31. विकासाच्या वाटेवरील भारत!
विविध धर्म, जात, पंथ भारतीय समाजव्यवस्थेत पहावयास मिळतात. इतिहासकाळापासून या बाबी समाजाशी/व्यक्तीशी सलंग्न आहेत. त्यांचे उच्चाटन करणे यथायोग्य ठरणार नाही. परिणामी संविधानाने अंधश्रध्देला थारा न देता मानवाला त्याच्या धार्मिक श्रद्धा जोपासता याव्या यासाठी 'कलम 25 ते 28' प्रदान केले आहे. या तरतुदी "धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार" पुरवितात.
कलम 25 - 1. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांना बाधा न ठरता सर्व व्यक्तींना सदसदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार करण्याचा हक्क आहे.
2. राज्यसंस्था पुढील बाबीसंदर्भात कायदा करू शकते. -
a. धर्माच्या निगडित कोणत्याही आर्थिक, वित्तीय, राजकीय अथवा धार्मिकेतर कार्याचे विनियमन करणे वा त्यावर निर्बंध घालण्याबाबत कायदा करणे.
b. समाज कल्याण व सुधारणा वा सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूंतील सर्व वर्गांकरिता तसेच घटकांसाठी खुल्या करण्याबाबत तरतूद करणे.
स्पष्टीकरण 1 - कृपान धारण करणे अथवा स्वतः बरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या आचरणाचा भाग मानले जाईल.
स्पष्टीकरण 2 - उपरोक्त कलम 25 (2) (b) मध्ये हिंदू या शब्दाच्या उल्लेखामध्येही शीख, जैन वा बौद्ध धर्माचे आचरण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला आहे. हिंदू
धार्मिक संस्थांच्या उल्लेखामध्येही असाच अर्थ गृहीत धरून अन्वयार्थ लावला जाईल.
~ सचिन विलास बोर्डे
7/5
Article 25 | Conscience | Religion | Profession
Comments
Post a Comment