहे. या देशात 10 लोकांचा समावेश असलेल्या ' A ' या गटाकडे एकूण संपत्तीपैकी 800 रुपये म्हणजेच 80 टक्के संपत्ती एकवटलेली आहे. अन् दुसऱ्या बाजूला 90 लोकांचा समावेश असलेल्या ' B ' या गटाकडे फक्त 200 रुपये म्हणजेच 20 टक्के संपत्ती शिल्लक उरलेली आहे. A या गटातील प्रत्येक सदस्याकडे 80 रुपये असतील अन् B या गटातील प्रत्येक सदस्याकडे किमान 2 रुपये असू शकतील. यालाच आर्थिक विषमता अथवा संपत्तीचे विषम वितरण म्हणता येते. X नावाच्या या देशात 10 लोकांच्या A या धनिक गटाला ' दर्जेदार सुख ' मिळेल. मात्र बहुसंख्यांचा समावेश असलेल्या B या गटाकडे संपत्तीचा तुटवडा असल्याने या गटाच्या वाटेला ' दर्जेदार दुःख ' येईल. यातूनच गरिबी जन्माला येईल. आता X या देशातील अर्थव्यवस्थेचा अन् समाजव्यवस्थेचा विकास तिथल्या ' शासनाच्या भूमिकेवर ' अवलंबून अ...

151. विकासाच्या वाटेवरील भारत!

दोन दिवसांपूर्वी आपण 79 वा " स्वातंत्र्य दिवस " साजरा केला. हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांनी रक्ताचं अन् अनेकांनी पेनाच्या शाईचं योगदान दिलं. तुम्हा-आम्हाला अन् आपल्या भारताला पारतंत्र्यातून मुक्त केलं. हाच 78 वर्षांचा ' स्वातंत्र्य प्रवास ' आजच्या लेखातून समजून घेऊया... इतिहासात डोकावल्यास भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ' भारतीय राष्ट्रवादाचं ' महत्व लक्षात घेता येतं. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तत्कालीन बुद्धिजीवींनी, समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेचे शोषक रूप अधोरेखित केले. त्यातून भारतीय राष्ट्रवादाची पायाभरणी झाली. या राष्ट्रवादी विचाराने स्वातंत्र्याच्या ध्येयावर भर दिला. अन् 1947 ला हे ध्येय पूर्ण केले. 1947 नंतर स्वतंत्र भारताने स्वतंत्रपणे आपले ध्येय-धोरणे आखायला सुरुवात केली. या 78 वर्षांच्या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, भारतीय जनता पक्ष इत्यादी राजकीय पक्ष सत्तेत आले. सत्तास्थानी आलेल्या पक्षांनी भारताच्या विकासानुरूप विविध उपाय-योजना आखल्या. या पक्षांच्या ध्येय-धोरणांच्या यशापयशावरच आजच्या भारताला आपली ...

145. विकासाच्या वाटेवरील भारत!

संतांची भूमी या नावे महाराष्ट्र ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूमीवर या संतांनी ' कीर्तनातून अन् अभंगांची ' रचना करून समाज सुधारणेचं अन् समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं. हीच बाब पुढील दोन अभंगातून समजून घेऊया... अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर प्रहार करत तेराव्या शतकातील " संत नामदेव " लिहितात, पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥ भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥ सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥ सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥ वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥ तोंड धरून मेंढा मारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥ सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥ अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८। एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥ नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमटें ॥१०॥ या अभंगातून नामदेव ' दगडाच्या देवाला ' नाकारतात अन् या दगडी देवाच्या अवतीभवती असलेल्या ' अंधश्रद्धेची ' चिरफाड करतात. नामदेवांच्या अभंगामुळे तुम्ही दगडी देव नाकारला तर ' अस्सल देव ' शोधणार कुठं? या ...

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 33/2 मध्ये आपण घरगुती हिंसाचाराच्या समस्येचा थोडक्यात आढावा घेतला. आजच्या लेखातून घरगुती हिंसाचारासंबंधीच्या केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या अहवालाचे विश्लेषण जाणून घेऊया... भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे " राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey-NFHS) " हा अहवाल प्रकाशित केला जातो. 2019-21 या वर्षाच्या ' NFHS-5 ' या अहवालानुसार,  भारतातील 18 ते 49 वयोगटातील 29% महिला वयाच्या 15 वर्षांपासूनच ' शारीरिक हिंसाचाराला ' बळी पडलेल्या दिसतात. यातील 3% महिला गरोदर असताना शारीरिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत. वयानुसार शारीरिक हिंसाचारात वाढ दिसून येते. 18 ते 19 वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण 16% आहे. तसेच 40 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये हेच प्रमाण 32% असल्याचे दिसते. अविवाहित स्त्रियांच्या तुलनेत ' विवाहित स्त्रियांमध्ये ' शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण 31% आहे आणि शहरी भागात हे प्रमाण 24 टक्के असल्याचे अहवाल नमूद करतो. 18 ते 19 वयोगटातील 6% म...

