Posts

Showing posts with the label History

151. विकासाच्या वाटेवरील भारत!

दोन दिवसांपूर्वी आपण 79 वा " स्वातंत्र्य दिवस " साजरा केला. हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेकांनी रक्ताचं अन् अनेकांनी पेनाच्या शाईचं योगदान दिलं. तुम्हा-आम्हाला अन् आपल्या भारताला पारतंत्र्यातून मुक्त केलं. हाच 78 वर्षांचा ' स्वातंत्र्य प्रवास ' आजच्या लेखातून समजून घेऊया... इतिहासात डोकावल्यास भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ' भारतीय राष्ट्रवादाचं ' महत्व लक्षात घेता येतं. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या तत्कालीन बुद्धिजीवींनी, समाजसुधारकांनी, क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेचे शोषक रूप अधोरेखित केले. त्यातून भारतीय राष्ट्रवादाची पायाभरणी झाली. या राष्ट्रवादी विचाराने स्वातंत्र्याच्या ध्येयावर भर दिला. अन् 1947 ला हे ध्येय पूर्ण केले. 1947 नंतर स्वतंत्र भारताने स्वतंत्रपणे आपले ध्येय-धोरणे आखायला सुरुवात केली. या 78 वर्षांच्या कालावधीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जनता पक्ष, जनता दल, भारतीय जनता पक्ष इत्यादी राजकीय पक्ष सत्तेत आले. सत्तास्थानी आलेल्या पक्षांनी भारताच्या विकासानुरूप विविध उपाय-योजना आखल्या. या पक्षांच्या ध्येय-धोरणांच्या यशापयशावरच आजच्या भारताला आपली ...

145. विकासाच्या वाटेवरील भारत!

संतांची भूमी या नावे महाराष्ट्र ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूमीवर या संतांनी ' कीर्तनातून अन् अभंगांची ' रचना करून समाज सुधारणेचं अन् समाज प्रबोधनाचं कार्य हाती घेतलं. हीच बाब पुढील दोन अभंगातून समजून घेऊया... अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर प्रहार करत तेराव्या शतकातील " संत नामदेव " लिहितात, पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥१॥ भजन चालिलें उफराटें । कोण जाणे खरें खोटें ॥२॥ सजि-वासी हाणी लाथा । निर्जिवपायीं ठेवी माथा ॥३॥ सजीव तुळसी तोडा । पूजा निर्जिव दगडा ॥४॥ वेला करी तोडातोडी । शिवा लाखोली रोकडी ॥५॥ तोंड धरून मेंढा मारा । म्हणति सोमयाग करा ॥६॥ सिंदूर माखूनियां धोंडा । त्यासि भजती पोरेंरांडा ॥७॥ अग्निहोत्राचा सुकळ । कुश पिंपळाचा काळ ॥८। एत्तिकेची पूजा नाना । जित्या नागा घेती डांगा ॥९॥ नामा ह्मणे अवघें खोटें । एक हरिनाम गोमटें ॥१०॥ या अभंगातून नामदेव ' दगडाच्या देवाला ' नाकारतात अन् या दगडी देवाच्या अवतीभवती असलेल्या ' अंधश्रद्धेची ' चिरफाड करतात. नामदेवांच्या अभंगामुळे तुम्ही दगडी देव नाकारला तर ' अस्सल देव ' शोधणार कुठं? या ...

130. विकासाच्या वाटेवरील भारत!

