161. विकासाच्या वाटेवरील भारत!
शालेय अभ्यासक्रमात विज्ञानाच्या पुस्तकात 'प्रदूषण' हा घटक अंतर्भूत केलेला असतो. या घटकांतर्गत प्रदूषणाचे विविध प्रकार शाळेत शिकविले जातात. प्रदूषणाच्या विविध प्रकारांपैकी "वायू प्रदूषण (Air Pollution)" हा एक महत्वाचा प्रकार मानला जातो. याच वायू प्रदूषणाची उजळणी (Revision) आजच्या लेखातून करूया...
वायू (Gases), जलबाष्प (Water Vapor) आणि धूलिकणांच्या (Dust Particles) मिश्रणातून पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती होते. या वातावरणात 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि 1% आरगॉन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन इत्यादी वायू समाविष्ट असतात.
वाहनांतून आणि औद्योगिक कारखान्यांतून तसेच कोळसा, लाकूड, कचरा अन् फटाक्यांच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुराने आणि जंगलतोड वाढल्याने Carbon Monoxide (CO), Sulfur Dioxide (SO2), Nitrogen Oxides आणि Particulate Matter (PM 2.5) सारख्या सूक्ष्म कणांचे प्रमाण वातावरणात वाढत जाते.
याचा एकंदरित दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीव जीवसृष्टीवर आणि पर्यावरणावर होतो. बहुतांश देश वायू प्रदूषणास जबाबदार आहेत. परिणामी या सर्व देशांनी मिळून या समस्येकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहेच.
भारताने वायू प्रदूषणाला नियंत्रित करण्याकरिता राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपाययोजनांची आखणी केलेली आहे. देशातील नागरिकांनीही वातावरण प्रदुषित होणार नाही याचे भान ठेवायला हवे. कारण शुद्ध वातावरण अन् शुद्ध प्राणवायू हा पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाचा 'नैसर्गिक मूलभूत अधिकार' आहे..!
~ सचिन विलास बोर्डे
37/4
Air Pollution | Atmosphere | Environment | Pollution Control | Science | Education | Awareness | Deforestation | Environmental Protection | Climate Change | Air Quality | Natural Rights | Fundamental Rights | Natural Fundamental Rights
Comments
Post a Comment