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडील काही काळात देशाच्या विविध ठिकाणी घडलेल्या " घरगुती हिंसाचाराच्या (Domestic Violence) " घटनांच्या पार्श्वभूमीवर सदरील लेख प्रकाशित करीत आहे. ' स्त्रीयांना शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, आर्थिक  पातळीवर होणारा छळ म्हणजेच घरगुती किंवा कौटुंबिक हिंसाचार म्हणता येईल. ' मुख्यत्वे पती अथवा कुटुंबीय या छळास जबाबदार असतात. हे अनेक घटनांवरून सिद्ध होते. या हिंसाचाराला तीन मुख्य प्रकारांत वर्गीकृत करता येईल. 1. शारीरिक हिंसाचार (Physical Spousal Violence)- यामध्ये स्त्रीला मारहाण करणे, जखमी करणे, शारीरिक इजा पोहोचविणे इत्यादी स्वरूपातील शारीरिक हिंसेचा समावेश होतो. 2. लैंगिक हिंसाचार (Sexual Spousal Violence)- स्त्रीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (बलात्कार) करणे इत्यादी बाबींचा समावेश यात करता येईल. 3. भावनिक हिंसाचार (Emotional Spousal Violence)- स्त्रीला शिवीगाळ-अपमानित करणे, अपमानास्पद वागणूक देणे, हानी पोहोचवण्याची धमकी देणे इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. देशातील बहुतांश स्त्रिया वरील तीनही किंवा त्यापैकी कुठल्यातरी एका हिंसाचाराला ...

137. विकासाच्या वाटेवरील भारत!

22 एप्रिलला काश्मीरातील पहेलगाम येथे दहशतवादी हल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवादाला प्रत्युत्तर देणे भारतासाठी आवश्यकच होते. परिणामी दहशतवाद्यांना अद्दल घडविण्याकरिता भारताने 07 मे ला " Operation Sindoor " च्या माध्यमातून पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना उध्वस्त केले. हीच बाब तीन मुद्द्यांच्या साह्याने समजून घेऊया... पहिला मुद्दा, भारताच्या दहशतवादावरील या हल्ल्याचा अर्थ पाकिस्तानने स्वतःवरील हल्ला असा घेतला. अन् भारतावर प्रतिहल्ला करून युद्धास सुरुवात केली. दहशतवादाच्या प्रश्नावर भारत अन् पाकिस्तानने मिळून उत्तरे शोधणे अपेक्षित होते. मात्र दहशतवाद्यांना छातीशी कवटाळणाऱ्या पाकिस्तानकडून ही अपेक्षा ठेवणं अपेक्षाभंगच ठरला. दुसरा मुद्दा, ज्या उद्देशाने या लष्करी कारवायांची सुरुवात झाली होती तो उद्देश बाजूला होतोय. या युद्धात आता आंतरराष्ट्रीय राजकारणाचा शिरकाव झालेला दिसतोय. दोन्ही देशांना इतर देशांचा छुपा पाठिंबा असल्यास अन् बदल्याच्या भावनेच्या चक्रात हे युद्ध अडकल्यास या युद्धाला पूर्णविराम नसेल. जो देश दीर्घकाळ युद्धात गुंतलेला असतो त्या देशाच्या विकासात अडथळे निर्...

135. विकासाच्या वाटेवरील भारत!

