38. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेखात आपण 'आधुनिक प्रेमाचे चक्र' बघितले. ज्याची थोडी-बहुत कल्पना सर्वांनाच आली असेल. या लेखात आपण या चक्राची दाहकता समजून घेऊ...
काही तरुण-तरुणी तथा विवाहित स्त्री-पुरुष एकाच वेळी अनेकांशी प्रेमात गुंततात आणि गुंतवतात. ज्याला 'Double Date, Affairs' अशी प्रचलित शब्द आहेत.
याला खरच 'Modern' म्हणायचं का? हा मोठा प्रश्न...
पुढे या प्रकरणांमध्ये कुणाला यश तर कुणाला अपयश येत. जे त्या चक्रात यशस्वी झालेत त्यांना तीच सवय जडते. प्रेमप्रकरणात अपयशी झालं की Blackmailing, Suicide, Acid Attacks, Sexual Harrasment, Rape, Murder, Divorce, Abortion, नग्न अवस्थेतील Photos, Videos खुलेपणाने Social Media वर प्रसारित केले जातात.
देशातील निम्म्यापेक्षा अधिक तरुण-तरुणी यातच भरकटलेली दिसतात. प्रेमाला धार्मिकतेचा-जातीयतेचा आयाम देखील जोडला जात आहे. नुकतेच घडलेले 'दिल्लीमधील प्रकरण' आपण ऐकून असाल. इतक्या खालच्या थराला आपण हे प्रेम घेऊन आलोय.
गरज आहे ती सतर्कतेची, नैतिकतेची, खऱ्या प्रेमाच्या संकल्पना समजून घेण्याची...
माझी सर्वच समाजघटकांना कळकळीची विनंती असेल, 'प्रेमाचा होणारा बाजार' आपण थांबवावा..!
~ सचिन विलास बोर्डे
9/3
Modern Concepts Of Love | Youths | Awareness
Comments
Post a Comment