110. विकासाच्या वाटेवरील भारत!

एकीकडे मानवाने मानवी विवेक विकसित करून तंत्रज्ञानाच्या विकासाला गतिमान केले. सोबतच या 'डिजिटल युगातील डिजिटल मानवाने' तंत्रज्ञानाच्या विकासातून मानवी विकास साध्य करण्याकरिता नवनवीन कल्पनांचा आविष्कार केला.

दुसरीकडे काहींनी या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाची अन् गुन्हेगारीची सांगड घालून "सायबर गुन्हेगारी" या संकल्पनेचा आविष्कार केला. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच सायबर गुन्हेगारीही विकसित होत गेली. याच सायबर गुन्हेगारीचं विकसित झालेलं अलीकडील रूप म्हणजे "डिजिटल अरेस्ट (Digital Arrest)."

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? -
या ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या प्रकारात गुन्हेगार साधा किंवा व्हिडिओ कॉल करतात. हे गुन्हेगार खोटी कागदपत्रे दाखवून पोलिस, सीबीआय, ईडी या विभागातील अधिकारी असल्याचे सांगतात. विविध आरोप करून अटक करण्याची भीती दाखवतात. अटकेतून सुटण्याकरिता ठराविक रक्कम जमा करण्याची मागणी केली जाते. ज्यांना तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसते ते अशा बनावट प्रकरणांना बळी पडतात.

खबरदारी कशी घ्याल? -
कुठल्याच गुन्ह्याकरिता डिजिटल अरेस्ट ची तरतूद केलेली नाही. ही बाब लक्षात घ्यावी. तुम्हाला आलेल्या बनावट/Spam कॉल अथवा मेसेजवर स्वतःची माहिती देणे टाळावे. 
बऱ्याचदा पैशांचा मोह दाखवूनही ऑनलाइन फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा मोहाला आवर घालावा.
सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याकरिता सायबर क्राईम हेल्पलाईन - 1930 किंवा cybercrime.gov.i या संकेतस्थळावर अथवा जवळील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी..!


~ सचिन विलास बोर्डे

26/1

Modern Technology | Social Media | Cyber Crimes | Digital Arrest | Digital Scams | Online Frauds | Cyber Security | Digital Awareness | Cyber Safety

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!