लेख क्र. 30/4 मध्ये ' धर्मावर धर्म घासल्याने ' निर्माण होणाऱ्या आगीचे विश्लेषण आपण बघितले होते. दोन गटांत फूट पडल्याने तिसऱ्या गटाला वर्चस्व मिळवणे सुलभ होते हेही आपण बघितले. नुकत्याच घडलेल्या " पहेलगाम " मधील घटनेनंतर या तिसऱ्या गटात " दहशतवादाचाही " समावेश करावा लागेल. देशांतर्गत असलेल्या धार्मिक फाटा-फुटींचा, जातीय समीकरणांचा आजवर राजकीय पार्ट्यांना अन् राजकारण्यांना सत्ता टिकविण्याकरिता फायदा होत आला. मात्र याच धार्मिक फाटा-फुटींचा फायदा दहशतवादी संघटनाही घेऊ शकतात हे काश्मीरातील पहेलगाम घटनेने सिद्ध केलयं. देशातील सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी आपल्या सोयीनुसार जातीय समीकरणांचा उपयोग करून घेतला. परिणामी दोन धर्मांतील नागरिकांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. दोन्ही धर्मांतील नागरिक एकमेकांपासून दुरावत गेले. आता हा दुरावा अत्यंत टोकाला पोचलेला दिसतोय. ' हिंदू विरुद्ध मुस्लिम ' हेच समीकरण अनेकांच्या डोक्यात फिट झालंय. याच समीकरणाचा फायदा घेत पहेलगाम घटनेने या दुराव्यात भर घातलीय, देशात पुन्हा अशांतता निर्माण केलीय. पहेलगाम घट...

130. विकासाच्या वाटेवरील भारत!

सदरील लेखातून कुठल्याही समाज घटकाच्या भावना दुखविण्याचा हेतू नाही. " फोडा आणि राज्य करा " ही संकल्पना कशी कार्य करते हेच समजण्याकरिता सदरील लेख प्रकाशित करीत आहे. एकेकाळी मनुष्याने ' दगडावर दगड घासून ' आगीचा शोध लावला होता. या आगीच्या शोधाने सर्वच मनुष्याच्या प्रगतीस सहाय्य पुरविले. अन् आजच्या तंत्रज्ञान विकसित केलेल्या आधुनिक मनुष्याला आग निर्माण करण्याकरिता दगडावर दगड घासण्याची गरज राहिलेली नाही. आजचा हा प्रगत मनुष्य ' धर्मावर धर्म घासून ' आग निर्माण करताना दिसतोय. याच आगीला दंगलीचे नाव दिले गेले. दगडावर दगड घासून लागलेल्या आगीने मानवजातीला प्रगतीचा मार्ग दाखविला. अन् धर्मावर धर्म घासून लागलेल्या आगीने मानवजातीला अधोगतीकडे नेले. समजा, समाजात अ आणि ब असे दोन गट अस्तिवात असतील आणि तिसऱ्या क गटाला वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर अ आणि ब या दोन गटात फूट पाडली जाते. अ आणि ब गट एकमेकांवरच दगडफेक करण्यात व्यस्त राहतो. क गट कायम वर्चस्वस्थानी राहण्याकरिता फोडा आणि राज्य करा हे धोरण हाती घेतो. वर्षानुवर्षांपासून भारतीय समाजाची जाती, धर्म, धार्मिक स्थळे, मंदिरे, ...

129. विकासाच्या वाटेवरील भारत!

सोळाव्या शतकात पुण्याजवळील देहू येथे ' तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) ' यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात " तुका, तुकोबा, तुकोबाराया " म्हणून ओळख मिळाली. सोळाव्या शतकातील समाजाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. समाजातील समाज-जीवन, चाली-रीती, रूढी-परंपरा यावर आपले विचार अभिव्यक्त करण्याकरिता तसेच समाजसुधारणेकरिता, समाज प्रबोधनाकरिता अन् समाजाला योग्य दिशा देण्याकरिता त्यांनी हजारो " अभंगांची " रचना केली. संत तुकारामांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. त्याकाळी 'नवस केल्याने लेकरं होतात' असा गैरसमज रुजला होता अन् रुजवला गेला होता. यावर तुकोबांनी आपले मत मांडले. ते म्हणतात, " नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।। " अर्थात नवस केल्याने लेकरं झाली असती तर नवरा करण्याची गरज काय? असा प्रश्न तुकोबांनी उपस्थित केला. यातून त्यांची तार्किक बुद्धी अन् वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित होतो. समाजातील सर्वांनाच समान हक्क-अधिकार असावते या दृष्टिकोनातून ते लिहितात, " ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार। बाळें नारीन...

128. विकासाच्या वाटेवरील भारत!

