Posts

Showing posts with the label OCT25

161. विकासाच्या वाटेवरील भारत!

शालेय अभ्यासक्रमात विज्ञानाच्या पुस्तकात ' प्रदूषण ' हा घटक अंतर्भूत केलेला असतो. या घटकांतर्गत प्रदूषणाचे विविध प्रकार शाळेत शिकविले जातात. प्रदूषणाच्या विविध प्रकारांपैकी " वायू प्रदूषण (Air Pollution) " हा एक महत्वाचा प्रकार मानला जातो. याच वायू प्रदूषणाची उजळणी (Revision) आजच्या लेखातून करूया... वायू (Gases), जलबाष्प (Water Vapor) आणि धूलिकणांच्या (Dust Particles) मिश्रणातून पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती होते. या वातावरणात 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि 1% आरगॉन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन इत्यादी वायू समाविष्ट असतात. वाहनांतून आणि औद्योगिक कारखान्यांतून तसेच कोळसा, लाकूड, कचरा अन् फटाक्यांच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुराने आणि जंगलतोड वाढल्याने Carbon Monoxide (CO), Sulfur Dioxide (SO2), Nitrogen Oxides आणि Particulate Matter (PM 2.5) सारख्या सूक्ष्म कणांचे प्रमाण वातावरणात वाढत जाते. याचा एकंदरित दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीव जीवसृष्टीवर आणि पर्यावरणावर होतो. बहुतांश देश वायू प्रदूषणास जबाबदार आहेत. परिणामी या सर्व देशांनी मिळून या समस्येकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहेच. भ...

160. विकासाच्या वाटेवरील भारत!

" नक्षलवाद " ही भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठे आव्हान असल्याचं आपण बऱ्याचदा ऐकतो. आणि अलीकडेच एका मोठ्या नक्षली नेत्याने त्याच्या सहकाऱ्यांसमवेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शरणागती पत्करल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. छत्तीसगढ, झारखंड, ओरिसा, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील आदिवासीबहुल अविकसित डोंगराळ प्रदेशात नक्षलवादी चळवळी कार्यरत असलेल्या दिसतात. या भागाला ' रेड कॉरिडॉर ' या नावे ओळखले जाते. या चळवळी सशस्त्र उठाव अन् हिंसेच्या माध्यमांतून केंद्र अथवा राज्यांच्या शासनाकडे आपल्या मागण्या मांडतात. यासाठी सामान्य नागरिकांची या चळवळीत भरती केली जाते. नक्षलवादाच्या प्रश्नाची सोडवणूक ' बंदुकीने किंवा विचाराने ' अशा दोन पर्यायांनी करता येऊ शकते. बंदुकी हाती असलेले नक्षलवादी सुरक्षा यंत्रणेला ओळखता येतील. सुरक्षा यंत्रणा त्यांच्यावर गोळ्या झाडतीलही, मात्र ज्यांच्या हाती शस्त्रे नाहीत अशांना ओळखणे कठीण आहे. यामुळेच विचारांचा दुसरा पर्याय अवलंबणे गरजेचे ठरते. नक्षलवाद ही बंदुकीच्या गोळीने सं...

159. विकासाच्या वाटेवरील भारत!

अलीकडेच भारत देशाच्या " सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला " झाल्याचे आपण सर्वांनी बघितले. एका हिंदू मूर्तीच्या जीर्णोद्धाराच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता वकिलाने सरन्यायाधीशावर बूट फेकला. या स्वरूपातले हे प्रकरण आहे. सरन्यायाधीशाच्या वक्तव्याने ' धर्माचा अपमान ' झाला असे स्वरूप या प्रकरणाला दिले गेले. त्यात सरन्यायाधीश ' अनुसूचित जाती ' समूहातले. त्यामुळेच अपमानाचा बदला एकमेकांवर चपला-बुटे फेकून घेता येऊ शकतो ही युक्ती या ' अक्कलशून्य वकिलाने ' शोधली. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींची वर्तवणूक कशी नसायला हवी याचे हे वकील महोदय सर्वोत्तम उदाहरण. मंदिर, मशीद, विहार, चर्च, गुरुद्वारे इत्यादींच्या जीर्णोद्धाराच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करणारेही तत्त्वज्ञानीच म्हणावे लागतील. देशाची राज्यघटना ' धर्मनिरपेक्षता ' शिकविते. ज्याचा अर्थ धर्माचे आचरण, प्रचार-प्रसार ही बाब व्यक्तीची खासगी बाब असेल. या तत्वाचा विसर पडला की जीर्णोद्धाराच्या याचिका न्यायालयात दाखल केल्या जातात. मूर्तींच्...

158. विकासाच्या वाटेवरील भारत!

नमस्कार वाचकांनो..! "जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।" यातूनच प्रेरणा घेत तीन वर्षांपूर्वी म्हणजेच दिनांक ' 02 OCTOBER 2022 ' रोजी " विकासाच्या वाटेवरील भारत! " या संकल्पनेचा प्रारंभ केला होता. आज या संकल्पनेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या लेखमालेतून संवैधानिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रासंबधित शेकडो विषयांवर मी तार्किक, चिकित्सक अन् विश्लेषणात्मक लेखन सादर करीत आलोय. आपणही चार ते पाच मिनिटे वेळ वाचनासाठी देताय ही बाब देखील मला प्रेरणा देणारी ठरतेय. 'प्रकाशित केलेले लेख कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलेले अथवा राजकारण करू पाहणारे मुळीच नाही. शासनाचे अनेक ध्येय-धोरणे उल्लेखनीय असतात तर काही धोरणे गफलतीची असू शकतात. तीच बाब समाजाला देखील लागू होते. समाजातही अनेक योग्य-अयोग्य बाबींचे मिश्रण असते. योग्य बाबींना/धोरणांना संमती देणे आणि अयोग्य बाबींवर/धोरणांवर टीका करणे, हीच भूमिका मी घेतलीय.' प्रकाशित लेखांबद्दल - या तीन वर्षांच्या काळात सातत्याने प्रत्य...