सदरील लेखातून कुठल्याही समाज घटकाच्या भावना दुखविण्याचा हेतू नाही. " फोडा आणि राज्य करा " ही संकल्पना कशी कार्य करते हेच समजण्याकरिता सदरील लेख प्रकाशित करीत आहे. एकेकाळी मनुष्याने ' दगडावर दगड घासून ' आगीचा शोध लावला होता. या आगीच्या शोधाने सर्वच मनुष्याच्या प्रगतीस सहाय्य पुरविले. अन् आजच्या तंत्रज्ञान विकसित केलेल्या आधुनिक मनुष्याला आग निर्माण करण्याकरिता दगडावर दगड घासण्याची गरज राहिलेली नाही. आजचा हा प्रगत मनुष्य ' धर्मावर धर्म घासून ' आग निर्माण करताना दिसतोय. याच आगीला दंगलीचे नाव दिले गेले. दगडावर दगड घासून लागलेल्या आगीने मानवजातीला प्रगतीचा मार्ग दाखविला. अन् धर्मावर धर्म घासून लागलेल्या आगीने मानवजातीला अधोगतीकडे नेले. समजा, समाजात अ आणि ब असे दोन गट अस्तिवात असतील आणि तिसऱ्या क गटाला वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल तर अ आणि ब या दोन गटात फूट पाडली जाते. अ आणि ब गट एकमेकांवरच दगडफेक करण्यात व्यस्त राहतो. क गट कायम वर्चस्वस्थानी राहण्याकरिता फोडा आणि राज्य करा हे धोरण हाती घेतो. वर्षानुवर्षांपासून भारतीय समाजाची जाती, धर्म, धार्मिक स्थळे, मंदिरे, ...

129. विकासाच्या वाटेवरील भारत!

सोळाव्या शतकात पुण्याजवळील देहू येथे ' तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) ' यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात " तुका, तुकोबा, तुकोबाराया " म्हणून ओळख मिळाली. सोळाव्या शतकातील समाजाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. समाजातील समाज-जीवन, चाली-रीती, रूढी-परंपरा यावर आपले विचार अभिव्यक्त करण्याकरिता तसेच समाजसुधारणेकरिता, समाज प्रबोधनाकरिता अन् समाजाला योग्य दिशा देण्याकरिता त्यांनी हजारो " अभंगांची " रचना केली. संत तुकारामांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. त्याकाळी 'नवस केल्याने लेकरं होतात' असा गैरसमज रुजला होता अन् रुजवला गेला होता. यावर तुकोबांनी आपले मत मांडले. ते म्हणतात, " नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती।। " अर्थात नवस केल्याने लेकरं झाली असती तर नवरा करण्याची गरज काय? असा प्रश्न तुकोबांनी उपस्थित केला. यातून त्यांची तार्किक बुद्धी अन् वैज्ञानिक दृष्टिकोन अधोरेखित होतो. समाजातील सर्वांनाच समान हक्क-अधिकार असावते या दृष्टिकोनातून ते लिहितात, " ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार। बाळें नारीन...

128. विकासाच्या वाटेवरील भारत!

8 मार्चला जगभर " जागतिक महिला दिन " साजरा केला जातो. जगभरातील महिलांना या एकाच दिनी भरपूर महत्व अन् विशेष वागणूक दिली जाते. सर्वच समाज माध्यमांवर शुभेच्छावर्षाव केला जातो. मात्र इतक्याच बाबी पार पाडून महिलांचा विकास आणि महिलांचं सक्षमीकरण शक्य होईल का? हा प्रश्न उरतोच... इतिहास काळापासूनच महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या व्यवस्थेने महिलांना ' मूलभूत हक्क नसलेली शोषक समाजरचना ' निर्माण केली. या व्यवस्थेने पुरुषांना श्रेष्ठत्व प्रदान केले. ज्यातून ' पुरुषसत्ताक व्यवस्थेने ' डोके वर काढले. स्त्रियांना पुरुषांची लालसा भागविणारी गुलाम अन् मुलांना जन्माला घालणारे एक यंत्र अथवा साधन मानले जाऊ लागले. नंतरच्या काळात अनेकांच्या प्रयत्नाने स्त्री-पुरूष समान असलेली व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला गेला. संविधानाच्या चौकटीत ही समतेची व्यवस्था साकारली गेली. आज बोटावर मोजता येतील इतक्या महिलांनी भली-मोठी प्रगती केली यावरून भारतातील सगळ्याच महिला प्रगत झाल्या असा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. आजही स्त्रियांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. विविध रूपातून या समस्या समोर येत आहेत. म...

126. विकासाच्या वाटेवरील भारत!

