149. विकासाच्या वाटेवरील भारत!
भारतात राज्य आणि केंद्र शासनाच्या शासकीय सेवेत आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची निवड परीक्षांमार्फत केली जाते.
केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त जागांवर अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी 'स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)' नावाचा आयोग कार्यरत आहे. या आयोगाने SSC Selection Post Phase 13 ही परीक्षा घेण्यासाठी नवीन खासगी कंत्राटदाराची नेमणूक केलीय. मात्र विद्यार्थ्यांना या "परीक्षा प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणी" आल्याने विद्यार्थांनी अन् शिक्षकांनी 'आंदोलन' सुरू केल्याचे दिसत आहे.
सर्वप्रथम 'विद्यार्थ्यांच्या तक्रारी' लक्षात घेऊया...
विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्रे मिळाले. राजस्थानातील विद्यार्थ्यांना अंदमान निकोबार बेटावर परीक्षा केंद्रे देण्यात आली. पूर्वसूचना न देता ऐन वेळेवर परीक्षा केंद्रे बदलण्यात आले. परीक्षा केंद्रांवरील संगणक बंद पडणे, बायोमेट्रिक प्रणालीमध्ये बिघाड इत्यादी स्वरूपातल्या तांत्रिक अडचणी दिसून आल्या. इत्यादी कारणांमुळे देशातील विद्यार्थ्यांना अन् शिक्षकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय.
कारण 'या देशात हक्क मागितल्याने मिळत नाहीत,
हक्क मिळविण्यासाठी झगडावं लागतं!'
भारतात विविध परीक्षांतील गैरप्रकार, तांत्रिक अडचणी या समस्या नव्या नाहीत. या समस्या सातत्याने दिसून येत आहे. नेहमीप्रमाणे शासनाने या समस्यांवर तातडीने तोडगा काढणं अपेक्षित होतं. मात्र परीक्षा प्रक्रियेतील सुधारणांची मागणी करणाऱ्या विद्यार्थी अन् शिक्षकांवर इथल्या व्यवस्थेनं लाठ्या-काठ्या उचलून त्यांना चार भिंतीच्या आत डांबून 'मोठ्या अभिमानाचे कार्य' केले आहे...
'समस्या कुठलीही असो, त्यावर उपाय शोधत बसण्यापेक्षा या समस्या लक्षात आणून देणाऱ्यांना संपवलं, की समस्या देखील संपते.' हेच इथल्या व्यवस्थेचं अतिशय आवडीच 'पारंपरिक तत्व' म्हणता येईल..!
~ सचिन विलास बोर्डे
35/1
Malpractices in Examinations | Technical Failures | Administrative Lapses | Exams | Students | Education | Protest | Student Protest | Staff Selection Commission | SSC
Comments
Post a Comment