113. विकासाच्या वाटेवरील भारत!

20 तारखेला पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील मतदान केंद्रातील तोडफोड, इतर काही ठिकाणच्या EVM मध्ये तांत्रिक बिघाड, तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार अन् त्यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्कीच्या काही घटनांचा अपवाद वगळता 20 तारखेचे मतदान शांततेने पार पडल्याचे दिसले.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी यंदाच्या निवडणुकांत उत्साहाने सहभाग नोंदविला. निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात अंदाजे 65.02% मतदान झाल्याचे दिसले. (2019 च्या विधानसभा निवडणुकीत 61.6% मतदान झाले होते.) हा आकडा थोडासा वाढलेला दिसत असला तरी शहरी भागातील मतदारांत अजूनही 'सीरियसनेस' आलेला दिसत नसल्याचेच चित्र यंदाही बघायला मिळाले.

काल लागलेल्या या निवडणुकीच्या निकालाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विविध मतदारसंघात अटी-तटीची लढत दिसून आली. थोड्या-बहुत फरकाने अनेक उमेदवारांची हार-जीत देखील बघायला मिळाली. 
थोडक्यात, राजकारणाची प्रक्रिया कशी कार्यान्वित होते हेच मला उपरोक्त विश्लेषणातून अधोरेखित करावयाचे आहे.

सर्वसामान्य नागरिकांनी राजकारणाकडे दुर्लक्षून चालणार नाही. साम-दाम-दंड-भेदाची निती आजही राजकारणात आहे काय?, राजकारणात जाती-धर्माचे समीकरणे वरचढ ठरलेय काय?, निवडणुकांत भ्रष्ट व्यवहार झालाय काय?, निवडणुका अन् निवडणुकांचे निकाल योग्यरीत्या पार पडलेय काय? हे शोधण्याकरिता शक्य होईल तितक्या सूक्ष्म निरीक्षणाने राजकारणातील बारकावे आपल्याला अभ्यासावे लागतील.

यामुळेच येणाऱ्या काळात नागरिक राजकारणापासून फारकत न घेता राजकारणाच्या प्रक्रियेत मोठ्या टक्क्याने सहभागी होतील तसेच येणाऱ्या पाच वर्षांकरिता आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण आपल्या विजयी उमेदवारांना जबाबदार धराल याच अपेक्षेने सदरील लेखास पूर्णविराम देतो..!


~ सचिन विलास बोर्डे

26/4

Maharashtra Vidhansabha Election 2024 | State Assembly Elections/Legislative Assembly Elections | Member of Parliament (MLA) | Politics | Society | Voting Awareness | Democracy | Voters | Political Parties | Election Results 

Comments

Popular Posts

16. विकासाच्या वाटेवरील भारत!

154. विकासाच्या वाटेवरील भारत!

153. विकासाच्या वाटेवरील भारत!