111. विकासाच्या वाटेवरील भारत!
'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस (ADR)' या संस्थेने 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या "आमदारांच्या स्थितीविषयक" नुकताच एक अहवाल प्रकाशित केलाय.
वीस तारखेला येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या अहवालाचे विश्लेषण सदरील लेखातून सादर करीत आहे.
अहवाल काय सांगतो? -
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघातून जवळजवळ 3138 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. यातील 1019 (32%) उमेदवारांकडे कोटीची संपत्ती होती. 1193 निवडणूक लढविणाऱ्यांपैकी
932 (30%) उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. यातीलच 618 (20%) उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यमान 272 आमदारांपैकी 164 (60%) आमदारांवर विविध गुन्हे दाखल आहेत.
106 (39%) आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 252 (93%) आमदारांकडे कोटीची संपत्ती असल्याचे अहवालात नमूद आहे. 151 (56%) आमदार हे पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. 272 आमदारांपैकी
23 (8%) महिला आमदार असल्याचं अहवाल नमूद करतो.
उपरोक्त बाबींचे पक्षनिहाय विश्लेषणही या अहवालात सादर केले आहे. (या संपूर्ण अहवालाची PDF स्वरूपातील प्रत या लेखासोबतच उपलब्ध करून देत आहे.)
आपल्या मतदारसंघात निवडून येण्याकरीता उभ्या असलेल्या उमेदवाराचा महत्त्वाचा तपशील मतदारांना माहिती असावा हा प्रमुख मुद्दा या अहवालातून सूचित होतो.
मतदारांनीही आपल्या उमेदवारांचा पसंतीक्रम निवडतांना उमेदवाराच्या तपशीलांकडे दुर्लक्षून चालणार नाही. अन्यथा अयोग्य व्यक्तिद्वारे अयोग्यपणे चालविण्यात येणारे अयोग्य शासन पहावयास मिळेल..!
~ सचिन विलास बोर्डे
26/2
Maharashtra Vidhansabha Election 2024 | State Assembly Elections/Legislative Assembly Elections | Maharashtra Assembly Election 2019 | Association for Democratic Reforms (ADR) | Report | Member of Parliament (MLA) | Politics | Society
Comments
Post a Comment