173. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडच्या काही दिवसांपासून "इराणमध्ये राजकीय अन् आर्थिक उलथापालथ" सुरू आहे. या देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात निदर्शने केली गेली.

इराणमध्ये 'चलनवाढ' 40 टक्क्यांपर्यंत पोहोचलीय.
इराणी रियालचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमालीचे घसरले आहे. आजघडीला एका डॉलरची किंमत दहा-अकरा लाख रियाल इतकी झाली आहे. परिणामी इराणमध्ये आयात महाग झाल्याने जीवनावश्यक वस्तू-सेवा कमालीच्या महागलेल्या आहेत. याला आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला जातोय.

इराण सरकाने हे आंदोलन रोखण्याकरिता आक्रमक भूमिका घेतली आहे. इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात जवळपास दोन हजार आंदोलकांचा बळी गेल्याचं चर्चेत आहे. या आंदोलनाला 'अमेरिका अन् इस्रायल' पाठिंबा देत असल्याचा आरोप इराणी राज्यकर्ते करताना दिसताय.

इराणच्या अंतर्गत अशांततेने आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरली एकटेपणाने इराण कमकुवत होताना दिसतोय. पश्चिम आशियाच्या राजकारणात महत्वाचा अन् तेलउत्पादक असलेल्या इराणच्या अशांततेचा अन् एकटेपणाचा अमेरिका आणि इस्रायल कसा फायदा करून घेतील याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अमेरिकेच्या इराणविषयक व्यापार निर्बंध धोरणामुळे भारताने 2019 पासून इराणकडून होणाऱ्या कच्च्या तेलाची आयात थांबवली आहे. व्यापाराच्या दृष्टीने इराणच महत्व घटलेलं आहे. मात्र पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर देखरेख ठेवण्याकरिता अन् अफगाणिस्तान मार्गे मध्य आशियात पोहोचण्याकरिता 'इराणचे चाबहार बंदर' भारतासाठी महत्वाचे असल्याने चाबहार बंदरात भारताने मोठी गुंतवणूक केली आहे.

जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या या पेचप्रसंगाला भारत अन् इतर देश कसा प्रतिसाद देतील यावरून जागतिक राजकारणाची पुढची दिशा ठरेल..!

~ सचिन विलास बोर्डे

40/3

Iran | Israel | America | USA | Economic Crisis | Protest | Inflation | Hyperinflation | Currency Devaluation | Currency Depreciation | Economy | Economics | Trade | Chabahar Port | Bilateral Trade | Investment | Diplomacy | Geopolitics | Global Economy | International Relations | Global Politics


Comments

Popular Posts

51. विकासाच्या वाटेवरील भारत!

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

79. विकासाच्या वाटेवरील भारत!