23 फेब्रुवारी 1873 रोजी अमरावती जिल्ह्यात डेबूजी झिंगराजी जानोरकर यांचा जन्म झाला. ज्यांना नंतरच्या काळात " गाडगे बाबा " म्हणून ओळख मिळाली. घरा-दाराचा, बायको-लेकरांचा त्याग करून कीर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य त्यांनी केले. महाराष्ट्रातल्या विविध गावांमध्ये त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय, अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट रूढी परंपरांचे उच्चाटन अशा विविध विषयांवर समाजप्रबोधन केले. गाडगे बाबा दिवसभर गावाची सफाई करायचे अन् रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या डोक्यातल्या वाईट विचारांची सफाई करायचे. ' लोकांनी आपल्या परिसराच्या स्वच्छतेसोबतच विचारांच्या स्वच्छतेलाही पुरेसे महत्व द्यावे ' ही गाडगे बाबांच्या समाजकार्यामागील प्रेरणा होती. साध्या-सोप्या भाषेत कीर्तन करून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलेले दिसते. त्यांच्या कीर्तनातील छोटासा मजकूर याठिकाणी नमूद करतो... ते सांगतात, " बापहो, आता तरी सुधरा, आता तरी मुलाले शिक्षण द्या, पैसे नसतील तर जेवणाचं ताट मोडा... हातावर भाकरी खा, बायकोला लुगडं कमी भावाचं घ्या पण मुलाले शिक्षण दिल्याशिवाय सोडू न...

122. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारताला ब्रिटिशांच्या वर्चस्वातून मुक्त करण्याकरिता भारतीय राष्ट्रीय चळवळ उभी केली गेली. पुढे याच चळवळीतून ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ' ची स्थापना झाली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विविध योजना काँग्रेसने विविध अधिवेशनात मांडल्या. डिसेंबर 1929 मध्ये ' लाहोर अधिवेशन ' भरवले गेले. या अधिवेशनात 26 जानेवारी 1930 ला ' पूर्ण स्वराज्याचा ' ठराव पारित केला गेला. आणि पूर्ण स्वराज्याची मागणी केली गेली. (पूर्ण स्वराज्य म्हणजे ब्रिटिश राजवटीपासून पूर्णपणे स्वातंत्र्य.) थोडक्यात 26 जानेवारी 1930 या तारखेला काँग्रेसने स्वातंत्र्य दिन घोषित केला. याच दिवसाचे महत्व अधोरेखित करत 26 जानेवारी 1950 हा दिवस " प्रजासत्ताक दिन " म्हणून स्वीकार करण्यात आला. 26 नोव्हेंबर 1949 पासून केवळ नागरिकत्व, निवडणुका, संसद अशा तात्पुरत्या स्वरुपातील तरतुदींची अंमलबजावणी सुरू झाली. राज्यघटनेतील उर्वरित सर्व तरतुदींची आणि प्रजेच्या हाती सत्ता देणाऱ्या अन् लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या संविधानाची खरी अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. यामुळेच या दिनाला प्रजासत्ताक दिन म्हणून...

79. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकताच ' फुल्यांच्या ' जीवन-कार्यावर आधारित " सत्यशोधक " नामक चित्रपट बघितला. पुस्तकातील इतिहास वाचणे अनेकदा डोईजड जाते. हा मानवी गुणधर्मच. मात्र चित्रपटाच्या साहाय्याने हाच इतिहास समजून घेणे सोईचे होते. सत्यशोधक चित्रपट यामुळेच उल्लेखनीय ठरतो. या चित्रपटात फुले दाम्पत्याच्या महत्त्वपूर्ण संघर्षमय, सुधारणात्मक कार्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपट पाहताना जणूकाही आपणही त्या काळात वास्तव्य करतोय, फुले दाम्पत्याला प्रत्यक्षात पाहतोय, असा अनुभव येतो. दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांचे हे कौशल्य देखील उल्लेखनीयच.  स्वतःला 'आधुनिक (Modern)' म्हणवून घेणारे आपण, द्वेष निर्माण करणारे, हिसंक असलेले, अश्लीलता पसरवणाऱ्या चित्रपटांना अधिकचे प्राधान्य देतो. असे चित्रपट देशभर गाजतात. त्यातुलनेत इतिहासावर आधारित, सत्यावर आधारित, वैज्ञानिकतेवर आधारित चित्रपटांना आवश्यक तेवढी प्रसिध्दी मिळताना दिसत नाही. हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे. अनेकदा तथ्यावर आधारित चित्रपटांतही मनोरंजनाच्या अथवा इतर हेतूने काही बाबी नव्याने घातल्या जातात किंवा काढून टाकल्या जातात. पर...

