69. विकासाच्या वाटेवरील भारत!
अलीकडेच शिक्षण मंत्रालयाने खाजगी कोचिंग क्लासेससाठी नियमावली जाहीर केलीय. यानुसार खाजगी क्लासेसला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत.
क्लासेसविषयी इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर अथवा प्रॉस्पेक्टसमध्ये प्रसिद्ध करावी लागणार आहे. शिक्षकांच्या पात्रते विषयीच्या तरतुदी देखील या नियमावलीत आहे. अत्यंत महत्वाचा नियम म्हणजेच, 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये नोंदणी करता येणार नाही.
मोठ-मोठ्या शहरांमध्ये आकाशाला स्पर्श करणारे होर्डिंग्ज/बॅनर क्लासेसद्वारा लावण्यात येतात. अनेकदा हे होर्डिंग्ज शैक्षणिक दिशाभूल (Mislead) करणारे असतात. भरघोस गुणांचे आमिष दाखविण्यात येते. परिणामी विद्यार्थी-पालक यास बळी पडतात. काही क्लासेस विद्यार्थ्यांना शिकविण्याचे लाखभर रुपये घेतात. थोडक्यात, शिक्षणातही महागाईने शिखर गाठल्याचे दिसते.
सरकारी शाळांतील मिळणाऱ्या 'अपुऱ्या शिक्षणाला' पर्याय म्हणून पालक खाजगी क्लासेस चा पर्याय निवडतात. नवीन नियमांद्वारे या पर्यायावर मर्यादा येत असल्याने सरकारी शाळांची स्थिती सुधारण्याकडे केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष पुरवायला हवे.
विद्यार्थ्यांच वय 16 वर्षे होईपर्यंत त्यांना सरकारी शिक्षण संस्थेद्वारे 'दर्जेदार आणि कौशल्यपूर्ण शिक्षण' उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाने पार पडायला हवी..!
~ सचिन विलास बोर्डे
16/3
Quality and Skillful Education | Private Coaching Classes | Government Schools | Ministry of Education
Comments
Post a Comment