33. विकासाच्या वाटेवरील भारत!
कलम 28 - विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.
1. पूर्णत: राज्याच्या निधीतून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत, कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.
2. धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूनेच दिलेल्या देणगीमधून वा विश्वस्त निधीतून चालणाऱ्या पण राज्याद्वारे प्रशासन केल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यास प्रतिबंध नसेल.
3. राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याकडून निधी प्राप्त करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीस तिच्या समंतीशिवाय धार्मिक शिक्षणाची सक्ती करता येणार नाही. त्यासाठी संबंधित व्यक्तीची, विद्यार्थ्यांची अथवा पालकांची परवानगी घ्यावी लागेल.
'डी. ए. व्ही. कॉलेज, जालंधर वी. पंजाब राज्य (1971)' हा सर्वोच्च न्यायालयातील खटला महत्वपूर्ण ठरतो. याद्वारे धार्मिक शिकवणीची व्याख्या करण्यात आली. 'धार्मिक शिकवण ( Religious Instruction) म्हणजेच एका विशिष्ट संप्रदाय वा पंथाची तत्वे, विधी, दृष्टिकोन, समारंभ आणि पद्धती आत्मसात करण्याकरिता सांगणे होय.'
~ सचिन विलास बोर्डे
8/2
Article 28 | Worship | Educational Institutions
Comments
Post a Comment