166. विकासाच्या वाटेवरील भारत!
मागील लेख क्र. 38/4 मध्ये आपण "वासना (Lust)" या विषयाचे चिकित्सक विश्लेषण बघितले. आजच्या लेखातून उर्वरित मुद्द्यांची चर्चा करूया...
वासनेच्या उत्पत्तीला आपण 'नैसर्गिक' आणि 'कृत्रिम'
या दोन घटकांत वर्गीकृत केले होते. नैसर्गिकरीत्या हार्मोन्सच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या लैंगिक इच्छेस मर्यादा होत्या. मात्र हल्लीच्या मानवजातीने अश्लील साहित्यांचा आधार घेऊन लैंगिक इच्छेस 'अमर्याद' आणि 'कृत्रिम' स्वरूप दिले आहे.
याच अमर्याद लैंगिक इच्छांमुळे 'लैंगिक गुन्हेगारी (Sexual Offenses)' चा जन्म होतोय. विनयभंग, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मानवी तस्करी इत्यादी स्वरूपातले गुन्हे घडताय.
मानवजातीचा 'विवेक (Reason) अन् नैतिकता (Morality)' नष्ट झाल्याचा हा परिणाम.
हे गुन्हे दिवसेंदिवस नवनवे रूपे घेताना दिसताय. परिणामी लैंगिक गुन्हेगारीला आटोक्यात आणण्याकरिता वासनेला अन् लैंगिक इच्छेला मर्यादा घालाव्या लागतील. सोबतच मानवी विवेक अन् नैतिकता विकसित करावी लागेल.
देशाच्या भविष्याला आकार देणाऱ्या शाळा, महाविद्यालये इत्यादींसारख्या शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये
'लैंगिक शिक्षणाचा' अंतर्भाव व्हायला हवा. अन् या लैंगिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात "वासनेवर अन् लैंगिक इच्छांवर नियंत्रण" आणि "नैतिकतेचा विकास" हे दोन घटक आवर्जून शिकवायला हवे.
केंद्र आणि सर्व राज्यांच्या राज्य शासनाने या विषयावर तोडगा काढायला हवा. कृत्रिमरीत्या लैंगिक इच्छा जागविणाऱ्या अश्लील साहित्यांच्या नियमनाकडे लक्ष पुरवायला हवे. नागरिकांनीही अमर्याद वासनेच्या भुताला आता डोक्यातून काढायला हवं, हेच आवाहन या लेखाच्या माध्यमातून मी करू इच्छितो..!
~ सचिन विलास बोर्डे
38/5
Lust | Sexual Desire | Hormones | Artificial Arousal | Human Psychology | Science | Uncontrolled Desire | Sex Education | Human Development | Awareness | Criminality | Moral Conscience | Morality | Behavioral Science | Conscience | Reason | Wisdom
Comments
Post a Comment