Posts

Showing posts with the label Three Scales of Cinema

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

हल्ली इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण अशा भारताच्या विविध आयामांना चित्रपटांतून समजून घेणं अनेकांना सोईचं झालं आहे. " चित्रपटांतून तथ्ये (Facts) समजून घेणं " कुठवर सोईस्कर ठरतं हेच आजच्या लेखातून समजून घेऊयात... भारताविषयक विविध आयाम पुस्तकांतून समजणे अनेकांना डोईजड जाते. परिणामी चित्रपटांतून मनोरंजनात्मक दृश्यांच्या अन् संभाषणाच्या साहाय्याने या आयामांचे ' मनोरंजनात्मक विश्लेषण (Entertaining Analysis )' सादर केले जाते. चित्रपटातली दृश्ये डोळ्यांना अन् चित्रपटातली संभाषणे मनाला मनमोहक वाटतात. यामुळे पुस्तकांऐवजी चित्रपटांकडे जनतेचा कल वाढलेला दिसतो. मात्र अलीकडच्या काही काळांपासून चित्रपट निर्मितीत ' नफा ' हा केंद्रबिंदू असल्याने चित्रपटांचे विषय, चित्रपटांची कथा, चित्रपटातले अभिनेते नफ्याला केंद्रस्थानी ठेऊन ठरविले जातात. परिणामी ' चित्रपटांत दर्शविलेल्या सर्वच बाबींत तथ्यांश असत नाही .' अनेकदा तथ्यावर आधारित चित्रपटांतही मनोरंजनाच्या (Entertainment) अथवा इतर हेतूने काही बाबी नव्याने घातल्या जातात किंवा काढून टाकल्या जातात. परिणामी चित्रपटा...