Posts

Showing posts with the label SSC

149. विकासाच्या वाटेवरील भारत!

भारतात राज्य आणि केंद्र शासनाच्या शासकीय सेवेत आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांची निवड परीक्षांमार्फत केली जाते. केंद्र शासनाच्या विविध विभागातील रिक्त जागांवर अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी ' स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ' नावाचा आयोग कार्यरत आहे. या आयोगाने SSC Selection Post Phase 13 ही परीक्षा घेण्यासाठी नवीन खासगी कंत्राटदाराची नेमणूक केलीय. मात्र विद्यार्थ्यांना या " परीक्षा प्रक्रियेदरम्यान अनेक अडचणी " आल्याने विद्यार्थांनी अन् शिक्षकांनी ' आंदोलन ' सुरू केल्याचे दिसत आहे. सर्वप्रथम ' विद्यार्थ्यांच्या तक्रारी ' लक्षात घेऊया... विद्यार्थ्यांना दूरचे परीक्षा केंद्रे मिळाले. राजस्थानातील विद्यार्थ्यांना अंदमान निकोबार बेटावर परीक्षा केंद्रे देण्यात आली. पूर्वसूचना न देता ऐन वेळेवर परीक्षा केंद्रे बदलण्यात आले. परीक्षा केंद्रांवरील संगणक बंद पडणे, बायोमेट्रिक प्रणालीमध्ये बिघाड इत्यादी स्वरूपातल्या तांत्रिक अडचणी दिसून आल्या. इत्यादी कारणांमुळे देशातील विद्यार्थ्यांना अन् शिक्षकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय. कारण ' या देशात हक्क मागितल्याने मिळत नाहीत, ...

138. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि बऱ्याच राज्यांच्या शिक्षण मंडळांद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या अनुषंगाने लेख क्र. 21/1 पुन्हा प्रकाशित करीत आहे.  उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. आपल्या पाल्याने नेमका कुठला पर्याय निवडावा हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक घ्यायला हवा. उच्च शिक्षणाचा पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोल आवडीचा असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याकरिता डोकेदुखीच ठरेल. यामुळे पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' करणं टाळायलाच हवं. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात य...

88. विकासाच्या वाटेवरील भारत!

नुकतेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे " दहावी आणि बारावीचे निकाल " जाहीर झालेत. या परीक्षांत अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस मार्क मिळविले. पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचे अनेक दालने खुले होतात. आपल्या पाल्याने नेमक्या कुठल्या दालनात शिरावे हा निर्णय पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर्कबुद्धीच्या आधारे घेणे महत्वाचे. उच्च शिक्षणाचे पर्याय निवडताना विद्यार्थांनी स्वतःची कार्यक्षमता, संयम, चिकाटी आणि समर्पक वृत्ती तपासायला हवी. निवडलेले शिक्षण आपल्याला झेपेल का हा विचार देखील करायला हवा. एखाद्यास इतिहास-भूगोलात रस असेल अन् त्याला पालकांच्या इच्छेमुळे विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागला तर तो अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यास डोकेदुखीच ठरते. पालकांनी हा ' शैक्षणिक अन्याय ' टाळायलाच हवा. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या शाखेची पुरेपूर माहिती करून घ्यावी. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना ' सरकारी नोकरीचे ' कमालीचे आकर्षण असते. केवळ ' पद-पैसा-प्रतिष्ठा ' मिळविण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येणे टाळावे. या क्षेत्राची...