Posts

Showing posts with the label NOV25

166. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 38/4 मध्ये आपण " वासना (Lust) " या विषयाचे चिकित्सक विश्लेषण बघितले. आजच्या लेखातून उर्वरित मुद्द्यांची चर्चा करूया... वासनेच्या उत्पत्तीला आपण ' नैसर्गिक ' आणि ' कृत्रिम ' या दोन घटकांत वर्गीकृत केले होते. नैसर्गिकरीत्या हार्मोन्सच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या लैंगिक इच्छेस मर्यादा होत्या. मात्र हल्लीच्या मानवजातीने अश्लील साहित्यांचा आधार घेऊन लैंगिक इच्छेस ' अमर्याद ' आणि ' कृत्रिम ' स्वरूप दिले आहे. याच अमर्याद लैंगिक इच्छांमुळे ' लैंगिक गुन्हेगारी (Sexual Offenses) ' चा जन्म होतोय. विनयभंग, लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार, बलात्कार, मानवी तस्करी इत्यादी स्वरूपातले गुन्हे घडताय. मानवजातीचा ' विवेक (Reason) अन् नैतिकता (Morality) ' नष्ट झाल्याचा हा परिणाम. हे गुन्हे दिवसेंदिवस नवनवे रूपे घेताना दिसताय. परिणामी लैंगिक गुन्हेगारीला आटोक्यात आणण्याकरिता वासनेला अन् लैंगिक इच्छेला मर्यादा घालाव्या लागतील. सोबतच मानवी विवेक अन् नैतिकता विकसित करावी लागेल. देशाच्या भविष्याला आकार देणाऱ्या शाळा, महाविद्यालये इत्यादींसा...

165. विकासाच्या वाटेवरील भारत!

' भावना (Emotions) आणि इच्छा (Desires) ' या मानवाच्या जडणघडणीत उल्लेखनीय कार्य करतात. इच्छांची पूर्तता मानवाची भावना शमविण्याचे कार्य करते. समजा, " वासना (Lust) " या इच्छेची पूर्तता झाली की मानवाची आनंदाची भावना पूर्ण होते. परिणामी भावनांच्या पूर्ततेसाठी मानव इच्छा पूर्ण करण्यावर जोर देतो.  ' वासना ' अथवा ' लैंगिक इच्छा ' ज्यास इंग्रजीत ' Lust ' अथवा ' Sexual Desire (Libido) ' म्हणतात. ही इच्छा मानव आणि प्राणी या दोन्ही घटकांत दिसून येते. विज्ञानानुसार या इच्छेची उत्पत्ती शरीरातील ' संप्रेरके (Hormones) ' यामुळे होते. Testosterone, Estrogen, Dopamine ही काही मूलभूत संप्रेरके यांस कारणीभूत मानले जातात. थोडक्यात वासना ही नैसर्गिकरित्या मानवी शरीरात निर्माण होणारी बाब आहे असे विज्ञान सांगते. प्राण्यांमध्ये वासनेच्या इच्छेला मर्यादा असल्याचे दिसते. मात्र मानवांमध्ये हीच इच्छा दिवसेंदिवस ' अमर्याद ' होतेय. ' आनंद देणाऱ्या गोष्टींचा कायम पाठलाग करणे ' हा मानवाचा गुणधर्म आहे. वासना या इच्छेची पूर्तता शारीरिक अन् मानसिक...

164. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच पार पडलेल्या " बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल " एक-दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला.  बिहारच्या निवडणुका अन् निवडणुकांचे निकाल आजच्या लेखातून समजून घेऊयात... विधानसभेच्या एकूण 243 जागांपैकी 202 जागांवर National Democratic Alliance (NDA) चा विजय बघायला मिळाला. तसेच महागठबंधनच्या वाटेला 35 जागा आलेल्या दिसताय.  निवडणूक आयोगानुसार बिहारमध्ये 67.13% मतदान झाल्याचे समजते. (1951 सालानंतरचा हा आजवरचा सर्वात मोठा आकडा समजला जातोय.) यापैकी 62.98% पुरुष मतदार आणि 71.78% महिला मतदारांनी मते नोंदवल्याचे दिसते. कायमच अविकसित गणल्या गेलेल्या बिहारच्या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. विविध मतदारसंघात अटी-तटीची लढत दिसून आली. थोड्या-बहुत फरकाने अनेक उमेदवारांची हार-जीत देखील बघायला मिळाली. निवडून आलेल्या उमेदवारांच्या हाती आता बिहारच्या विकासाची दोर असेल. यामुळेच येणाऱ्या काळात नागरिक राजकारणापासून फारकत न घेता राजकारणाच्या प्रक्रियेत मोठ्या टक्क्याने सहभागी होतील तसेच येणाऱ्या पाच वर्षांकरिता आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण आपल्या विजयी उमेदवारांना जबाबदार धराल याच...

163. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाने " स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self Governance Institutions) " निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. येणाऱ्या दोन डिसेंबरला या निवडणुका राज्यात घेतल्या जातील. त्यानुषंगाने सदरील लेख प्रकाशित करीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीतील अत्यंत महत्वाची पातळी समजली जाते. या संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा लोकशाही प्रक्रियेशी थेट सहसंबंध येतो. परिणामी ' लोकशाहीच्या अन् सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी ' स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वपूर्ण ठरतात. ' ग्रामीण (Rural) आणि शहरी (Urban) ' अशा दोन विभागांत स्थानिक स्वराज्य संस्थांची विभागणी केली जाते. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशी संरचना बघायला मिळते. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती अशा स्वरूपाची रचना दिसते. शहराच्या आणि गावाच्या स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा, रस्ते, नाले, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्याचे व्यवस्थापन,...

162. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 37/4 मध्ये आपण वायू प्रदूषणाबाबत माहिती घेतली. आजच्या लेखातून " जल प्रदूषण (Water Pollution) " समजून घेऊयात... सुमारे चार अब्ज (4 Billion) वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली. पाण्यात रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्यातूनच सजीव उत्पत्तीस आले. पुढे विविध टप्प्यांतून उत्क्रांत होऊन या सजीवांनी आजवरचा विकास गाठला. थोडक्यात, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ' उत्पत्तीसाठी ' पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा ठरला. 29% जमीन अन् 71% पाणी अशी पृथ्वीची रचना. या 71 टक्के पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी मानवाच्या उपयोगाचे आहे. उर्वरित 97% पाणी हे खारे असल्याने मानवी उपयोगात येत नाही. या 3 टक्के पाण्यापैकी 69% भाग बर्फ, हिमनद्यांनी, 30% भाग भुजलाने आणि केवळ 1% भाग तलाव, नद्यांनी व्यापलेला आहे. हेच 1% पाणी वापरण्याजोगे असल्याने या 1% पाण्यातूनच पृथ्वीवरील मानव प्रजातीला आपली पाण्याची गरज भागवावी लागते. या 1% पाण्यातही बाह्य पदार्थ, विषारी घटक मिसळल्याने हे पाणी प्रदुषित होते. गावांतून, शहरांतून, औद्योगिक कारखान्यांतून येणारे सांडपाणी; कचरा, प्लास्टिक; शेतीतील खते, कीटकन...