71. विकासाच्या वाटेवरील भारत!

"सर्वाइकल कॅन्सर (Cervical Cancer)" हा या आठवड्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात देखील याविषयीचे वक्तव्य करण्यात आले आहे. 'केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी लसीकरणावर भर देणार,' अशी घोषणा करण्यात आली आहे.

मुळात, सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय?, त्याची लागण कशी होते?, त्यावरील उपाय-योजना काय? या प्रश्नांची उकल करण्याकरिता सदरील लेख प्रस्तुत करीत आहे.

प्रामुख्याने Human Papillomavirus (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे गर्भाशयाच्या मुखामध्ये हा कर्करोग होतो यालाच सर्वाइकल कॅन्सर म्हणतात. हा विषाणू लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास या विषाणूची लागण जलदगतीने होते.

लक्षणांविषयी - 
1. पाठ, पाय किंवा ओटीपोटात (Pelvis) सतत वेदना.
2. लैंगिक संभोगादरम्यान वेदना.
3. लैंगिक संभोगानंतर असामान्य रक्तस्राव (Bleeding).
4. मासिक पाळीदरम्यान जास्त काळासाठी रक्तस्राव.
5. रजोनिवृत्ती (Menopause) नंतर असामान्य रक्तस्त्राव.
6. वजन कमी होणे, थकवा आणि भूक न लागणे. इत्यादी...

उपाययोजने विषयी - 
उपरोल्लेखित लक्षणे जाणवल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. वयाच्या 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींचे लसीकरण करणे हा HPV संसर्ग रोखण्याचा एक अतिशय प्रभावी मार्ग आहे.

गर्भाशयाच्या कॅन्सरची स्थिती समजण्याकरिता नियमित पॅप चाचण्या (Pap Smear Test) करणे गरजेचे आहे. सुरक्षित लैंगिक संबंध. इत्यादी...

थोडक्यात, 'माझी सुरक्षा माझी जबाबदारी' हे सूत्र अंगीकारणे अत्यावश्यक ठरते..!

~ सचिन विलास बोर्डे

17/1

Cervical Cancer | Human Papillomavirus (HPV) | Menstruation | Interim Budget | Health | Women Empowerment | Society | Awareness

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!