99. विकासाच्या वाटेवरील भारत!

कोलकात्त्यातील 'आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यायात' घडलेल्या अमानवीय घटनेचा या लेखाच्या माध्यमातून निषेध नोंदवित आहे. तसेच "बलात्काराची प्रकरणे का थांबत नाहीये?" या मुख्य प्रश्नाचे विश्लेषण दोन भागांत प्रकाशित करीत आहे.

आजच्या पहिल्या भागातील लेख क्र. 23/3 मध्ये बलात्कार आणि हत्या प्रकरणे का वाढलीय? या प्रकरणांत न्याय मिळण्यास विलंब का होतोय? हे दोन उपप्रश्न विचारात घेऊया. आणि दुसऱ्या भागातील लेख क्र. 23/4 मध्ये बलात्काराची प्रकरणे कशी थांबवता येतील? यावर उपाय-योजना काय? या दोन उपप्रश्नांची चिकित्सा करूया...

1. बलात्कार आणि हत्या प्रकरणे का वाढलीय?
शालेय जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष, अश्लील चित्रफितींचा प्रभाव आणि कायदे/नियमांचे भय नसणे या कारणांमुळे बलात्काराच्या गुन्ह्यांची सतत पुनरावृत्ती होत आहे. यापैकी "अश्लील चित्रफिती (Pornography)" हे प्रमुख कारण. हल्ली '13-14 वयापासूनच' मुला-मुलींकडे स्मार्टफोन्स असतात. स्वतः अथवा मित्र-मैत्रिणींकडून या लेकरांना अश्लील चित्रफितींबद्दल समजते. वयासोबत यांचे धाडसही वाढत जाते. यामुळेच 'अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे' वृत्त अनेकदा वाचनात येतात.
अश्लील चित्रफितींमुळे नैतिकता, मानसिकता, पाहण्याची दृष्टी कमालीची दूषित होते. परिणामी स्त्रियांची छेड काढणे, विनयभंग, बलात्कार आणि हत्येचे गुन्हे घडताय.

2. न्याय मिळण्यास विलंब का होतोय?
साधारणपणे गुन्हा घडल्यानंतर पोलिस यंत्रणेद्वारे तपास होऊन आरोपीस अटक केल्या जाते. नंतर पुरेश्या पुराव्यानिशी न्यायालय आरोपीस शिक्षा सुणावते. मात्र गुन्ह्यांत 'बड्या लोकांची मुले' असल्यास, गुन्हेगारांचे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यास या तपास यंत्रणा FIR दाखल न करणे, पुरावे नष्ट करणे, धमकाविणे अशा माध्यमातून गुन्हेगारांचे बचावकार्यच हाती घेतात. 'कितीही कठोर कायदे केले अन् अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणाच भ्रष्ट असतील तर असे कायदे अप्रभावी ठरणारच.' यामुळेच न्याय मिळण्यास विलंब होताना दिसतोय.

उर्वरित चर्चा पुढील लेखात करूया..!


~ सचिन विलास बोर्डे

23/3

Kolkata | R. G. Kar Hospital | Doctors Protest | Crimes Against Women | Root Cause Of Rape Cases | Justice Delayed | Women Safety 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!