Posts

Showing posts with the label Youths

147. विकासाच्या वाटेवरील भारत!

" तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. " हा इशारा अनेक ठिकाणी बघायला मिळतो. तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचा मानवी आरोग्यावरील हानिकारकपणा अधोरेखित करणारा इशारा आजच्या लेखातून समजून घेऊया... भारताची स्थिती - केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या " राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey- NFHS -5) " नुसार, वयोगट 15 आणि त्यावरील वयाचे 38% पुरुष आणि 9% स्त्रिया तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. ग्रामीण भागात या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शिक्षित स्त्रीपुरुषांच्या तुलनेत अशिक्षित स्त्रीपुरुषांत सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगढ, ईशान्येकडील राज्ये, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत तंबाखू सेवनाचे प्रमाण '40 टक्क्यांहून अधिक' आहे. तंबाखूचा हानिकारकपणा - 1. कर्करोग (Cancer) - तोंडाचा (Oral Cancer), घशाचा (Throat Cancer), फुफ्फुसांचा (Lung Cancer), पोटाचा (Stomach Cancer), मूत्राशयाचा (Bladder Cancer), किडनीचा (Kidney Cancer), स...

127. विकासाच्या वाटेवरील भारत!

धकाधकीच्या या स्पर्धात्मक युगात मानवाच्या जीवनात अनेक समस्यांची भर पडलीयं. विशेषत: युवापिढीमध्ये नैराश्याची समस्या अधिक दिसतेय. हेच नैराश्य डोईजड झालं की अनेकजण " आत्महत्येचा वैफल्य मार्ग " स्वीकारताना दिसताय. "भारताची स्थिती" - 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो'च्या (NCRB) वार्षिक अहवालानुसार, 2022 मध्ये 1.7 लाख लोकांनी आत्महत्या केली आहे. 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 4.2 टक्क्यांनी आत्महत्येच्या प्रकरणांत वाढ झालेली दिसते. या जुन्या आकडेवारीवरून सध्याच्या परिस्थितीचे आकलन करता येईल. गरिबी, बेरोजगारी, दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणा, प्रेम-प्रकरणे, कौटुंबिक समस्या, लग्नाशी संबंधित समस्या अशा काही कारणांमुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचे दिसते. अलीकडे तर काहींनी आत्महत्या करण्यापूर्वी आपण आत्महत्या का करतोय?, आपल्या आत्महत्येस जबाबदार कोण?, याचे स्पष्टीकरण देणारे व्हिडिओ समाज माध्यमांवर अपलोड केलेत. मात्र यामुळे तरुणांमध्ये चुकीचा ट्रेंड सुरू होण्याची शक्यता दिसतेय. ' आत्महत्येने प्रश्न सुटत नसतात ' हीच बाब मला या अनुषंगाने नमूद करावीशी वाटतेय. "उपाययोजना...

125. विकासाच्या वाटेवरील भारत!

" आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेम विवाहाला " कुटुंबीयांचा अन् इथल्या सामाजिक व्यवस्थेचा कायमच विरोध राहिलेला आहे. आपल्या लेकरांनी आंतरजातीय विवाह केल्यास आपली सामाजिक प्रतिष्ठा कमी होईल, समाज आपल्याला जातीबाहेर टाकेल अशी भिती समाजात खोलवर रुजवली गेली. परिणामी आंतरजातीय विवाहाला इथल्या समाजव्यवस्थेने अन् जातव्यवस्थेने प्रोत्साहन दिलेच नाही. अशा विविध कारणांमुळे अनेक तरुण-तरुणींनी ' पळून जाऊन लग्न केल्याची ' उदाहरणे हल्ली सर्वत्र दिसून येत आहे. मात्र असा प्रेमविवाह केल्यानंतरही कुटुंबियांकडूनच त्यांचा छळ होत आहे, असेही ऐकण्यात येते. बऱ्याचदा हाच छळ ' ऑनर किलिंग ' चे रूप घेतो. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींनीचा कुटुंबातील सदस्यच खून करतात. अशाच घटना छत्रपती संभाजीनगर, सातारा, लातूर, बीड इत्यादी जिल्ह्यात घडलेल्या दिसतात. अशा ऑनर किलिंगच्या घटनांना थांबविण्याकरिता आणि प्रेमविवाह करणाऱ्यांना सुरक्षा देण्याकरिता " सुरक्षा गृह (Safe House) " तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. प्रेमविवाह करणाऱ्या तरुण-तरुणींच्या जीवाला धोका असल्यास स...

91. विकासाच्या वाटेवरील भारत!

