36. विकासाच्या वाटेवरील भारत!
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केलेली ही 'मूलभूत हक्कांच्या कलमांची' मालिका आज पूर्णत्वास नेत आहे.
या विश्लेषणाची सुरुवात 'कलम 14' पासून करण्यात आली होती. दिनांक 28 मे 2023 रोजी महत्त्वाची तरतूद म्हणजेच 'कलम 32' चे थोडक्यात विश्लेषण सादर करण्यात आले. येणाऱ्या काळात परिस्थितीला अनुसरून काही तरतुदींचे विवेचन सादर करण्यास माझी तत्परता असेल.
उर्वरित कलम 33, 34 आणि 35 तसेच इतर तरतुदींचा सखोल अभ्यास करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्यच ठरते. अनेकांच्या घरात हे संविधान गेलयं खर, पण ते वाचण्याचा त्यांना वेळच मिळेना...
दैनंदिन जीवनातील थोडा जरी वेळ आपण संविधान वाचण्यात घालविला तर आपल्याला आपले हक्क-अधिकार कळतील. शासन कारभारात आपली काय भूमिका असावी हे समजेल. आणि निश्चितच आपली वाटचाल 'शासनकर्ती जमात' होण्याकडे असेल..!
~ सचिन विलास बोर्डे
9/1
Article 33 | Article 34 | Article 35 | Series Of Fundamental Rights
Comments
Post a Comment