105. विकासाच्या वाटेवरील भारत!
"चाइल्ड पोर्नोग्राफी" डाऊनलोड करणे, पाहणे, अशी सामग्री इतरांना शेअर करणे अथवा स्वतः जवळ बाळगणे हा 'लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) 2012' अंतर्गत गुन्हा असल्याचा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला.
चाइल्ड पोर्नोग्राफी (CSEAM) मुळे बालकांच्या शोषणाच्या गुन्ह्यांत वाढ होते. यातून बालकांच्या भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. बऱ्याचदा बलात्काराची प्रकरणे देखील घडतात. (ज्याचे सखोल विश्लेषण मी लेख क्र. 23/3 आणि 23/4 मध्ये नमूद केले होते.)
चाइल्ड पोर्नोग्राफीची भयानकता लक्षात घेऊनच अशा गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता न्यायालयाने काही महत्वपूर्ण निरीक्षणे देखील नोंदविली. संसदेने POCSO कायद्यात तातडीने दुरुस्त्या कराव्यात, अशी लैंगिक गुन्हेगारी कमी करण्याकरिता लैंगिक शिक्षणावर भर दिला जावा, लैंगिक आरोग्यासंबधी गैरसमज दूर केले जावे.
आजही भारतीय समाजात 'लैंगिक शिक्षण' हा विषय केवळ कुजबुजीपुरता मर्यादित ठेवला जातो. परिणामी तारुण्यात/वयात येणाऱ्या तरुणांमध्ये पुरेशा माहितीचा अभाव असतो. यातून अनेक समस्या विविध रूपाने समोर येतात. यामुळेच लेकरांना लैंगिक शिक्षण मिळण्याची गरज अधोरेखित होते.
न्यायालयाने निर्देशित केलेल्या या बाबींवर शासनाने, समाजाने अन् देशातील प्रत्येक नागरिकाने लक्ष पुरवायला हवे आणि त्यादिशेने मार्गक्रमण करायला हवे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतूनच या समस्येची सोडवणूक होऊ शकेल..!
~ सचिन विलास बोर्डे
24/5
Supreme Court Judgement | Sexual Assault | Sexual Harrasment | Child Sexual Exploitative and Abuse Material (CSEAM) | Crimes Against Children | Children Safety | Sex Education | POCSO Act 2012 |
Comments
Post a Comment