Posts

Showing posts with the label Education

155. विकासाच्या वाटेवरील भारत!

10 ते 19 या वयोगटाला " किशोरावस्था (Adolescence) " समजले जाते. किशोरावस्थेच्या या टप्प्यात मुलामुलींत अनेक शारीरिक, मानसिक, भावनिक बदल घडतात. या तारुण्याच्या काळात शरीरात विविध हार्मोन्स निर्माण होतात. बुद्धीचा झटपट विकास सुरू होतो. मात्र ' पुरेशी समज ' अजूनही या वयात निर्माण होत नाही. या तारुण्याच्या अवस्थेत मुलंमुली नवनवीन गोष्टी जाणून घेण्यास ' अतिउत्साही ' असतात. 13 ते 19 या वयोगटात हे प्रमाण अधिक असते. याच वयात या लेकरांना त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक बदलांविषयी योग्य मार्गदर्शन मिळणं महत्वाचं असत. हल्लीच्या सोशल मीडियाच्या युगात बहुसंख्य कुटुंबांकडे एकतरी ' स्मार्टफोन ' बघायला मिळतो. अन् आता शिक्षणही डिजिटल झालंय. परिणामी या 13 ते 19 वयोगटातील लेकरांकडे ' शिक्षणाच्या हेतूने ' स्मार्टफोन्स दिले जातात. मात्र अलीकडच्या काही काळात ही लेकरं शिक्षणाचा हेतू बाजूला सारून इंस्टाग्राम, फेसबुक सारख्या ' आभासी दुनियेतच ' मग्न होताना दिसताय. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही लेकरं योग्य मार्गदर्शनाच्या अभावाने अ...

149. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारतात राज्य आणि केंद्र शासनाच्या शासकीय सेवेत आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची निवड परीक्षांमार्फत केली जाते. केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त जागांवर अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी ' स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ' नावाचा आयोग कार्यरत आहे. या आयोगाने SSC Selection Post Phase 13 ही परीक्षा घेण्यासाठी नवीन खासगी कंत्राटदाराची नेमणूक केलीय. मात्र विद्यार्थ्यांना या " परीक्षा प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणी " आल्याने विद्यार्थांनी अन् शिक्षकांनी ' आंदोलन ' सुरू केल्याचे दिसत आहे. सर्वप्रथम ' विद्यार्थ्यांच्या तक्रारी ' लक्षात घेऊया... विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्रे मिळाले. राजस्थानातील विद्यार्थ्यांना अंदमान निकोबार बेटावर परीक्षा केंद्रे देण्यात आली. पूर्वसूचना न देता ऐन वेळेवर परीक्षा केंद्रे बदलण्यात आले. परीक्षा केंद्रांवरील संगणक बंद पडणे, बायोमेट्रिक प्रणालीमध्ये बिघाड इत्यादी स्वरूपातल्या तांत्रिक अडचणी दिसून आल्या. इत्यादी कारणांमुळे देशातील विद्यार्थ्यांना अन् शिक्षकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय. कारण ' या देशात हक्क मागितल्याने मिळत नाहीत, ...

144. विकासाच्या वाटेवरील भारत!

