Posts

Showing posts with the label Israel

179. विकासाच्या वाटेवरील भारत!

अठरा जानेवारीच्या ' लेख क्र. 40/3 ' मध्ये आपण ' इराणमधल्या राजकीय अन् आर्थिक उलथापालथी ' समजून घेतल्या होत्या. अर्थव्यवस्थेत झालेल्या विस्कळीतपणाला आणि समाजजीवनात वाढलेल्या हुकुमशाहीपणाला विरोध करण्याकरिता डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात इराणमध्ये आंदोलने सुरू झाली होती. परिणामी अंतर्गत अशांतता अन् बाहेरून अमेरिका आणि इस्रायलशी युद्धात गुंतलेला इराण कमकुवत झाल्याचे विश्लेषण मी मांडले होते. ' अमेरिका आणि इस्रायल ' हे देश इराणच्या कमकुवतपणाचा कसा फायदा घेतील हा प्रश्नार्थक मुद्दाही मी अधोरेखित केला होता. अशातच गेल्या काही तासांपूर्वी अमेरिका अन् इस्रायल या दोन्ही देशांच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते (Supreme Leader) " अयातुल्ला अली खोमेनींचा मृत्यू " झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध देशांवर झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे अन् खोमेनींच्या मृत्यूमुळे जागतिक राजकारणाने ' नवे वळण ' घेतले आहे. या घटनेनंतर आता प्रामुख्याने ' तीन प्रश्न ' पुढे येतात. पहिला प्रश्न , खोमेनींच्या मृत्यूपश्चात निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत इराणी जनतेला अपेक्षित...

173. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडच्या काही दिवसांपासून " इराणमध्ये राजकीय अन् आर्थिक उलथापालथ " सुरू आहे. या देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात निदर्शने केली गेली. इराणमध्ये ' चलनवाढ ' 40 टक्क्यांपर्यंत पोहोचलीय. इराणी रियालचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमालीचे घसरले आहे. आजघडीला एका डॉलरची किंमत दहा-अकरा लाख रियाल इतकी झाली आहे. परिणामी इराणमध्ये आयात महाग झाल्याने जीवनावश्यक वस्तू-सेवा कमालीच्या महागलेल्या आहेत. याला आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला जातोय. इराण सरकाने हे आंदोलन रोखण्याकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे. इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात जवळपास दोन हजार आंदोलकांचा बळी गेल्याचं चर्चेत आहे. या आंदोलनाला ' अमेरिका अन् इस्रायल ' पाठिंबा देत असल्याचा आरोप इराणी राज्यकर्ते करताना दिसताय. इराणच्या अंतर्गत अशांततेने आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरली एकटेपणाने इराण कमकुवत होताना दिसतोय. पश्चिम आशियाच्या राजकारणात महत्वाचा अन् तेलउत्पादक असलेल्या इराणच्या अशांततेचा अन् एकटेपणाचा अमेरिका आणि इस्रायल कसा फायदा करून घेती...

54. विकासाच्या वाटेवरील भारत!

आंतरराष्ट्रीय पातळीवर "दहशतवाद (Terrorism)" ही अत्यंत ज्वलंत समस्या ठरतेय. एखादा देश किंवा गट राजकीय, धार्मिक वा तत्सम हेतू साध्य करण्याकरिता दहशतवादाचा मार्ग अवलंबतो. परिणामी दुसरा देश प्रतिहल्ल्याने उत्तर देतो. या घडामोडीत शेकडो निर्दोष लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. मानवी हक्क पायदळी तुडवल्या जातात, व्यापार, अर्थव्यवस्था विस्कळीत होते. दहशतवादाला राजकीय, तात्विक, विचारप्रणालीत्मक, वांशिक किंवा धार्मिक आधार जरी पुरविण्यात आला तरी दहशतवाद समर्थनीय ठरू शकत नाही. गरिबी, बेरोजगारी, शैक्षणिक मागासलेपण, धार्मिक मूलतत्त्ववादाचा प्रभाव ई. कारणे दहशतवादी निर्माण होण्यास पाठबळ पुरवितात. दहशतवादाला आळा घालण्याकरिता विविध आंतरराष्ट्रीय करार तथा संस्था कार्यरत असल्या तरी समस्येचे मूळ शोधून त्यावर घाव घालणे गरजेचे ठरते. दहशतवाद्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा, धार्मिक पाठबळ, मनोबल प्रदान करणाऱ्या मानवताविरोधी घटकांचा शोध घेणेही अतिमहत्वाचे. भारताने दहशतवादाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शविला आहे. 'इस्राईल-पॅलेस्टाईन' च्या चालू झालेल्या युद्धमय घडामोडीत भारताने मानवतेला प्राथ...