179. विकासाच्या वाटेवरील भारत!

अठरा जानेवारीच्या 'लेख क्र. 40/3' मध्ये आपण 'इराणमधल्या राजकीय अन् आर्थिक उलथापालथी' समजून घेतल्या होत्या.

अर्थव्यवस्थेत झालेल्या विस्कळीतपणाला आणि समाजजीवनात वाढलेल्या हुकुमशाहीपणाला विरोध करण्याकरिता डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात इराणमध्ये आंदोलने सुरू झाली होती. परिणामी अंतर्गत अशांतता अन् बाहेरून अमेरिका आणि इस्रायलशी युद्धात गुंतलेला इराण कमकुवत झाल्याचे विश्लेषण मी मांडले होते.

'अमेरिका आणि इस्रायल' हे देश इराणच्या कमकुवतपणाचा कसा फायदा घेतील हा प्रश्नार्थक मुद्दाही मी अधोरेखित केला होता. अशातच गेल्या काही तासांपूर्वी अमेरिका अन् इस्रायल या दोन्ही देशांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते (Supreme Leader) "अयातुल्ला अली खोमेनींचा मृत्यू" झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध देशांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे अन् खोमेनींच्या मृत्यूमुळे जागतिक राजकारणाने 'नवे वळण' घेतले आहे.

या घटनेनंतर आता प्रामुख्याने 'तीन प्रश्न' पुढे येतात. पहिला प्रश्न, खोमेनींच्या मृत्यूपश्चात निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत इराणी जनतेला अपेक्षित लोकशाहीचा उदय होईल, की हुकूमशाहीच नव्या रूपाने उदयाला येईल.
दुसरा प्रश्न, या 'हवाई युद्धात' सामील असलेल देश आता हवाई युद्धास पूर्णविराम देतील, की हवाई युद्धे सुरुच ठेवतील.
तिसरा प्रश्न, मध्य आशियात शांतता प्रस्थापित होईल,
की इराणमध्ये सत्तांतर होऊनही 'जैसे थे' परिस्थिती कायम असेल.

भारताच्या प्रधानमंत्रीच्या 25-26 तारखेच्या इस्रायल भेटीने भारताच्या भूमिकेबाबतही विविध अन्वयार्थ लावले जाताहेत. परिणामी भारताला भारताची भूमिका स्पष्ट करावी लागेल. युद्धात सामील असलेल्या देशांतील 'परदेशस्थ भारतीयांच्या (Indian Diaspora)'
सुरक्षेचा प्रश्नही भारताला हाताळावा लागणार आहे. सोबतच भारताला देशांतर्गत आणि देशाबाह्य हालचालींवरही लक्ष पुरवावे लागणार आहे. 
नव्या वळणावरच्या या जागतिक राजकारणाची वाटचाल आता पुढे कशी असेल हे येणाऱ्या काळातूनच समजून घेता येईल..!

~ सचिन विलास बोर्डे

42/1

Ayatollah Ali Khamenei | Iran | Israel | America | USA | Diplomacy | Geopolitics | International Relations | Global Politics | Politics | Bilateral Conflicts | Multilateral Conflicts | War | Humanity | State



Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!