108. विकासाच्या वाटेवरील भारत!
2027-28 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर, 2030 पर्यंत 7 ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचेल अशी गृहितके देशातील राजकारणी अन् विविध अर्थतज्ञांनी मांडलेली आहेत.
यातील काही गृहितके पूर्ण होतीलही. मात्र अर्थव्यवस्थेचा केवळ आकार वाढल्याने देशाचे मुख्य प्रश्न सुटत नाही हीच बाब नुकत्याच प्रकाशित झालेल्या यंदाच्या
"जागतिक भूक निर्देशांकातून" अधोरेखित करता येईल.
Global Hunger Index 2024 मध्ये भारताची स्थिती -
127 देशांच्या यादीत भारत 105व्या स्थानी आहे. भारताशेजारील देश पाकिस्तान 109, बांगलादेश 84,
नेपाळ 68, श्रीलंका 56 व्या स्थानी आहे.
भारतातील 'कुपोषणाचं प्रमाण 13.7' टक्के इतकं असून पाच वर्षांखालील 'बालमृत्यूचं प्रमाण 2.9' टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. थोडक्यात, भारतात भुकेचा प्रश्न चिंताजनक असल्याचं हा अहवाल अधोरेखित करतो.
(2022 आणि 2023 मधील अहवालाचे विश्लेषण अनुक्रमे लेख क्र. 1/5 आणि लेख क्र. 13/3 मध्ये केले आहे. त्याचाही आढावा वाचकांनी जरूर घ्यावा.)
भारताने भुकेचा अन् कुपोषणाचा प्रश्न सोडविण्याकरिता अनेक उपाय-योजना राबविल्या आहेत. मात्र आजही या योजनांपासून अनेकजण वंचित असल्याचे दिसते. तसेच या उपाय-योजनांच्या अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांतील भ्रष्टपणाची अनेक उदाहरणे समोर येताना दिसतात.
यावर तातडीने तोडगा काढणे क्रमप्राप्त ठरते.
देशातील नागरिकांना पुरेसे पोषण मिळाल्यावरच हे सुदृढ नागरिक अर्थव्यवस्थेस सुदृढ बनवतील. यामुळेच अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबरच सामाजिक विकासाकडेही लक्ष द्यावे लागेल..!
~ सचिन विलास बोर्डे
25/3
Global Hunger Index (GHI) 2024 | Malnutrition | Hunger | Right To Adequate Food | Child Mortality | Under-Nourishment | Social Issues | Nutrition | Health | Inclusive Economic Growth | Society | Economy
Comments
Post a Comment