शिक्षण का घेतलं जात? या साध्या प्रश्नाचं उत्तर " नोकरी " अस देता येतं. भारतामध्ये शिक्षणाकडे नोकरी मिळविण्याचे साधन या दृष्टीनेच बघितल्या जाते. परिणामी चांगल्या नोकरीकरीता चांगल्या शिक्षणाची आवश्यकता गरजेची वाटते. नोकरी मिळविण्याकरिता परीक्षा द्याव्या लागतात. कॉलेज मिळवून देणाऱ्या ' प्रवेश परीक्षा ' असो किंवा नोकरी मिळवून देणाऱ्या ' स्पर्धा परीक्षा ' असो दोन्हींकडे लाखोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षांची तयारी करतात, परीक्षा देतात अन् त्यातले मोजकेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. उत्तीर्ण होण्यासाठी कसून मेहनत घ्यावी लागते. अन् विद्यार्थी ही मेहनत तेव्हाच घेतात जेव्हा ते या क्षेत्रांत ' स्वतःच्या इच्छेने ' आलेले असतात. मात्र वास्तविकता जराशी वेगळी आहे. विद्यार्थ्यांच्या इच्छा बाजूला सारून ' पालकांच्या इच्छा ' वरचढ होताना दिसताय. पालकवर्ग जबरदस्तीने त्यांच्या लेकरांना डॉक्टर, वकील, इंजिनियर इत्यादी व्हायला सांगत असतील तर या परीक्षांचा अभ्यासक्रम लेकरांना डोईजडच होणार आहे. ' तुला जास्त मार्क्स मिळवावेच लागतील, तुला चांगलं कॉलेज मिळायलाच हवं अन्...

138. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बऱ्याच राज्यांच्या शिक्षण मंडळांद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या अनुषंगाने लेख क्र. 21/1 पुन्हा प्रकाशित करीत आहे.  उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. आपल्या पाल्याने नेमका कुठला पर्याय निवडावा हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक घ्यायला हवा. उच्च शिक्षणाचा पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोल आवडीचा असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याकरिता डोकेदुखीच ठरेल. यामुळे पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' करणं टाळायलाच हवं. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात य...

136. विकासाच्या वाटेवरील भारत!

केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) द्वारे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या " नागरी सेवा (Civil Services) " परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलीय त्यांचे अभिनंदन! अन् जे या स्पर्धेत येऊ इच्छितात, हा लेख त्यांच्याकरीता... भारतात लाखोंच्या संख्येने तरुणवर्ग या परीक्षेची तयारी करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत यात गुंतलेली असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी लाखों रुपयांचे शिकवणी क्लासेस लावतात, तर काही विद्यार्थी क्लासेस न लावता अभ्यास करतात. शिकण्याकरिता पैसा आवश्यकच. म्हणून पुरेस शिक्षण घेता येईल इतकी शिक्षणाकरिता आर्थिक तरतूद करूनच ठेवावी. यंदाचा निकालात ' शेतकऱ्यांची मुले, कामगारांची मुले, रिक्षा चालकांची मुले, मेंढपाळांची मुले या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतात मग आपण का नाही, ' याच विचाराकडे अनेक विद्यार्थी अन् पालकांचे दिल खेचले गेले. या परीक्षेत यशस्वी होण्याची शक्यता समजण्याकरिता पुढील आकडेवारी नमूद करीत आहे. आयोगानुसार, या परिक्षेकरिता 9,92,599 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 5,83,213 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस हजर होते. यापैकी 14,62...

123. विकासाच्या वाटेवरील भारत!

काल देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला गेला. ज्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास आणि सामाजिक विकासास चालना मिळते. पायाभूत सोय-सुविधांचा विकास केला जातो. सदरील लेखात यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे तपशीलवार चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. या लेखाद्वारे अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्पाची आवश्यकता काय? या मूलभूत बाबी समजून घेण्याकरिता हा लेख पुनः प्रकाशित करीत आहे... ' राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये, राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे "वार्षिक वित्तीय विधान Annual Financial Statement" ठेवतील अशी तरतूद आहे. ' वास्तवात राष्ट्रपतींच्यावतीने ' वित्तमंत्रीच ' हा कारभार पार पाडतात. थोडक्यात, शासनाचे महसुली उत्पन्न आणि खर्चाचा हा तपशील असतो. ज्याद्वारे विविध क्षेत्रात पैसा खर्च करून ते क्षेत्र विकसित केले जाते. विविध राज्यांसाठी आवश्यकतेनुसार आर्थिक तरतुदी पुरवल्या जातात. शासन पायाभूत सुविधांवर अधिकचा खर्च करते. ज्यातून अर्थव्यवस्था गतिशील होऊन रोजगारनिर्मिती होईल अन् नागरिकांचा दर्जा सुधारेल हे गृहितक यामागे असते. नागरिकांचे प्रतिनिधि...

