147. विकासाच्या वाटेवरील भारत!
"तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे." हा इशारा अनेक ठिकाणी बघायला मिळतो. तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचा मानवी आरोग्यावरील हानिकारकपणा अधोरेखित करणारा इशारा आजच्या लेखातून समजून घेऊया...
भारताची स्थिती -
केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या "राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey-NFHS-5)" नुसार, वयोगट 15 आणि त्यावरील वयाचे 38% पुरुष आणि 9% स्त्रिया तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. ग्रामीण भागात या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शिक्षित स्त्रीपुरुषांच्या तुलनेत अशिक्षित स्त्रीपुरुषांत सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते.
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगढ, ईशान्येकडील राज्ये, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत तंबाखू सेवनाचे प्रमाण '40 टक्क्यांहून अधिक' आहे.
तंबाखूचा हानिकारकपणा -
1. कर्करोग (Cancer) -
तोंडाचा (Oral Cancer), घशाचा (Throat Cancer), फुफ्फुसांचा (Lung Cancer), पोटाचा (Stomach Cancer), मूत्राशयाचा (Bladder Cancer), किडनीचा (Kidney Cancer), स्वादुपिंडाचा (Pancreatic Cancer), अन्ननलिकेचा (Esophageal Cancer) आणि महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा (Cervical Cancer) इत्यादी.
2. श्वसनाचे आजार (Respiratory Disease) -
दीर्घकालीन फुफ्फुसांचा रोग (COPD), दमा (Asthma), क्षयरोग (TB), न्युमोनिया इत्यादी.
3. हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार (Cardiovascular Disease) -
हृदयविकार (Heart Attack), पक्षाघात (Stroke), उच्च रक्तदाब, Peripheral Artery Disease इत्यादी.
तंबाखू अन् तंबाखूजन्य पदार्थांचा हानिकारकपणा लक्षात घेता, तंबाखू आरोग्यास हानिकारक आणि जीवघेणी आहे हाच निष्कर्ष काढता येतो. यामुळेच नागरिकांनी 'या व्यसनाकडे वळू नका' अन् व्यसनाधिनांनी 'तंबाखू आजच सोडा.' सदरील लेख जनहितार्थ प्रकाशित..!
~ सचिन विलास बोर्डे
34/3
Tobacco | Addiction | Cancer | Disease | Health | Public Health | NFHS | Awareness
Comments
Post a Comment