181. विकासाच्या वाटेवरील भारत!
लोक (Population), भूप्रदेश (Territory), शासन (Government) आणि सार्वभौमत्व (Sovereignty) या चार घटकांनी मिळून 'देश' अस्तिवात येतो. देशाचं अस्तित्व या चार मूलभूत घटकांवर टिकलेलं असतं.
लोकं, भूप्रदेश अन् सार्वभौमत्व यांच्या संरक्षण-संवर्धनाची जबाबदारी 'शासनाकडे' असते. ही जबाबदारी आणि देशाचा कारभार पार पाडण्याकरिता शासनाकडे 'सत्ता' असायला हवी. ही सत्ता किती प्रमाणात आणि कोणत्या स्वरूपात असायला हवी या प्रश्नांची उत्तरे 'देशाच्या संविधानात' नमूद केलेली असतात.
भारताच्या संदर्भात शासनाच्या स्थिरतेसाठी आणि यशासाठी तीन टप्पे महत्वाचे ठरतात.
पहिल्या टप्प्यात, "सत्ता (Power)" ही संविधानाच्या लिखित स्वरूपाद्वारे शासनाकडे मर्यादित (Limited) आणि विभाजित (Seperation) स्वरूपात हस्तांतरित केली जाते.
दुसऱ्या टप्प्यात, या सत्तेला देशातल्या नागरिकांची संमती आवश्यक ठरते. सत्तेला नागरिकांच्या मान्यतेची जोड मिळाल्यास ती "अधिमान्यता (Legitimacy)" बनते.
तिसऱ्या टप्प्यात, जेव्हा सत्तेला अधिमान्यतेची जोड मिळते तेव्हा ती "अधिसत्तेत (Authority)" रुपांतरित होते.
या अंतिम टप्प्यावर सत्तेला सर्वांगीण स्वीकृती मिळते.
शासनाची स्थिरता सत्तेवर अवलंबून आहे, आणि सत्ता ही अधिमान्यतेवर टिकलेली आहे. त्याचप्रमाणे शासनाचे यश शासनाच्या ध्येय-धोरणांवर अवलंबून आहे, अन् या ध्येय-धोरणांचे यश नागरिकांच्या अधिमान्यतेवर अवलंबून आहे. सत्तेतून अधिमान्यता काढून घेतली तर शासन अस्थिर होत जाते. अन् ध्येय-धोरणांतून अधिमान्यता काढून घेतली तर शासन अपयशी ठरू लागते. (याचे ताजे उदाहरण - HPV Vaccine विषयक संभ्रम/Confusion)
थोडक्यात, शासनाची सत्ता असो वा ध्येय-धोरणे, दोन्ही बाजूनेही नागरिकांची अधिमान्यता अत्यावश्यकच ठरते. कारण यावरच शासनाची स्थिरता आणि यश आधारलेलं आहे. स्थिर अन् यशस्वी शासनालाच आपल्या लोकांचं, भूप्रदेशांचं अन् सार्वभौमत्वाचं संरक्षण-संवर्धन करता येतं..!
~ सचिन विलास बोर्डे
42/3
Political Theory | Political Science | State | Population | Territory | Government | Sovereignty | Power | Seperation of Power | Legitimacy | Authority | Indian Constitution | Constitution | Human Papillomavirus (HPV) | HPV Vaccine | Schemes & Policies
Comments
Post a Comment