Posts

Showing posts with the label Cancer

148. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 34/3 मध्ये आपण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला होता. आजच्या लेखातून " दारू अथवा मद्यपानाच्या " सेवनाने होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया... भारताची स्थिती - केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या "राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey- NFHS -5)" नुसार, देशातील 22% पुरुषांना आणि 1% स्त्रीयांना दारूचे व्यसन असल्याचे दिसते. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, तेलंगणा या राज्यांत दारूचे व्यसन असणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवाल दर्शवित असला तरी, दारू पिणाऱ्यांची संख्या इतरही राज्यात आहेच. स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक छळांच्या प्रकरणांत 71% प्रकरणांमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या छळास ' मद्यपान करणारा पती ' जबाबदार असल्याचेही अहवाल अधोरेखित करतो. मद्यपानाचे/दारूचे/अल्कोहोलचे दुष्परिणाम - दारूच्या व्यसनाने यकृताचे आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोग, कर्करोग, पचनसंस्थेविषयक समस्या, मेंदू आणि मज्जासंस्थेविषयक समस्या, ताण-तणाव, इत्या...

147. विकासाच्या वाटेवरील भारत!

" तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. " हा इशारा अनेक ठिकाणी बघायला मिळतो. तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचा मानवी आरोग्यावरील हानिकारकपणा अधोरेखित करणारा इशारा आजच्या लेखातून समजून घेऊया... भारताची स्थिती - केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या " राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey- NFHS -5) " नुसार, वयोगट 15 आणि त्यावरील वयाचे 38% पुरुष आणि 9% स्त्रिया तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. ग्रामीण भागात या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शिक्षित स्त्रीपुरुषांच्या तुलनेत अशिक्षित स्त्रीपुरुषांत सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगढ, ईशान्येकडील राज्ये, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत तंबाखू सेवनाचे प्रमाण '40 टक्क्यांहून अधिक' आहे. तंबाखूचा हानिकारकपणा - 1. कर्करोग (Cancer) - तोंडाचा (Oral Cancer), घशाचा (Throat Cancer), फुफ्फुसांचा (Lung Cancer), पोटाचा (Stomach Cancer), मूत्राशयाचा (Bladder Cancer), किडनीचा (Kidney Cancer), स...

86. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण ICMR ने जारी केलेले ' खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शक तत्वे ' जाणून घेतली. ज्यातून आपल्याला पोषक आहारासाठी आवश्यक बाबी समजल्या.  जसं आहारातील अन्न-घटकात पोषक तत्वे महत्वाची, तसचं कुठल्याही अन्न-घटकात चव अन् स्वादिष्टपणा देखील महत्वाचा. याकरिताच अन्न पदार्थांत विविध " मसाल्यांचा " उपयोग केला जातो. देशात प्रामुख्याने लवंग, इलायची, मिरच्या, लसूण, आले, हळद, जिरे, कोथिंबीर इत्यादींचे उत्पादन घेतले जाते. विविध व्यापारी कंपन्या या मसाल्यांची देशांतर्गत आणि इतर देशांत विक्री करतात. अलीकडेच सिंगापूर, हाँगकाँग आणि अमेरिका या देशांनी भारतीय मसाल्यांतील घातकपणा उघडकीस आणला. भारतीय मसाले उत्पादकांनी मसाले जास्त काळ टिकण्याकरिता ' इथिलिन ऑक्साईडचा ' मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्याचे यातून समोर आले. " कॉर्सिनोजेन रसायने अथवा इथिलिन ऑक्साईडमुळे कर्करोग होतो. परिणामी हे मसाले जीवघेणे ठरू शकतात. " ही बाब इतर देशांकडून आपल्याला समजली. यातून आपल्या देशातील भारतीय मसाले मंडळ, केंद्रीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FD...