Posts

Showing posts with the label Crimes

148. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 34/3 मध्ये आपण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला होता. आजच्या लेखातून " दारू अथवा मद्यपानाच्या " सेवनाने होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया... भारताची स्थिती - केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या "राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey- NFHS -5)" नुसार, देशातील 22% पुरुषांना आणि 1% स्त्रीयांना दारूचे व्यसन असल्याचे दिसते. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, तेलंगणा या राज्यांत दारूचे व्यसन असणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवाल दर्शवित असला तरी, दारू पिणाऱ्यांची संख्या इतरही राज्यात आहेच. स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक छळांच्या प्रकरणांत 71% प्रकरणांमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या छळास ' मद्यपान करणारा पती ' जबाबदार असल्याचेही अहवाल अधोरेखित करतो. मद्यपानाचे/दारूचे/अल्कोहोलचे दुष्परिणाम - दारूच्या व्यसनाने यकृताचे आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोग, कर्करोग, पचनसंस्थेविषयक समस्या, मेंदू आणि मज्जासंस्थेविषयक समस्या, ताण-तणाव, इत्या...

105. विकासाच्या वाटेवरील भारत!

" चाइल्ड पोर्नोग्राफी " डाऊनलोड करणे, पाहणे, अशी सामग्री इतरांना शेअर करणे अथवा स्वतः जवळ बाळगणे हा ' लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) 2012 ' अंतर्गत गुन्हा असल्याचा निर्णय अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला. चाइल्ड पोर्नोग्राफी (CSEAM) मुळे बालकांच्या शोषणाच्या गुन्ह्यांत वाढ होते. यातून बालकांच्या भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतात. बऱ्याचदा बलात्काराची प्रकरणे देखील घडतात. (ज्याचे सखोल विश्लेषण मी लेख क्र. 23/3 आणि 23/4 मध्ये नमूद केले होते.) चाइल्ड पोर्नोग्राफीची भयानकता लक्षात घेऊनच अशा गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता न्यायालयाने काही महत्वपूर्ण निरीक्षणे देखील नोंदविली. संसदेने POCSO कायद्यात तातडीने दुरुस्त्या कराव्यात, अशी लैंगिक गुन्हेगारी कमी करण्याकरिता लैंगिक शिक्षणावर भर दिला जावा, लैंगिक आरोग्यासंबधी गैरसमज दूर केले जावे. आजही भारतीय समाजात ' लैंगिक शिक्षण ' हा विषय केवळ कुजबुजीपुरता मर्यादित ठेवला जातो. परिणामी तारुण्यात/वयात येणाऱ्या तरुणांमध्ये पुरेशा माहितीचा अभाव असतो. यातून अनेक समस्या विविध रूपाने समोर येतात. ...

99. विकासाच्या वाटेवरील भारत!

कोलकात्त्यातील ' आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यायात ' घडलेल्या अमानवीय घटनेचा या लेखाच्या माध्यमातून निषेध नोंदवित आहे. तसेच " बलात्काराची प्रकरणे का थांबत नाहीये? " या मुख्य प्रश्नाचे विश्लेषण दोन भागांत प्रकाशित करीत आहे. आजच्या पहिल्या भागातील लेख क्र. 23/3 मध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणे का वाढलीय? या प्रकरणांत न्याय मिळण्यास विलंब का होतोय? हे दोन उपप्रश्न विचारात घेऊया. आणि दुसऱ्या भागातील लेख क्र. 23/4 मध्ये बलात्काराची प्रकरणे कशी थांबवता येतील? यावर उपाय-योजना काय? या दोन उपप्रश्नांची चिकित्सा करूया... 1. बलात्कार आणि हत्या प्रकरणे का वाढलीय? शालेय जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष, अश्लील चित्रफितींचा प्रभाव आणि कायदे/नियमांचे भय नसणे या कारणांमुळे बलात्काराच्या गुन्ह्यांची सतत पुनरावृत्ती होत आहे. यापैकी " अश्लील चित्रफिती (Pornography) " हे प्रमुख कारण. हल्ली '13-14 वयापासूनच' मुला-मुलींकडे स्मार्टफोन्स असतात. स्वतः अथवा मित्र-मैत्रिणींकडून या लेकरांना अश्लील चित्रफितींबद्दल समजते. वयासोबत यांचे धाडसही वाढत जाते. यामुळेच 'अल्पवयीन मुल...