107. विकासाच्या वाटेवरील भारत!

' आमची मुलं इंग्रजी शाळेत जातात! ' हे वाक्य हल्ली बहुतांश पालकांच्या तोंडून ऐकायला मिळत. अलीकडच्या काही वर्षांत लेकरांना इंग्रजी शाळेत शिकवणं मोठ्या अभिमानाचा विषय बनलायं. हाच इंग्रजी विरुद्ध मराठी अथवा सरकारी विरुद्ध खाजगी शाळेचा वादविवाद आजच्या लेखात समजून घेऊया. आपल्या मुलांना उत्कृष्ट आणि दर्जेदार शिक्षण मिळावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. एकीकडे ' खाजगी शाळेच्या ' शिकवणी इंग्रजी भाषेतून होतात, अन् इंग्रजी बोलणारा प्रचंड ज्ञानी असल्याचा समज अनेक पालकांत असतो. तसेच या शाळांचा अभ्यासक्रम आणि शिक्षकांची गुणवत्ता निश्चितच चांगली असते. या गुणवत्तापूर्ण शाळांतून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडतील आणि हेच विद्यार्थी सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकतील हा देखील समज पालकांमध्ये असतो. परिणामी अशा ' प्रीमियम फॅसिलिटीस् ' साठी पालक लाखों रुपये खर्च करण्याची तयारी ठेवतात. दुसरीकडे प्रादेशिक भाषेतून शिक्षण देणाऱ्या ' सरकारी शाळांची ' फी कमी असूनही विद्यार्थ्यांची पटसंख्याच कमी असल्याने शिक्षकांत आणि शिक्षणात म्हणावा तितका सिरियसनेस असलेला दिसत नाही. यामुळे दिवसेंदिव...

104. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण अभियांत्रिकी शाखेविषयी माहिती घेतली. या लेखात आपण वैद्यकीय शिक्षणाविषयक स्थितीचा आढावा घेऊ. इतर क्षेत्रांच्या तुलनेत " वैद्यकीय शिक्षण (Medical Education) " कडे विद्यार्थ्यांचा कल अत्यंत कमी. यांस कारणीभूत असलेल्या अनेक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा ' पैसा '. अनेकांची खाजगी महाविद्यायात लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत नसल्याने विद्यार्थी या क्षेत्रात येण्याचे टाळतात. सरकारी वैद्यकीय महाविद्यायात तुलनेने खर्च कमी असतो, मात्र इथे असणाऱ्या स्पर्धेत काहीजणच यशस्वी होतात. डॉक्टर होण्याच्या या प्रवासात विद्यार्थ्यांची मोठी रक्कम खर्च होते. हीच रक्कम परत मिळविण्याकरिता अन् धनसंपन्न होण्याकरिता ही नव-शिक्षित मंडळी प्रामुख्याने शहरांमध्ये आपले इस्पितळे उघडतात. यामुळेच मोठ-मोठ्या शहरांत मोठ-मोठी फी/Fee असलेल्या मोठ-मोठ्या दवाखान्याच्या इमारती बघायला मिळतात. तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल तर तुम्ही या मोठ-मोठ्या इस्पितळात तुमच्या दुखण्याचा इलाज करू शकता, अन् तुमच्याकडे पैसाच नसेल तर ' सरकारी डॉक्टर्स ' अन् ' सरकारी इस्पितळे...

103. विकासाच्या वाटेवरील भारत!

देशातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल " अभियांत्रिकी (Engineering) " शिक्षणाकडे राहिलेला आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधित आकडेवारीवरून, बहुतांश विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा ' संगणक शाखेकडे ' असल्याचे दिसते. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी या शाखांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती दिसून येते. त्याखालोखाल मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी चा पर्याय निवडला जातो. आयटी क्षेत्रात मोठं पॅकेज अन् नोकरीच्या व्यापक संधी मिळतील या आशेने विद्यार्थी संगणक शाखेकडे (हार्डवेअर ऐवजी सॉफ्टवेअरकडे) वळतात. हे विद्यार्थी भारतातच शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्ये विकसित करतात मात्र भारतात आवश्यक त्या नोकरीच्या संधी नसल्याने परदेशात नोकरीचा पर्याय निवडतात. परिणामी त्यांच्या बुद्धिमत्तेचा इतर देशांना फायदा होतो. शेवटी हे भारतीय त्या देशातच स्थायिक होतात. संगणक शाखेच्या मृगजळाकडे अनेकजण आकर्षित झाल्याने इतर अभियांत्रिकी शाखांमध्ये तुटवडा निर्माण होत आहे. देशाच्या सर्वा...

97. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच दिल्लीतील ' जुन्या राजेंद्रनगर (ORN) ' भागात घडलेली दुर्घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. राव आयएएस स्टडी सर्कल या शिकवणी क्लासेसच्या तळघरात पावसाचे पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेकडे लक्ष वेधण्याकरिता अन् विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याकरिता इतर विद्यार्थ्यांनी आंदोलने सुरू केलीत. यातून शिकवणी क्लासेसवाल्यांची झोप उडाली अन् झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. दिल्लीच्या ORN भागात अधिकारी घडविणाऱ्या अनेक ' फॅक्टऱ्या ' (क्लासेस) आहेत. देशाच्या विविध भागातून विद्यार्थी शिकण्याकरिता त्याठिकाणी जातात. क्लासेसवाल्यांचा, लायब्ररीवाल्यांचा, घरे भाड्याने देणाऱ्यांचा, मेसवाल्यांचा या विद्यार्थ्यांमुळे चांगलाच फायदा होतो. या सगळ्यांना फायदा महत्त्वाचा असल्याने हे गुणवत्तेकडे जास्तीचे लक्ष देत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. कदाचित क्लासेसवाल्यांचे वाचनालय तळघरात नसते, प्रशासनाने अवैध बांधकामांवर वेळीच कार्यवाही केली असती, विद्यार्थ्यांनी गैरसोईबद्दल वेळोवेळी तक्रारी केल्या असत्या तर कदाचित त्या तिघांचे आयुष्य बुडाले नसते. क्ल...

96. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकताच देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर केला गेला. ज्याद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास आणि सामाजिक विकासास चालना मिळते. पायाभूत सोय-सुविधांचा विकास केला जातो. सदरील लेखात यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींचे तपशीलवार चर्चा करण्याचे प्रयोजन नाही. या लेखाद्वारे अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्पाची आवश्यकता काय? या मूलभूत बाबी समजून घेऊया... ' राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये, राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे "वार्षिक वित्तीय विधान Annual Financial Statement" ठेवतील अशी तरतूद आहे .' वास्तवात राष्ट्रपतींच्यावतीने 'वित्तमंत्रीच' हा कारभार पार पाडतात. थोडक्यात, शासनाचे महसुली उत्पन्न आणि खर्चाचा हा तपशील असतो. ज्याद्वारे विविध क्षेत्रात पैसा खर्च करून ते क्षेत्र विकसित केले जाते. विविध राज्यांसाठी आवश्यकतेनुसार आर्थिक तरतुदी पुरवल्या जातात. शासन पायाभूत सुविधांवर अधिकचा खर्च करते. ज्यातून अर्थव्यवस्था गतिशील होऊन रोजगारनिर्मिती होईल अन् नागरिकांचा दर्जा सुधारेल हे गृहितक यामागे असते. नागरिकांचे प्रतिनिधित्व असणाऱ्या लोकसभेत हा अर्थसंकल्प म...

89. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागच्या लेखात आपण दहावी-बारावी नंतर कुठले शिक्षण क्षेत्र निवडावे यासंदर्भात चर्चा केली होती. अनेक विद्यार्थ्यांना " वैद्यकीय अभ्यासक्रमाची " आवड असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी National Eligibility cum Entrance Test (NEET) ही कठीण मानली जाणारी परीक्षा द्यावी लागते. National Testing Agency (NTA) द्वारे ही परीक्षा घेतली जाते. थोडक्यात, चांगले कॉलेज मिळण्याकरिता चांगल्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उद्देश विद्यार्थ्यांसमोर असतो. यंदाच्या या नीट परीक्षेत सुमारे 23 लाख विद्यार्थी बसले होते.  नियोजित वेळेआधीच लागलेल्या या परीक्षेच्या निकालात 67 विद्यार्थ्यांनी 720 पैकी 720 गुण मिळवले. यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. पेपर फुटल्याचा आरोप देखील केला जातोय.  या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर अन् शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आहेत. परीक्षा घेणाऱ्या संस्थाच ' अपारदर्शक आणि दोषयुक्त ' असतील तर या लाखो विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर, हा मोठा प्रश्न. कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षांत विद्यार्थी मोठी ' बौद्धिक मेहनत ' घ...

88. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या परीक्षांत अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क मिळविले. पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक दालने खुले होतात. आपल्या पाल्याने नेमक्या कुठल्या दालनात शिरावे हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर्कबुद्धीच्या आधारे घेणे महत्वाचे. उच्च शिक्षणाचे पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोलात रस असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यास डोकेदुखीच ठरते. पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' टाळायलाच हवा. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे. या क्षेत्राची...

82. विकासाच्या वाटेवरील भारत!

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या " नागरी सेवा (Civil Services) " परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ज्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलीय त्यांचे अभिनंदन! मात्र जे या स्पर्धेत अपयशी ठरलेत, हा लेख त्यांच्याकरीता... भारतात मोठ्या संख्येने तरुणवर्ग या परीक्षेची तयारी करीत असतो. कित्येक वर्षांची मेहनत यात गुंतलेली असते. आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी लाखों रुपयांचे शिकवणी क्लासेस लावतात, तर काही विद्यार्थी क्लासेस न लावता अभ्यास करतात. शिकण्यासाठी पैसा तर लागणारच, त्यासाठी पैसा जमवून ठेवणे इष्टच. शिक्षणावरील खर्च हा खर्च नसून गुंतवणूक ठरते. क्लासेस लावलेले असो वा नसो UPSC सर्वांनाच समान संधी देते. यामुळेच निकालपत्रात क्लासेस लावलेले अन् न लावलेले दोन्ही विद्यार्थी झळकतात. आयोगानुसार, गतसाली या परिक्षेकरिता 10,16,850 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापैकी 5,92,141 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस हजर होते. यापैकी 14,624 उमेदवार मुख्य (लेखी) परीक्षेस पात्र ठरले. शेवटी 2,855 उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी / Personality Test पार पडल्यावर 1016 उमेदवारांची अंतिम निकालपत्र...

45. विकासाच्या वाटेवरील भारत!

