153. विकासाच्या वाटेवरील भारत!
" संपत्तीचे विषम वितरण " हे गरिबीचे एक मुख्य कारण मानले जाते. हीच ' आर्थिक विषमता आणि गरिबीचा जन्म ' पुढील उदाहरणातून समजून घेता येईल. समजा, 100 लोकसंख्या असलेल्या ' X ' नावाच्या देशात 1000 रुपयांची एकूण संपत्ती आहे. या देशात 10 लोकांचा समावेश असलेल्या ' A ' या गटाकडे एकूण संपत्तीपैकी 800 रुपये म्हणजेच 80 टक्के संपत्ती एकवटलेली आहे. अन् दुसऱ्या बाजूला 90 लोकांचा समावेश असलेल्या ' B ' या गटाकडे फक्त 200 रुपये म्हणजेच 20 टक्के संपत्ती शिल्लक उरलेली आहे. A या गटातील प्रत्येक सदस्याकडे 80 रुपये असतील अन् B या गटातील प्रत्येक सदस्याकडे किमान 2 रुपये असू शकतील. यालाच आर्थिक विषमता अथवा संपत्तीचे विषम वितरण म्हणता येते. X नावाच्या या देशात 10 लोकांच्या A या धनिक गटाला ' दर्जेदार सुख ' मिळेल. मात्र बहुसंख्यांचा समावेश असलेल्या B या गटाकडे संपत्तीचा तुटवडा असल्याने या गटाच्या वाटेला ' दर्जेदार दुःख ' येईल. यातूनच गरिबी जन्माला येईल. आता X या देशातील अर्थव्यवस्थेचा अन् समाजव्यवस्थेचा विकास तिथल्या ' शासनाच्या भूमिकेवर ' अवलंबून अ...