" धूम्रपान " आरोग्यास हितकारक नाही... ही बाब सर्वांनाच ठाऊक आहे. तरीदेखील भारतात धूम्रपानाचे प्रमाण अधिक आहे हे दर्शविणारा ' इंडिया टोबॅको कंट्रोल रिपोर्ट/अहवाल ' केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रकाशित केला होता. अहवालानुसार, ' किशोरावस्थेतल्या (Adolescents) मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अत्याधिक आहे. ' 2009 ते 2019 या काळात मुलींमधल्या धूम्रपानाच्या प्रमाणात 3.8 टक्क्यांची वाढ होऊन हे प्रमाण 6.2 टक्क्यांवर पोहोचले. मुलांमधील धूम्रपानाच्या प्रमाणात 2.3 टक्क्यांची वाढ झाली. प्रौढ पुरुषांच्या धूम्रपानाच्या प्रमाणात 2.2 टक्क्यांची आणि स्त्रियांच्या प्रमाणात 0.4 टक्क्यांची घट झालीय. धूम्रपानाच्या जीवघेण्या व्यसनात तरुण पिढी (प्रामुख्याने तरुण मुली) अडकल्याचे वास्तव या अहवालातून अधोरेखित होते. किशोरावस्थेतील तरुण-तरुणी ' कूल अन् फॅशनेबल ' दिसण्याकरिता, ' टेन्शन ' पासून मुक्ती मिळविण्याकरिता तसेच इतरांच्या प्रभावाखाली येवून धूम्रपान करतात. मुलीने किंवा प्रौढ स्त्रीने धूम्रपान करणे म्हणजेच ' स्त्री सक्षमीकरणाचं ' प्रतीक असल्याचं चित्र निर्माण के...

73. विकासाच्या वाटेवरील भारत!

प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार हा सुदृढ लोकशाहीचा गाभा आहे. आधुनिक युगात आपली मते/विचार मांडण्यासाठी ' सोशल मीडिया ' सर्वोत्तम साधन ठरतेय. देशातील बहुसंख्य नागरिक सोशल मीडियाच्या विभिन्न प्लॅटफॉर्मचा वापर करतात. Instagram, Facebook, X (Twitter) ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली माध्यमे आहेत. दोन आयामांच्या आधारे या विश्लेषणाची मांडणी करूया. पहिल्या आयामानुसार या माध्यमांवर वापरकर्ते आपली मते, विचार, माहिती, जीवन-शैली इतरांशी शेअर करतात. थोडक्यात पहिला आयाम माध्यमांची सकारात्मकता दर्शवितो.  याच्या अगदी विपरीत दुसरा आयाम. याच समाज माध्यमांचा आधार घेऊन समाजात भेदभाव अथवा दुभंग निर्माण केला जातो. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या जातात. लवकर प्रसिध्दी, Views मिळविण्याकरिता अश्लील कंटेंट सर्रासपणे शेअर केल्या जाते. दुसरा आयाम माध्यमांची नकारात्मकता उघडकीस आणतो. इंस्टा, फेसबुक अथवा यूट्यूब वरील ' Reels/Shorts ' यावर भारतीय जनतेचा/तरुणांचा भला-मोठ्ठा वेळ व्यतीत होत आहे.  या ' मानसिक व्यसनातून ' आपण तातडीने सुटका करायला हवी. सोशल मीडियाचा मर्यादित आणि योग्य वापरा...

58. विकासाच्या वाटेवरील भारत!

COVID-19 च्या लसीकरणामुळे तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढलेेय का? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. कोविड-19 ची लागण असलेल्या 18 ते 45 वयोगटातील निरोगी तरुणांचा आकस्मिकपणे 'हृदयविकाराच्या झटक्याने ' मृत्यू होत आहे. होणारे मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे होत आहे की नाही, हे तपासणारा अभ्यास " भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद " (The Indian Council of Medical Research) ने केलाय. संशोधनानुसार -  झालेले आकस्मिक मृत्यू कोविड-19 च्या लसीमुळे झालेले नाहीत. याउलट लसीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. हे ठळकपणे ICMR ने नोंदवले आहे.  कोविडची तीव्र (Severe) लागण, धूम्रपान, मद्यपान (Binge Drinking), अतिव्यायाम/शारीरिक श्रम (Intense Physical Activity) या कारणांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे ICMR ने नमूद केले आहे. दक्षतेबाबत - ज्यांना पूर्वी गंभीर कोविड संसर्ग झालाय त्यांनी एक ते दोन वर्षे जास्त शारीरिक श्रमासह कोणतेही काम करू नये. हा केंद्रीय आरोग्य मंत्रीने दिलेला सल्ला लक्षात घेऊन धूम्रपान, मद्यपान, अतिव्यायाम आपण टाळायला हवा..! ~ सचिन विलास बोर्डे 14/1 The Indian Council of Medical Resea...