Posts

Showing posts with the label Environment

162. विकासाच्या वाटेवरील भारत!

मागील लेख क्र. 37/4 मध्ये आपण वायू प्रदूषणाबाबत माहिती घेतली. आजच्या लेखातून " जल प्रदूषण (Water Pollution) " समजून घेऊयात... सुमारे चार अब्ज (4 Billion) वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली. पाण्यात रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्यातूनच सजीव उत्पत्तीस आले. पुढे विविध टप्प्यांतून उत्क्रांत होऊन या सजीवांनी आजवरचा विकास गाठला. थोडक्यात, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या ' उत्पत्तीसाठी ' पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा ठरला. 29% जमीन अन् 71% पाणी अशी पृथ्वीची रचना. या 71 टक्के पाण्यापैकी केवळ 3 टक्के पाणी मानवाच्या उपयोगाचे आहे. उर्वरित 97% पाणी हे खारे असल्याने मानवी उपयोगात येत नाही. या 3 टक्के पाण्यापैकी 69% भाग बर्फ, हिमनद्यांनी, 30% भाग भुजलाने आणि केवळ 1% भाग तलाव, नद्यांनी व्यापलेला आहे. हेच 1% पाणी वापरण्याजोगे असल्याने या 1% पाण्यातूनच पृथ्वीवरील मानव प्रजातीला आपली पाण्याची गरज भागवावी लागते. या 1% पाण्यातही बाह्य पदार्थ, विषारी घटक मिसळल्याने हे पाणी प्रदुषित होते. गावांतून, शहरांतून, औद्योगिक कारखान्यांतून येणारे सांडपाणी; कचरा, प्लास्टिक; शेतीतील खते, कीटकन...

161. विकासाच्या वाटेवरील भारत!

शालेय अभ्यासक्रमात विज्ञानाच्या पुस्तकात ' प्रदूषण ' हा घटक अंतर्भूत केलेला असतो. या घटकांतर्गत प्रदूषणाचे विविध प्रकार शाळेत शिकविले जातात. प्रदूषणाच्या विविध प्रकारांपैकी " वायू प्रदूषण (Air Pollution) " हा एक महत्वाचा प्रकार मानला जातो. याच वायू प्रदूषणाची उजळणी (Revision) आजच्या लेखातून करूया... वायू (Gases), जलबाष्प (Water Vapor) आणि धूलिकणांच्या (Dust Particles) मिश्रणातून पृथ्वीच्या वातावरणाची निर्मिती होते. या वातावरणात 78% नायट्रोजन, 21% ऑक्सिजन आणि 1% आरगॉन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन इत्यादी वायू समाविष्ट असतात. वाहनांतून आणि औद्योगिक कारखान्यांतून तसेच कोळसा, लाकूड, कचरा अन् फटाक्यांच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुराने आणि जंगलतोड वाढल्याने Carbon Monoxide (CO), Sulfur Dioxide (SO2), Nitrogen Oxides आणि Particulate Matter (PM 2.5) सारख्या सूक्ष्म कणांचे प्रमाण वातावरणात वाढत जाते. याचा एकंदरित दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीव जीवसृष्टीवर आणि पर्यावरणावर होतो. बहुतांश देश वायू प्रदूषणास जबाबदार आहेत. परिणामी या सर्व देशांनी मिळून या समस्येकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहेच. भ...

157. विकासाच्या वाटेवरील भारत!

लडाखमध्ये होणाऱ्या उपोषण आणि मागण्यांविषयी 07 एप्रिल 2024 ला मी ' लेख क्र. 19/1 ' प्रकाशित केला होता. त्या लेखात ' सोनम वांगचुक ' आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागण्या आपण लक्षात घेतल्या होत्या. अन् त्या मागण्या योग्य असल्यास शासनाने त्यावर निर्णय घ्यावा हेही मी नमूद केले होते. त्या मागण्या अपूर्ण राहिल्याने हे आंदोलन पुन्हा उभे केले गेले. मात्र या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने आंदोलनाच्या अग्रभागी असलेल्या सोनम वांगचुक यांना दोन दिवसांपूर्वी अटक केली गेली. अन् लडाख पुन्हा चर्चेत आला. ' राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली ' झालेल्या अटकेनंतर सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांच्याविषयक अनेक आरोप-प्रत्यारोप लावले जाताहेत. लडाखच्या मागण्यांचा मुख्य मुद्दा मागे पडून सोनम वांगचुक हे देशविरोधी असल्याचं चित्र रंगवलं जातय. 'आंदोलनकर्त्यांनी लडाख भारतातून वेगळा करण्याची मागणी केलेली नाही.' ही अतिमहत्वाची बाब आपण लक्षात घ्यायला हवी. जमिनीच्या, संस्कृतीच्या, भाषेच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लडाखला ' सहाव्या परिशिष्टात ' समाविष्ट करावे, लडाखला ' स्वतंत्र राज्या...

