Posts

Showing posts with the label Menstruation

175. विकासाच्या वाटेवरील भारत!

दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर महत्वपूर्ण निर्देशात्मक निर्वाळा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेले महत्वपूर्ण निरीक्षणे, आदेश आणि निर्देश या लेखातून समजून घेऊया... शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींना " मासिक पाळी विषयक आरोग्य (Menstrual Health) आणि मासिक पाळीविषयक स्वच्छता व्यवस्थापनाची (Menstrual Hygiene Management-MHM) उपलब्धता " हे भारतीय राज्यघटनेच्या ' कलम 21 अंतर्गत प्रतिष्ठापूर्वक जगण्याच्या अधिकाराचा (Right To Life & Dignity)' भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. शाळांमध्ये अपुऱ्या सुविधा, योग्य सॅनिटरी उत्पादनांची कमतरता किंवा गोपनियतेचा हक्क नाकारल्याने मुलींना त्यांच्या शरीराची देखरेख त्यांच्या मनाऐवजी परिस्थितीनुसार करावी लागते. जेव्हा मुलींना कार्यक्षम स्वच्छतागृहे, पुरेशी सॅनिटरी उत्पादने, पाण्याची उपलब्धता आणि विल्हेवाटीची यंत्रणा उपलब्ध असेल, तेव्हाच विद्यार्थिनींना त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेच्या अधिकाराचा अर्थपूर्ण वापर करता येईल. न्यायालयाचे मते, शाळांमध्ये या सुविधांचा अभाव असणे हे विद्यार्थिनी...

139. विकासाच्या वाटेवरील भारत!

स्त्रियांच्या जीवनातला एक अविभाज्य नैसर्गिक शरीरधर्म म्हणजेच ' मासिक पाळी! ' हा विषय अनेक वर्षे केवळ कुजबुजीपुरता मर्यादित राहिला. अलीकडच्या काही काळात या विषयावर थोडीबहुत चर्चा होताना दिसतेय. (मासिक पाळीविषयक काही महत्त्वपूर्ण मुद्दे मी लेख क्र. 2/1 मध्ये मांडले होते. वाचकांनी तेही मुद्दे आवर्जून वाचावेत.) आजच्या लेखातून मासिक पाळीविषयक अनेकदा चर्चेत येणाऱ्या रजेच्या मुद्द्याचा थोडक्यात आढावा घेऊया... मासिक पाळीदरम्यानच्या कालावधीत संबंधित स्त्रीला चार ते पाच दिवसाची " मासिक पाळी रजा (Menstrual Leave) " मिळावी या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून दावे-प्रतिदावे मांडले जात आहेत. शिक्षण घेणाऱ्या मुली, खाजगी किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रीया यांना चार दिवसांची रजा मिळायला हवी अशी मागणीही अनेकदा होते. बिहार, केरळ, ओरिसा, सिक्कीम, कर्नाटक या राज्यांच्या शासन-प्रशासनाने अलीकडच्या काही काळात मासिक पाळीदरम्यान रजा/सुट्टी देणारी धोरणे राबविली आहेत. काही खाजगी कंपन्याही या स्वरूपाच्या रजा देतात. जपान, साऊथ कोरिया, इंडोनेशिया, झांबिया, तैवान इत्यादी देशांनी मासिक पाळीदरम्यानच्या ...

71. विकासाच्या वाटेवरील भारत!

"सर्वाइकल कॅन्सर (Cervical Cancer)" हा या आठवड्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. अंतरिम अर्थसंकल्पीय भाषणात देखील याविषयीचे वक्तव्य करण्यात आले आहे. 'केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना सर्वाइकल कॅन्सरपासून वाचवण्यासाठी लसीकरणावर भर देणार,' अशी घोषणा करण्यात आली आहे. मुळात, सर्वाइकल कॅन्सर म्हणजे काय?, त्याची लागण कशी होते?, त्यावरील उपाय-योजना काय? या प्रश्नांची उकल करण्याकरिता सदरील लेख प्रस्तुत करीत आहे. प्रामुख्याने Human Papillomavirus (HPV) या विषाणूच्या इन्फेक्शनमुळे गर्भाशयाच्या मुखामध्ये हा कर्करोग होतो यालाच सर्वाइकल कॅन्सर म्हणतात. हा विषाणू लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास या विषाणूची लागण जलदगतीने होते. लक्षणांविषयी -  1. पाठ, पाय किंवा ओटीपोटात ( Pelvis ) सतत वेदना. 2. लैंगिक संभोगादरम्यान वेदना. 3. लैंगिक संभोगानंतर असामान्य रक्तस्राव (Bleeding). 4. मासिक पाळी दरम्यान जास्त काळासाठी रक्तस्राव. 5. रजोनिवृत्ती ( Menopause ) नंतर असामान्य रक्तस्त्राव. 6. वजन कमी होणे, थकवा आणि भूक न लागणे. इत्यादी... उपाययोजने विषयी -  उपरोल्...

6. विकासाच्या वाटेवरील भारत!

स्त्रीजीवनाचा एक अविभाज्य, अपरिहार्य घटक म्हणजेच मासिक पाळी ! खरेतर मासिक पाळी हा शब्द उच्चारणे लज्जास्पद नव्हे. हा एक साधा शरीरधर्म आहे. ह्या नैसर्गिक चक्राला आपण अंधश्रध्देचा आणि अपवित्रतेचा आयाम जोडलाय. मुळात हीच लाजिरवाणी बाब होय... महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणारे आपण, अशा गोष्टी आल्या की मात्र गप्प. मासिक पाळी दरम्यानच्या दिवसांत स्त्रियांना शारीरिक तथा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अलिखित सामाजिक बंदी असल्याने याविषयी चर्चा होत नाही. ' राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार ' भारतातील 64 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात, 50 टक्के महिला कापडाचा वापर करतात. यात पुन्हा ग्रामीण आणि शहरी भागात तफावत दिसते. ग्रामीण क्षेत्रातील किशोरवयीन तरुणी आणि स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान वापरायची योग्य त्या साधनांची उपलब्धता / माहिती नसते. ज्यातून विवध आजारांना सामोरे जावे लागते... (उदा. Reproductive Tract Infections , Bacterial Vaginosis , Urinary Tract Infections , Pelvic Infections , Cervical Cancer ) भारतातील सुमारे 23 दशलक्ष मुली मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन ( MHM ) ...