115. विकासाच्या वाटेवरील भारत!

"HIV अन् AIDS" बाबत जनजागृती व्हावी याकरिता 1988 पासून दरवर्षी 1 डिसेंबर हा 'जागतिक एड्स दिन' मानला जातो.

विविध माध्यमातून एचआयव्ही चा विषाणूसंसर्ग शरीरात पसरतो. फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा यासह विविध अवयवांना नुकसान पोहोचवतो, तेव्हा या स्थितीला आपण एड्स म्हणू शकतो!

UNAIDS या संघटनेने प्रकाशित केलेल्या Global AIDS Update 2023 नुसार जागतिक पातळीवर भारताने एड्स वर नियंत्रण मिळविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भारताची स्थिती -
India HIV Estimations 2023 नुसार भारतात 2.5 दशलक्षाहून अधिक लोकांना एचआयव्ही ची लागण झाल्याचे दिसते. नवीन एचआयव्ही संसर्गाची लागण होणाऱ्या रुग्णाच्या संख्येत 2010 च्या तुलनेत 37% ने घट झालेली दिसते. भारतामधे एचआयव्ही चा प्रसार असुरक्षित लैंगिक तथा समलैंगिक संबंध आदी मुख्य कारणांमुळे होतो. 15 ते 49 वयोगटात याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते.

उपाययोजना - 
'राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO), राज्य पातळीवर एड्स नियंत्रण संस्था (SACS), राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम (NACP)' ह्या सरकारी योजना/आस्थापना याविषयीची दखल घेतच असतात. 
योग्य उपचार (अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी -ART), कंडोम चा वापर तसेच याविषयीची जनजागृती, सोबतच खाजगी आस्थापनाद्वारे उचलेली पाऊले यातून एड्सची स्थिती आटोक्यात आणणे सुलभ होईल.

नागरिकांनीही 'माझे आरोग्य-माझा हक्क अन्
माझी सुरक्षा-माझी जबाबदारी' या सूत्राचे पालन करायलाच हवे. जेणेकरून एचआयव्ही/एड्स ला नियंत्रित करण्याकडे भारताची वाटचाल गतिमान होईल..!


~ सचिन विलास बोर्डे

27/2

Acquired Immune Deficiency Syndrome-AIDS | Human Immunodeficiency Virus-HIV | EndAIDS | World AIDS Day 2024 | Antiretroviral Therapy - ART | 

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!