28. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेखात (7/1) आपण कलम 21 अंतर्गत हक्कांची व्यापकता नमूद केली...
त्यातच 86 वी घटना दुरुस्ती करून 'कलम 21 A' समाविष्ट करण्यात आले.

'कलम 21 A - 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रदान करते.'
'मोफत शिक्षण' म्हणजेच विद्यार्थी प्राथमिक शिक्षण आत्मसात करताना त्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा खर्च द्यावा लागणार नाही.

'सक्तीच्या शिक्षणाचा' अन्वयार्थ लावायचा झाल्यास, या तरतुदीद्वारे शासनावर काही कार्ये सोपविण्यात आली आहे. जी प्रभावीपणे पार पडायचं बंधन राज्यसंस्थेवर आहे. बालकांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, त्यांचा सक्तीने प्रवेश करून घेणे तसेच त्यांची शाळेतील उपस्थिती कायम असेल याची खातरजमा करणे. अशी ही कार्ये.

2009 च्या कायद्यान्वये अनुसूचित जाती आणि जमाती, सामाजिकदृष्ट्या मागास तथा दुर्बल घटक ( differently able) यांकरिता '25 टक्के' जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.

या तरतुदींच्या वास्तवातील अंमलबजावणीबाबत -
आजही अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहिलेले निदर्शनास येतात. 'ज्या वयात दप्तराचे ओझे त्याच्या पाठीवर असायला हवे होते त्या वयात ही बालके दोन-चार रुपये कमवून घरासाठी हातभार लावण्याचे ओझे अंगा-खांद्यावर घेऊन काम करीत असतात.'

पालकांना शिक्षणाचे महत्व गवसलेलं नसते अन् राज्यसंस्था, प्रशासन या तरतुदींची योग्य अंमलबावणी करीत नाही.
मोफत शिक्षण तर कल्पनाच...
'शिक्षणाचा बाजार' होताना तुम्ही-आम्ही पाहत आहोत..!

~ सचिन विलास बोर्डे

7/2

Article 21A | Right To Education | Parents

Comments

Popular Posts

141. विकासाच्या वाटेवरील भारत!

142. विकासाच्या वाटेवरील भारत!

140. विकासाच्या वाटेवरील भारत!