171. विकासाच्या वाटेवरील भारत!
"शिक्षण" हा व्यक्तीच्या, समाजाच्या अन् देशाच्या विकासाला गतिमान करणारा घटक आहे. 'एखादा व्यक्ती, समाज आणि देश जितका शिक्षित, सुशिक्षित असेल तितका तो व्यक्ती, समाज आणि देश गतिशील असतो, प्रगतिशील असतो.'
शिक्षणातून 'चिकित्सा' जन्मला येते. चिकित्सा 'प्रश्नांना' जन्म देते. हेच प्रश्न 'मानवी विवेक' जागृत करतात.
अन् हाच मानवी विवेक मानवाला सत्य-असत्य, चांगलं-वाईट, खर-खोट या स्वरूपाचं वर्गीकरण करण्याची ताकद देतो. सत्याचा, चांगल्याचा, खऱ्याचा स्वीकार करून असत्याला, वाईटाला, खोट्याला नाकारलं की शिक्षणाचा उद्देश पूर्ण झाला असं म्हणता येत.
आता जरा भारताच्या इतिहासाचा संदर्भ घेऊया.
भारताच्या इतिहासात डोकावल्यास शिक्षणावर 'पुरुषी वर्चस्व' असल्याचं आपल्याला समजत. परिणामी स्त्रीयांना प्रश्न जन्माला घालणाऱ्या चिकित्सक आणि विवेकी शिक्षणापासून वंचित ठेवलं गेल. 'शिक्षणावर मक्तेदारी प्रस्थापित करून सत्ता टिकविली गेली. अन् समाजातल्या शिक्षण नसलेल्यांवर ही सत्ता गाजविली गेली.'
याच विषम समाजरचनेची चिकित्सा करून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात "फुले दांपत्याने" शिक्षणवृक्षाची बीजे रोवली. समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी स्त्री आणि पुरुषांना समतेच्या तत्वावर आधारलेल्या शिक्षण व्यवस्थेची गरज फुले दांपत्याने ओळखली. शिक्षणावरील पुरुषी मक्तेदारी संपुष्टात यावी अन् स्त्रियांनाही चिकित्सक आणि विवेकी शिक्षणाचा लाभ घेता यावा याकरिता 1818 साली पुण्यात महिलांची पहिली शाळा सुरू केली गेली.
आज बहुतांश स्त्रिया शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या दिसतात. मात्र हल्लीच्या शिक्षणाचा उद्देश केवळ 'नोकरीपुरता' मर्यादित झाल्याने केवळ लिहिता-वाचता येण्याला शिक्षित म्हणता येणारं नाही. जोवर आपल्याला शिक्षणाचा अस्सल उद्देश समजणार नाही तोवर फुले दांपत्याने रोवलेल्या शिक्षणवृक्षाच्या फळा-फुलांचा अस्सल आस्वाद चाखता येणार नाही..!
~ सचिन विलास बोर्डे
40/1
Education | History | Mahatma Jyotiba Phule | Savitribai Phule | Women Education | Patriarchal Society | Critical Thinking | Reason | Conscience | Social Reform | Social Reformer | Society | Women Empowerment | Equality | Rationalism | Gender Justice
Comments
Post a Comment