8 मार्चला जगभर " जागतिक महिला दिन " साजरा केला जातो. जगभरातील महिलांना या एकाच दिनी भरपूर महत्व अन् विशेष वागणूक दिली जाते. सर्वच समाज माध्यमांवर शुभेच्छावर्षाव केला जातो. मात्र इतक्याच बाबी पार पाडून महिलांचा विकास आणि महिलांचं सक्षमीकरण शक्य होईल का? हा प्रश्न उरतोच... इतिहास काळापासूनच महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेने महिलांना ' मूलभूत हक्क नसलेली शोषक समाजरचना ' निर्माण केली. या व्यवस्थेने पुरुषांना श्रेष्ठत्व प्रदान केले. ज्यातून ' पुरुषसत्ताक व्यवस्थेने ' डोके वर काढले. स्त्रियांना पुरुषांची लालसा भागविणारी गुलाम अन् मुलांना जन्माला घालणारे एक यंत्र अथवा साधन मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात अनेकांच्या प्रयत्नाने स्त्री-पुरूष समान असलेली व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला गेला. संविधानाच्या चौकटीत ही समतेची व्यवस्था साकारली गेली. आज बोटावर मोजता येतील इतक्या महिलांनी भली-मोठी प्रगती केली यावरून भारतातील सगळ्याच महिला प्रगत झाल्या असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. आजही स्त्रियांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. विविध रूपातून या समस्या समोर येत आहेत. म...

127. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या या स्पर्धात्मक युगात मानवाच्या जीवनात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसतेय. हेच नैराश्य डोईजड झालं की अनेकजण " आत्महत्येचा वैफल्य मार्ग " स्वीकारताना दिसताय. "भारताची स्थिती" - 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'च्या (NCRB) वार्षिक अहवालानुसार, 2022 मध्ये 1.7 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 4.2 टक्क्यांनी आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ झालेली दिसते. या जुन्या आकडेवारीवरून सध्याच्या परिस्थितीचे आकलन करता येईल. गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेम-प्रकरणे, कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या अशा काही कारणांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे दिसते. अलीकडे तर काहींनी आत्महत्या करण्यापूर्वी आपण आत्महत्या का करतोय?, आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण?, याचे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केलेत. मात्र यामुळे तरुणांमध्ये चुकीचा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता दिसतेय. ' आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात ' हीच बाब मला या अनुषंगाने नमूद करावीशी वाटतेय. "उपाययोजना...

126. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 फेब्रुवारी 1873 रोजी अमरावती जिल्ह्यात डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात " गाडगे बाबा " म्हणून ओळख मिळाली. घरा-दाराचा, बायको-लेकरांचा त्याग करून कीर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट रूढी परंपरांचे उच्चाटन अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन केले. गाडगे बाबा दिवसभर गावाची सफाई करायचे अन् रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या डोक्यातल्या वाईट विचारांची सफाई करायचे. ' लोकांनी आपल्या परिसराच्या स्वच्छतेसोबतच विचारांच्या स्वच्छतेलाही पुरेसे महत्व द्यावे ' ही गाडगे बाबांच्या समाजकार्यामागील प्रेरणा होती. साध्या-सोप्या भाषेत कीर्तन करून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलेले दिसते. त्यांच्या कीर्तनातील छोटासा मजकूर याठिकाणी नमूद करतो... ते सांगतात, " बापहो, आता तरी सुधरा, आता तरी मुलाले शिक्षण द्या, पैसे नसतील तर जेवणाचं ताट मोडा... हातावर भाकरी खा, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या पण मुलाले शिक्षण दिल्याशिवाय सोडू न...

125. विकासाच्या वाटेवरील भारत!

" आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेम विवाहाला " कुटुंबीयांचा अन् इथल्या सामाजिक व्यवस्थेचा कायमच विरोध राहिलेला आहे. आपल्या लेकरांनी आंतरजातीय विवाह केल्यास आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल, समाज आपल्याला जातीबाहेर टाकेल अशी भिती समाजात खोलवर रुजवली गेली. परिणामी आंतरजातीय विवाहाला इथल्या समाजव्यवस्थेने अन् जातव्यवस्थेने प्रोत्साहन दिलेच नाही. अशा विविध कारणांमुळे अनेक तरुण-तरुणींनी ' पळून जाऊन लग्न केल्याची ' उदाहरणे हल्ली सर्वत्र दिसून येत आहे. मात्र असा प्रेमविवाह केल्यानंतरही कुटुंबियांकडूनच त्यांचा छळ होत आहे, असेही ऐकण्यात येते. बऱ्याचदा हाच छळ ' ऑनर किलिंग ' चे रूप घेतो. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींनीचा कुटुंबातील सदस्यच खून करतात. अशाच घटना छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर, बीड इत्यादी जिल्ह्यात घडलेल्या दिसतात. अशा ऑनर किलिंगच्या घटनांना थांबविण्याकरिता आणि प्रेमविवाह करणाऱ्यांना सुरक्षा देण्याकरिता " सुरक्षा गृह (Safe House) " तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींच्या जीवाला धोका असल्यास स...