76. विकासाच्या वाटेवरील भारत!

" एखाद्या समाजाची अथवा देशाची प्रगती ही तिथल्या महिलांच्या प्रगतीवरून ठरते ," हे वैश्विक सत्य. यामुळेच ' स्त्री-सक्षमीकरणाची ' चर्चा जागतिक पातळीवर केली जाते. इतिहासाची पाने चाळल्यानंतर आपणांस लक्षात येईल की, स्त्री-वर्गाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या हक्काचा वाटा मिळविण्याकरिता अनेकदा संघर्ष करावा लागला. एकोणिसाव्या शतकात ' स्त्रीवादाने ' वैचारिक तत्त्वज्ञान मांडून स्त्रियांच्या हक्कांच्या मागणीला व्यापकता प्रदान केली. भारतातील महिलांना देखील पुरुषांप्रमाणे हक्क-अधिकार असावेत, त्यांनीही शिक्षित व्हावे याकरिता ' सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुल्यांनी ' रुढीवादी व्यवस्थेला विरोध करत आधुनिक शैक्षणिक मूल्यांची सुरू केलेली चळवळ देखील अत्यंत महत्वपूर्ण बनली. शेवटी याच ऐतिहासिक जडणघडणींचा प्रभाव ' भारतीय संविधानावर ' पडला. यातून विविध हक्कांच्या व्यापक तरतुदी स्त्रियांसाठी करण्यात आल्या. परिणामी, (पुरुषसत्ताक व्यवस्थेत) महिलांनाही स्वतःच्या विकासाची/प्रगतीची संधी प्राप्त झाली. उपरोक्त सैद्धांतिक विश्लेषणानंतर वा...

41. विकासाच्या वाटेवरील भारत!

सध्याची राजकीय परिस्थिती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याविषयी लेख सादर करीत आहे. मानवाच्या ऐतिहासिक वर्तनाचा आढावा घेतल्यास एक बाब लक्षात येते. साधारणतः अश्मयुगाचा जर विचार केला तर त्यावेळी मानव जगण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून होता. पुढे मानवाच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा-भूक-वासना इत्यादींचा विकास होत गेला. या बाबी शमविण्यासाठी तो शक्य तेवढी नैसर्गिक साधने जमवायला लागला. ज्यांच्याकडे अधिक साधने होती तो व्यक्ती अथवा गट कमी संसाधने असणाऱ्या गटावर अधिपत्य/सत्ता गाजवायला लागला. अन् यातून जन्म झाला असमानतेचा . अर्थातच त्याठिकाणी राजकारण/सत्ताकारण सुरू झाले. आज उत्तर-आधुनिक जगात आपण जगतोय. मानवाच्या गरजा देखील वाढल्या. अन् गरज पूर्तीसाठी, संरक्षणासाठी मानवाने एक प्रबळ राज्यसंस्था निर्माण केली. मात्र राज्यसंस्था केवळ सत्तेचा हाव असणाऱ्यांच्या हातातील बाहुले बनली. महाराष्ट्रातील राजकारण एक उत्तम उदाहरण ठरेल. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी बघता प्रश्न पडतो, हा राजकीय गदारोळ खरच जनकल्याणासाठी आहे काय? की केवळ सत्तेच्या खुर्चीसाठी हा खटाटोप सूरुय... शेतकरी आत्महत्या करतोय, महिलांवर हो...