16. विकासाच्या वाटेवरील भारत!

क्रोनी कॅपिटॅलिजम (Crony Capitalism) ही संकल्पना अर्थव्यवस्था, समाज, राजकारण, भ्रष्टाचार अशा विविध आयामांशी संलग्न करता येते.

शासन आणि भांडवलदार यांच्या हितसंबंधांना जपणारे आर्थिक ध्येय-धोरणे म्हणजेच क्रोनी कॅपिटॅलिजम..!
'याचा आणि सर्वसामान्य जनतेचा काय संबंध' असा प्रश्न उपस्थित केला असता त्याचे विश्लेषणात्मक उत्तर शोधणेही तितकेच महत्त्वाचे.

काही विश्लेषकांच्या मते,
भारताच्या एकूण संपत्तीतील 85% संपत्ती केवळ 5% अभिजन वर्गाकडे केंद्रित झालेली आहे. अन् उर्वरित 15% संपत्ती 95% लोकांच्या वाटेला आलेली दिसते.
हा महाकाय दुभंग हितसंबंधांचा संघर्ष निर्माण करतो.
याचे दूरगामी परिणाम जनतेच्या अन् एकांदरीतच भारताच्या वाटेला येतात. 

देशाचा केवळ GDP वाढलेला दिसतो मात्र देशांतर्गत संपत्ती/संसाधनांचे असमान वितरण पहावयास मिळते.
सोप्या भाषेत, श्रीमंत गट आणखी श्रीमंत होत आहे अन् सर्वसामान्य लोक दरिद्रीच्या डोहात शिरत आहे...
ही दुर्दैवी वास्तविकता आपण लक्षात घेतली पाहिजे.

~ सचिन विलास बोर्डे

4/3

Crony Capitalism | SocioEconomic Conditions | Inequality

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!