116. विकासाच्या वाटेवरील भारत!

पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचे वृत्त नेहमीच कानावर पडते. अलीकडेच ' पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या ' केल्याचं वृत्त वाचनात आलं. बेंगळुरूतील " अतुल सुभाष " या 34 वर्षीय अभियंत्याने 24 पानी सुसाईड नोटमध्ये आणि दीड तासाच्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे पत्नी, पत्नीचे नातेवाईक आणि उत्तर प्रदेशातील एका न्यायाधीशाने केलेल्या छळामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचं स्पष्ट केलंय. ' वैवाहिक वादामुळे ' त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर अनेक ' खोटे गुन्हे ' दाखल केलेत तसेच सेटलमेंट साठी 3 कोटी रुपयांची मागणी पत्नीने केल्याचंही त्यांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केलंय. या संपूर्ण प्रकरणामुळे स्त्रीविषयक कायदे तथा नियमांचा होणारा गैरवापर आणि कायद्यामध्ये पुरुषांकडे होणारे दुर्लक्ष या दोन बाबी चर्चेचा विषय बनल्या आहेत.  भारतातील स्त्रियांसाठी काही विशेष तरतुदी/कायदे राज्यसंस्थेने पारित केले आहेत. स्त्रिया सक्षम व्हाव्यात ही यामागील भूमिका. या तरतुदींचा स्वहितासाठी गैरवापर व्हायला नको. स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक छळाची प्रकरणे साधारणपणे तातडीने ...

113. विकासाच्या वाटेवरील भारत!

20 तारखेला पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील मतदान केंद्रातील तोडफोड, इतर काही ठिकाणच्या EVM मध्ये तांत्रिक बिघाड, तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार अन् त्यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्कीच्या काही घटनांचा अपवाद वगळता 20 तारखेचे मतदान शांततेने पार पडल्याचे दिसले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी यंदाच्या निवडणुकांत उत्साहाने सहभाग नोंदविला. निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात अंदाजे 65.02% मतदान झाल्याचे दिसले. (2019 च्या विधानसभा निवडणुकीत 61.6% मतदान झाले होते.) हा आकडा थोडासा वाढलेला दिसत असला तरी शहरी भागातील मतदारांत अजूनही 'सीरियसनेस' आलेला दिसत नसल्याचेच चित्र यंदाही बघायला मिळाले. काल लागलेल्या या निवडणुकीच्या निकालाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विविध मतदारसंघात अटी-तटीची लढत दिसून आली. थोड्या-बहुत फरकाने अनेक उमेदवारांची हार-जीत देखील बघायला मिळाली.  थोडक्यात, राजकारणाची प्रक्रिया कशी कार्यान्वित होते हेच मला उपरोक्त विश्लेषणातून अधोरेखित करावयाचे आहे. सर्वसामान्य नागरिकांनी राजकारणाकडे दुर्लक्षून चालणार नाही. साम-दा...

112. विकासाच्या वाटेवरील भारत!

आमदारांच्या स्थितीविषयक अहवालाचे विश्लेषण आपण मागील लेखात बघितले. आजच्या या लेखातून " मतदारांची स्थिती " आपण जाणून घेऊयात. (खरेतर मतदारांच्या भूमिकेचे विश्लेषण मी लेख क्र. 18/4 मध्ये केले होते. याच लेखाची पुनर्मांडणी अलीकडेच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात करीत आहे.) एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा सत्तेत येण्याकरीता कमालीचा खटाटोप सुरूय तर दुसरीकडे कुठल्या पक्षाला सत्तास्थानी पोहोचवावे याची जबाबदारी मतदारांवर येऊन पडलीय. थोडक्यात, महाराष्ट्राची येणाऱ्या पाच वर्षांकरिता विकासाची दिशा ठरविण्याची ' संयुक्त जबाबदारी ' राजकीय पक्षांची आणि मतदारांची असेल. पक्षांना सत्तेत येण्यासाठी मतदार महत्वाचा ठरतो. निवडणुका जवळ आल्या की, या पक्षांद्वारे ' मोहक आश्वासनांचा अन् मोहक जाहीरनाम्यांचा ' भडिमार व्हायला सुरुवात होते. विकास कामे गतिमान व्हायला लागतात. छुप्या पद्धतीने ' पैसा-दारू-मांस ' इत्यादी इत्यादी वितरीत केल्या जाते. मतदात्यांना आपल्याकडे कसे खेचता येईल याचा हा खटाटोप. पुरेशी ' राजकीय समज ' नसल्याने मतदारही यांस ...