Posts

Showing posts with the label Geopolitics

143. विकासाच्या वाटेवरील भारत!

लोक (Population), भूप्रदेश (Territory), शासन (Government) आणि सार्वभौमत्व (Sovereignty) या चार घटकांनी मिळून " देश " अस्तिवात येतो. देशाचं अस्तित्व या चार मूलभूत घटकांवर टिकलेलं असतं. यातील लोक, भूप्रदेश आणि सार्वभौमत्व या तीन घटकांच्या रक्षणाची जबाबदारी शासन पार पाडते. एखाद्या देशाचा भूप्रदेश सुरक्षित असेल आणि त्या देशाला आपले निर्णय घेण्याचे स्वतंत्र असेल तर अशा देशातील नागरिकांना जीविताच्या अन् स्वातंत्र्याच्या रक्षणाची हमी मिळते. अर्थात देशातील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाकडे असते. मात्र जेव्हा एखादा देश दुसऱ्या एखाद्या देशाशी संघर्षात गुंततो तेव्हा वरील चारही घटक विस्कळीत होतात. या ' संघर्षाने युद्धाचे रूप घेतल्यास ' दोन्ही देशातील नागरिक मारले जातात, भूप्रदेश बळकावले जातात, शासन अस्थिर बनते अन् याचा एकंदरीत परिणाम दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वावर होतो. रशिया-युक्रेन, इस्राईल-पॅलेस्टाईन , भारत-चीन, भारत-पाकिस्तान , इराण-इस्राईल हे अलीकडील काळातील ' द्विपक्षीय संघर्षाची (Bilateral Conflicts) ' उदाहरणे आहेत. या द्विपक्षीय संघर्षात इतर देशही समाविष्...

134. विकासाच्या वाटेवरील भारत!

अमेरिकेत ट्रम्प सत्तेत आले. अन् ट्रम्प यांनी विविध धोरणे जाहीर करण्यास सुरुवात केली. यातील चर्चा करण्याजोगं धोरण म्हणजे " आयात शुल्काचं (Tariff/Import Duty) ". आयात शुल्क म्हणजे इतर देशांमधून आयात केलेल्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. स्थानिक, देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी आयात शुल्क आकारण्यात येतो. समजा अमेरिकेने आयात शुल्क वाढविले तर, अमेरिकेत आयात झालेल्या वस्तूंची किंमत वाढेल, या वस्तू महाग होतील परिणामी अमेरिकेतील ग्राहक देशी वस्तूंकडे वळतील. स्थानिक वस्तूंची मागणी, उत्पादन आणि विक्री वाढेल. बहुतांश देशांनी ' खुल्या अर्थव्यवस्थेचा ' स्वीकार केला असल्याने एखाद्या देशाच्या व्यापार करातील बदलांचा इतर देशांवरही परिणाम होतो. भांडवली बाजार, तेल बाजार, सोने बाजार यातही चढ-उतार होतात. बऱ्याचदा अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीचे चक्रही बघायला मिळते. आयात शुल्काच्या वाढीमुळे जागतिक व्यापारावर मर्यादा येऊ शकतात तसेच ' व्यापार युद्धे ' देखील आकारास येऊ शकतात. अमेरिकेने अलीकडेच विविध देशांकरिता विविध आयात शुल्क निश्चित केले आह...