166. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेख क्र. 38/4 मध्ये आपण " वासना (Lust) " या विषयाचे चिकित्सक विश्लेषण बघितले. आजच्या लेखातून उर्वरित मुद्द्यांची चर्चा करूया... वासनेच्या उत्पत्तीला आपण ' नैसर्गिक ' आणि ' कृत्रिम ' या दोन घटकांत वर्गीकृत केले होते. नैसर्गिकरीत्या हार्मोन्सच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या लैंगिक इच्छेस मर्यादा होत्या. मात्र हल्लीच्या मानवजातीने अश्लील साहित्यांचा आधार घेऊन लैंगिक इच्छेस ' अमर्याद ' आणि ' कृत्रिम ' स्वरूप दिले आहे. याच अमर्याद लैंगिक इच्छांमुळे ' लैंगिक गुन्हेगारी (Sexual Offenses) ' चा जन्म होतोय. विनयभंग, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मानवी तस्करी इत्यादी स्वरूपातले गुन्हे घडताय. मानवजातीचा ' विवेक (Reason) अन् नैतिकता (Morality) ' नष्ट झाल्याचा हा परिणाम. हे गुन्हे दिवसेंदिवस नवनवे रूपे घेताना दिसताय. परिणामी लैंगिक गुन्हेगारीला आटोक्यात आणण्याकरिता वासनेला अन् लैंगिक इच्छेला मर्यादा घालाव्या लागतील. सोबतच मानवी विवेक अन् नैतिकता विकसित करावी लागेल. देशाच्या भविष्याला आकार देणाऱ्या शाळा, महाविद्यालये इत्यादींसा...