Posts

Showing posts with the label Media

182. विकासाच्या वाटेवरील भारत!

हल्ली इतिहास, भूगोल, अर्थकारण, राजकारण, समाजकारण अशा भारताच्या विविध आयामांना चित्रपटांतून समजून घेणं अनेकांना सोईचं झालं आहे. " चित्रपटांतून तथ्ये (Facts) समजून घेणं " कुठवर सोईस्कर ठरतं हेच आजच्या लेखातून समजून घेऊयात... भारताविषयक विविध आयाम पुस्तकांतून समजणे अनेकांना डोईजड जाते. परिणामी चित्रपटांतून मनोरंजनात्मक दृश्यांच्या अन् संभाषणाच्या साहाय्याने या आयामांचे ' मनोरंजनात्मक विश्लेषण (Entertaining Analysis )' सादर केले जाते. चित्रपटातली दृश्ये डोळ्यांना अन् चित्रपटातली संभाषणे मनाला मनमोहक वाटतात. यामुळे पुस्तकांऐवजी चित्रपटांकडे जनतेचा कल वाढलेला दिसतो. मात्र अलीकडच्या काही काळांपासून चित्रपट निर्मितीत ' नफा ' हा केंद्रबिंदू असल्याने चित्रपटांचे विषय, चित्रपटांची कथा, चित्रपटातले अभिनेते नफ्याला केंद्रस्थानी ठेऊन ठरविले जातात. परिणामी ' चित्रपटांत दर्शविलेल्या सर्वच बाबींत तथ्यांश असत नाही .' अनेकदा तथ्यावर आधारित चित्रपटांतही मनोरंजनाच्या (Entertainment) अथवा इतर हेतूने काही बाबी नव्याने घातल्या जातात किंवा काढून टाकल्या जातात. परिणामी चित्रपटा...

140. विकासाच्या वाटेवरील भारत!

कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ हे लोकशाहीचे तीन प्रमुख स्तंभ. त्यात चौथ्या स्तंभाचा समावेश अलीकडच्या काही काळापासून केला जातोय. हा चौथा स्तंभ म्हणजेच " मुक्त अन् स्वतंत्र माध्यमे(Media) ." माध्यमांना ' Print Media ' आणि ' Electronic किंवा Broadcasting Media ' या दोन प्रकारांत वर्गीकृत करता येतं. प्रिंट मिडियात वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके इत्यादींचा समावेश होतो. तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियात रेडिओ, टेलिव्हिजन वर प्रसारित होणाऱ्या वृत्तवाहिन्या, आणि प्रसारणाच्या इतर माध्यमांचा समावेश होतो. लोकशाहीच्या तीनही स्तंभावर देखरेख ठेवणं, या तिन्ही स्तंभाचा कार्यकारभार सामान्यांपर्यंत पोहोचवणं, शासन आणि शासितांमध्ये दुवा साधणं, महत्वाच्या सामाजिक मुद्द्यांची चर्चा घडवून आणणं, शासनाच्या जबाबदाऱ्या/उत्तरदायित्व याकडे लक्ष पुरवणं इत्यादी लोकशाहीच्या रुजवणीसाठी आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या चौथ्या स्तंभाने पार पडायला हव्या. मात्र हल्ली ही माध्यमे आपल्या जबाबदाऱ्यांपासून भरकटलेली दिसताय. माध्यमांच्या मुक्ततेवर अन् स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाताय. 2025 च्या ...