"ज्ञान बाटने से बढ़ता हैं।" हे सूत्र अनेकदा आपल्या कानावर पडत असते. पण हे ज्ञान वाटायला कुणाला वेळ मिळेना... अन् हल्ली मोठ-मोठ्या शाळा, संस्था ज्ञान वाटण्यासाठी भली-मोठ्ठी रक्कम घ्यायला लागल्या. आपल्याकडे फक्त नोकरीसाठी शिक्षण देण्यात येते आणि घेण्यात येते. घेतलेलं शिक्षण/ज्ञान आपण इतरांपर्यंत पोहोचवत नाही. नोकरी लागली की त्या शिक्षणाला आपण स्थगिती देतो. 'खरेतर शिक्षण केवळ पद-पैसा-प्रतिष्ठा मिळविण्याकरिता नसून, घेतलेलं शिक्षण हे समाजकार्यासाठी, समाजकल्याणासाठी असावे.' कारण प्रत्येक नागरिक आपल्या समूहाचे प्रतिनिधित्व करीत असतो. परिणामी 'स्वार्थी शिक्षण' घेऊन त्याने केवळ आपला संसार सुखकर न करता समाजाचाही विचार करावा. माझी विवेकी तरुण वर्गाला विनंती असेल, तुम्ही साचवलेलं ज्ञान मर्यादित ठेऊ नका. व्यक्त व्हायला शिका, लिहायला शिका, स्वतःची वैचारिक पातळी वाढवा, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, संस्कृती, विज्ञान, पर्यावरण ई. क्षेत्रांमध्ये निर्भीडपणे आपले मत मांडा, प्रत्येक मुद्द्याची तार्किक तपासणी करा. सोशल मीडियाची अनेक व्यासपीठे (Platforms) तुमच्यास...

19. विकासाच्या वाटेवरील भारत!

काही दिवसांपूर्वी 'केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षणावरील अखिल भारतीय सर्वेक्षण' ( AISHE ) ने 2020-21 चा अहवाल प्रकाशित केला आहे.  "अहवालानुसार" -  2019-20 ची तुलना करता 2020-21 मध्ये देशभरातील विद्यार्थी नोंदणीत 7.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंडरग्रेजुएट स्तरावर सर्वाधिक नावनोंदणी आढळून आलेली दिसते. उच्च शिक्षण कार्यक्रमांमध्ये महिलांची नोंदणी, 2019-20 मध्ये 45% होती, ती 2020-21 मध्ये एकूण नोंदणीच्या 49% पर्यंत वाढली आहे. हे उल्लेखनीय. तथापि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या शाखेत स्त्रियांची नावनोंदणी पुरुषांपेक्षा मागे असलेली आढळते. तसेच इतर काही विवेचन या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचा आपण आढावा घेणे गरजेचे. नावनोंदणीची आकडेवारी वाढली म्हणजे तरूणांमध्ये शिक्षणाचे/साक्षरतेचे प्रमाण वाढले या निष्कर्षाला जाणे चुकीचे ठरेल.  'नोकरीसाठी शिक्षण' ही भूमिका असलेल्या तरुणाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यालये/महाविद्यालयांची गुणवत्ता, शिक्षणाचे व्यावसायिकीकरण, अपुऱ्या पायाभूत सुविधा, खाजगी क्षेत्रातील शिक्षणामध्ये भ्रष्टाच...

1. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताच्या विकसिततेच्या वाटेवरील सर्वात मोठे शिखर म्हणजे शिक्षण . आपल्या 130 कोटींहून अधिक नागरिकांच्या देशात शिक्षणासाठी सरकारी तरतूद अडीच टक्के इतकीही नाही. त्या तुलनेत चीन, अमेरिका आदी देशांत शिक्षणासाठी दोन आकडी टक्क्यांनी भरीव तरतूद असते. अनेकानेक भारतीयांस परदेशांत शिक्षणासाठी जावेसे वाटते ते केवळ यामुळे. तेव्हा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील अधिकाधिक वाटा शिक्षणासाठी कसा खर्च होईल याची तजवीज करावी लागेल. शिक्षणातील सकारात्मक बदल प्रत्यक्षात येण्यासही बराच कालावधी लागतो. आज जर गुंतवणूक केली तर तिची फळे दहा-पंधरा वर्षांनी दिसू लागतील. पण प्रत्यक्षात आज आपण फक्त करत आहोत ती चर्चा. प्रत्यक्ष गुंतवणूक बदल शून्य आहे. विकासाचे हे शिखर प्रत्यक्षात गाठण्यासाठी चर्चा आणि गुंतवणूक यातली तफावत कमी करणे महत्वाचे ठरेल.! ~ सचिन विलास बोर्डे 1/1 Education | GDP | Investment  NEXT 🔹 PREVIOUS