37. विकासाच्या वाटेवरील भारत!
आज आपण सर्वांच्या आवडीच्या विषयावर अक्षरमांडणी करणार आहोत...
'प्रेमाच्या आधुनिक संकल्पना' हे उपशीर्षक या लेखासाठी साजेस ठरेल.
माझ्या निदर्शनास आलेल्या अन् पुस्तकी जगातल्या प्रेमाची तुलना करण्याचा हा प्रयत्न. अनेक पुस्तकांत प्रेमाच्या विविध व्याख्या करण्यात आल्या आहेत. जसं, प्रेम म्हणजे निस्वार्थभाव, प्रेम म्हणजे आतुरता-ओढ, प्रेम म्हणजे शरीरसंबंध, प्रेम म्हणजे दया, प्रेम म्हणजे भावना इत्यादी इत्यादी इत्यादी...
हेच प्रेम कुणी मनावर केलंय, कुणी सौंदर्यावर, कुणी शरीरावर, कुणी आठवणींवर, कुणी वस्तूंवर...
प्रेम शोधायचं झालं तर ते भेटेल आई-वडिलांकडे, नात्यांमध्ये, मित्र-मैत्रिणींकडे अन् महत्वाचं म्हणजे प्रियकर-प्रेयसी मध्ये. ज्यांना आपण Boyfriend, Girlfriend अशा उपमा देतो.
यांच्या प्रेमाच्या संकल्पना जरा वेगळ्याच. यांच्या प्रेमाची सुरुवात होते 'Attachment' ने. काहीतरी हेतू साध्य करण्यासाठी हे तरुण-तरुणी प्रेमाचा आधार घेतात. हेतू साध्य झाला की ते प्रेमाला पूर्णविराम देतात. ज्याला आपण 'Breakup, Detachment' म्हणतो. तिथून पुढची सुरुवात होते 'Move On' ने. ते झालं म्हणजे अगोदरच नात संपल. पुन्हा सुरू होतो नवीन शोध. नवीन प्रेम.
अशारीतीने हे चक्र कायम फिरत राहते. जागेअभावी या चक्राची उर्वरित चर्चा पुढील लेखात करूया..!
~ सचिन विलास बोर्डे
9/2
Modern Concepts Of Love | Youths | Awareness
Comments
Post a Comment