114. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या संसदेने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले.

"The Online Safety Amendment (Social Media Minimum Age) Bill 2024" नामक या विधेयकानुसार X, TikTok, Snapchat, Facebook आणि Instagram इत्यादी सारख्या प्लॅटफॉर्म वर मुलांना खाती ठेवण्यापासून बंदी करण्यात येणार आहे. तसेच या कंपन्या या विधेयकातील तरतुदींच्या अंमलबजावणीत अयशस्वी ठरल्यास त्यांना 32 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्या दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. 

सोशल मीडियाचा लहान मुलांवर होणारा नकारात्मक परिणाम लक्षात घेता उपरोक्त कायदा तर्कसंगत वाटतो. भारतासंदर्भातही सोशल मीडियाचे नियमन करणारा कायदा असावा का? या प्रश्नावर अनेक मतमतांतरे बघायला मिळतात.

मात्र सध्याची वास्तविक परिस्थिती लक्षात घेता अनेक मुद्दे प्रकर्षाने पुढे येतात. समाज माध्यमांचा आधार घेऊन समाजात भेदभाव अथवा दुभंग निर्माण केला जातो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जातात. लवकर प्रसिध्दी, Views मिळविण्याकरिता अश्लील कंटेंट सर्रासपणे शेअर केल्या जाते.

लहान मुलांत पुरेशी समज नसल्याने तेही यात अडकत जातात. परिणामी त्यांचा बौद्धिक विकास कुंठित होतो. बऱ्याचदा ही लेकरं सायबर गुन्हेगारीसही बळी पडतात. 
यामुळेच समाज माध्यमांवर वयाच्या अटी/नियम असायला हवे.

ऑस्ट्रेलियाने पारित केलेले हे विधेयक भारतासहित इतर देशांनाही दिशादर्शक ठरेल. येणाऱ्या काळात भारत अन् इतर देश काय भूमिका घेतील हे पाहण्याजोगे असेल..!


~ सचिन विलास बोर्डे

27/1

Australia | Social Media Ban | Children Safety | Regulation of Social Media 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!