Posts

Showing posts with the label NFHS

148. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 34/3 मध्ये आपण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांचा थोडक्यात आढावा घेतला होता. आजच्या लेखातून " दारू अथवा मद्यपानाच्या " सेवनाने होणारे दुष्परिणाम जाणून घेऊया... भारताची स्थिती - केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या "राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey- NFHS -5)" नुसार, देशातील 22% पुरुषांना आणि 1% स्त्रीयांना दारूचे व्यसन असल्याचे दिसते. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, तेलंगणा या राज्यांत दारूचे व्यसन असणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे अहवाल दर्शवित असला तरी, दारू पिणाऱ्यांची संख्या इतरही राज्यात आहेच. स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात होणाऱ्या शारीरिक आणि लैंगिक छळांच्या प्रकरणांत 71% प्रकरणांमध्ये स्त्रियांवर होणाऱ्या छळास ' मद्यपान करणारा पती ' जबाबदार असल्याचेही अहवाल अधोरेखित करतो. मद्यपानाचे/दारूचे/अल्कोहोलचे दुष्परिणाम - दारूच्या व्यसनाने यकृताचे आजार, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित रोग, कर्करोग, पचनसंस्थेविषयक समस्या, मेंदू आणि मज्जासंस्थेविषयक समस्या, ताण-तणाव, इत्या...

147. विकासाच्या वाटेवरील भारत!

" तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. " हा इशारा अनेक ठिकाणी बघायला मिळतो. तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचा मानवी आरोग्यावरील हानिकारकपणा अधोरेखित करणारा इशारा आजच्या लेखातून समजून घेऊया... भारताची स्थिती - केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या 2019-21 या वर्षाच्या " राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey- NFHS -5) " नुसार, वयोगट 15 आणि त्यावरील वयाचे 38% पुरुष आणि 9% स्त्रिया तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. ग्रामीण भागात या सेवनाचे प्रमाण अधिक आहे. शिक्षित स्त्रीपुरुषांच्या तुलनेत अशिक्षित स्त्रीपुरुषांत सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगढ, ईशान्येकडील राज्ये, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांत तंबाखू सेवनाचे प्रमाण '40 टक्क्यांहून अधिक' आहे. तंबाखूचा हानिकारकपणा - 1. कर्करोग (Cancer) - तोंडाचा (Oral Cancer), घशाचा (Throat Cancer), फुफ्फुसांचा (Lung Cancer), पोटाचा (Stomach Cancer), मूत्राशयाचा (Bladder Cancer), किडनीचा (Kidney Cancer), स...

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 33/2 मध्ये आपण घरगुती हिंसाचाराच्या समस्येचा थोडक्यात आढावा घेतला. आजच्या लेखातून घरगुती हिंसाचारासंबंधीच्या केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या अहवालाचे विश्लेषण जाणून घेऊया... भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे " राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (The National Family Health Survey-NFHS) " हा अहवाल प्रकाशित केला जातो. 2019-21 या वर्षाच्या ' NFHS-5 ' या अहवालानुसार,  भारतातील 18 ते 49 वयोगटातील 29% महिला वयाच्या 15 वर्षांपासूनच ' शारीरिक हिंसाचाराला ' बळी पडलेल्या दिसतात. यातील 3% महिला गरोदर असताना शारीरिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत. वयानुसार शारीरिक हिंसाचारात वाढ दिसून येते. 18 ते 19 वयोगटातील महिलांमध्ये हे प्रमाण 16% आहे. तसेच 40 ते 49 वयोगटातील महिलांमध्ये हेच प्रमाण 32% असल्याचे दिसते. अविवाहित स्त्रियांच्या तुलनेत ' विवाहित स्त्रियांमध्ये ' शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागात शारीरिक हिंसाचाराचे प्रमाण 31% आहे आणि शहरी भागात हे प्रमाण 24 टक्के असल्याचे अहवाल नमूद करतो. 18 ते 19 वयोगटातील 6% म...

57. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात आपण बालविवाहाबद्दल थोडक्यात आढावा घेतला. त्यात बालविवाहाची दाहकता समजून घेताना 'घरगुती हिंसाचाराचा' मुद्दा अधोरेखित केला होता. अगदी मोजक्या शब्दांत घरगुती हिंसाचार (Domestic Violence) समजण्यासाठी सदरील लेख प्रस्तुत करीत आहे. 'स्त्रीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक, आर्थिक छळ/गैरवर्तन म्हणजेच घरगुती किंवा कौटुंबिक हिंसाचार होय.' मुख्यत्वे पती अथवा कुटुंबीय या छळास जबाबदार असतात. हुंडा किंवा मालमत्तेसाठी, अपेक्षित अपत्य नसल्यामुळे तसेच पतीद्वारे नशिल्या पदार्थांच्या सेवनामुळे ही हिंसा घडून येते. यामध्ये स्त्रीला मारहाण करणे, जखमी करणे, शिवीगाळ-अपमानित करणे, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (बलात्कार) करणे आणि बऱ्याचदा स्त्रियांची हत्या देखील केली जाते. त्रासाला कंटाळून स्त्री स्वतः आत्महत्येचा मार्ग देखील अवलंबिते. आये दिन याविषयीचे वृत्त्त प्रकाशित होत असतात.  अधिकृत आकडेवारी -  राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण (NFHS)-5 नुसार, देशातील 18 ते 49 वयोगटातील 30% महिला वयाच्या 15 वर्षापासून 'शारीरिक हिंसाचाराला' बळी पडल्या आहेत. तर 6% महिला त्यांच्या आयुष्...

56. विकासाच्या वाटेवरील भारत!

'बालविवाह' म्हणजेच समाजात रुजलेली मोठी समस्या. परंपरेचे अधिष्ठान देत, 18 वर्षे वय होण्याअगोदर मुला-मुलींना लग्नसंबंधात बंधिस्त केल्या जाते. कायद्याने यावर बंधने असली तरीही हा छुपा कारभार अनेक राज्यात पार पडतोय. NFHS-5 आणि UNICEF नुसार आसाम, प. बंगाल, बिहार, त्रिपुरा, झारखंड, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश ही राज्ये आघाडीवर. आर्थिक तथा शैक्षणिक मागासलेपण, गरिबी, समाजातील श्रद्धा-रूढी-परंपरा, विवाहपूर्व लैंगिक संबंधांपासून संरक्षण ई. कारणांमुळे बालविवाह होतात. कुटुंबाचा भार कमी करण्यासाठी देखील मुलींची लग्न लावली जातात.   अधिकृत आकडेवारी -  UNICEF नुसार एका वर्षात 18 वर्षाखालील 15 लाख मुलींचे बालविवाह होतात. NFHS-5 (2019-21), 20 ते 24 वयोगटातील 23% स्त्रिया 18 वर्षे वयाच्या अगोदर विवाह करतात. बालविवाहाची दाहकता - घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, कमी वयात गर्भधारणा,  शैक्षणिक वंचितता हे बालविवाहाचे फलित. उपाययोजना -    मदितीसाठी, तक्रारीसाठी ' Childline 1098 ' हा क्रमांक डायल करा. ' Prohibition of Child Marriage Act, 2006 ; Protection of Children from Sexual Of...