172. विकासाच्या वाटेवरील भारत!

अमेरिकेत सध्या "आयात शुल्काचं एक विधेयक" चर्चेत आहे. आयात शुल्क म्हणजे इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. स्थानिक, देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी आयात शुल्क आकारण्यात येतो.

अमेरिकेच्या या विधेयकानुसार रशियाकडून तेल, वायू, युरेनियम तसेच इतर वस्तू खरेदी करणाऱ्या देशांविरोधात अमेरिकेला 500 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याचा अधिकार मिळेल.

भारताचा अमेरिकेशी व्यापार -
2024-25 च्या आकडेवारीनुसार, दोन्ही देशांचे एकूण व्यापार मूल्य 132.2 अब्ज डॉलर्स इतके आहे. यात 86.5 अब्ज डॉलर्सची निर्यात भारताने अमेरिकेला केली आहे. 45.7 अब्ज डॉलर्सची आयात भारताने अमेरिकेकडून केली आहे. औषधे, हिरे, दागिने, यंत्रसामग्री, आयटी सेवा इत्यादींची निर्यात भारत करतो. कच्चे तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, विमाने इत्यादींची आयात भारत करतो.

भारताचा रशियाशी व्यापार -
2024-25 च्या आकडेवारीनुसार, दोन्ही देशांचे एकूण व्यापार मूल्य 68.7 अब्ज डॉलर्स इतके आहे. यात 4.9 अब्ज डॉलर्सची निर्यात भारताने रशियाला केली आहे. 63.8 अब्ज डॉलर्सची आयात भारताने रशियाकडून केली आहे. औषधे, रसायने, अभियांत्रिकी वस्तू, सागरी उत्पादने इत्यादींची निर्यात भारत करतो. कच्चे तेल, खते, कोळसा इत्यादींची आयात भारत करतो.

रशियाकडून होणाऱ्या आयातीवर अन् अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर या विधेयकाचा परिणाम होणार आहे. यामुळेच दोन्ही देशांशी व्यापार करताना भारताला आता दुहेरी समतोल अन् दुहेरी कसरत करावी लागणार आहे..!

~ सचिन विलास बोर्डे

40/2

America | USA | Russia | Tariff | Import Duty | Economy | Economics | Trade | Trade War | Bilateral Trade | Trade War | Import | Export | Geopolitics | Political Economy | Global Economy | International Relations | Global Politics | Economic Crisis


Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!