156. विकासाच्या वाटेवरील भारत!

16 सप्टेंबर हा दिवस ' जागतिक ओझोन दिन (World Ozone Day) ' या अर्थाने लक्षात ठेवला जातो. यानुषंगाने पृथ्वीच्या अस्तित्वासाठी " ओझोनचं महत्व " आजच्या लेखातून समजून घेऊया. ओझोनचा अर्थ अन् महत्व - ऑक्सिजनचे तीन अणू मिळून ओझोनचा एक रेणू तयार करतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 15 ते 50 किलोमीटर वर आढळणाऱ्या स्थितांबर (Stratosphere) या थरात पृथ्वीच्या अवतीभोवती ओझोनचे आवरण आढळते. त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू, अंधत्व तसेच पिकांना आणि सागरी जीवसृष्टीला नुकसानकारक असणारे ' Ultraviolet (UV), UV-B ' ही किरणे ओझोनोमुळे शोषली जातात. थोडक्यात, हानिकारक अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण ओझोनच्या थरामुळे शक्य होते. ओझोनचा ऱ्हास - मानवी प्रगतीसाठी पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचे मनसोक्त शोषण करण्याचा गुणधर्म मानवाने आजपर्यंत जपलेला आहे. याच गुणधर्मातून Chlorofluorocarbons (CFCs), Halons, Carbon Tetrachloride, Methyl Chloroform, Methyl Bromide, Hydrobromofluorocarbons (HBFCs) इत्यादी मानवनिर्मित रसायनांच्या साह्याने मानवाने यंत्रे-तंत्रे अन् विविध वस्तू बनविल्या. आता हीच ...

132. विकासाच्या वाटेवरील भारत!

पृथ्वीच्या वातावरणात 21% ऑक्सिजन असल्याचं विज्ञान सांगत. मानव-प्राण्याच्या अस्तित्वासाठी हा ऑक्सिजन वायू अत्यंत महत्त्वाचा. ऑक्सिजनच्या निर्मितीत " जंगले/वने/Forest " मोठी भूमिका बजावतात. झाडे, वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषतात अन् ऑक्सिजन बाहेर सोडतात. थोडक्यात, वनांनी मानवाच्या उत्क्रांतीत ' प्राणवायूची भूमिका ' बजावली. श्वास घेण्यासाठी प्राणवायू पुरवला, पोटाची भूक शमविण्यासाठी फळे पुरविली. (वनांनी केलेल्या या उपकाराच्या जाणीवेतूनच वनांची पूजा (Worship) आजही अनेक ठिकाणी केली जाते.) इतिहासकाळातील मानवाकडे मर्यादित गरजा अन् अमर्याद संसाधने होती. आधुनिकतेकडे वाटचाल होत असताना लोकसंख्येत वाढ होत गेली मात्र संसाधनांची त्यातुलनेत वाढ झाली नाही. परिणामी ' अमर्याद गरजा अन् मर्यादित संसाधने ' हा पेचप्रसंग निर्माण झाला. हा पेच सोडविण्याकरिता अन् मानवी गरजा पूर्ण करण्याकरिता आधुनिक मानवाने यंत्र-तंत्राच्या विकासावर भर दिला. यंत्र-तंत्राच्या विकासातून मोठ-मोठे शहरे विकसित झाली. या शहरांत गरजा भागविणारे उद्योग, कारखाने, कंपन्या स्थापन झाल्या. मात्र ' मानवा...

119. विकासाच्या वाटेवरील भारत!

नोव्हेंबर 2024 मध्ये UNICEF या आंतरराष्ट्रीय संस्थेचा " The State of the World's Children 2024 " नामक अहवाल प्रकाशित झाला होता. या अहवालाने अधोरेखित केलेल्या काही ठळक बाबी आपण समजून घेऊया. अहवालानुसार -  2050 या वर्षापर्यंत भारतात लहान मुलांची संख्या 35 कोटी असेल. इतर देशांच्या तुलनेत जागतिक पातळीवर भारताचा मुलांच्या लोकसंख्येतील वाटा 15 टक्के असेल. यामुळेच भारताला लहान मुलांच्या रक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.  पर्यावरण आणि हवामान बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर, शिक्षणावर आणि अन्न-पाण्यासारख्या जीवनावश्यक स्त्रोतांवर होतो. 2050 पर्यंत लहान मुलांना तीव्र हवामान आणि विविध पर्यावरणीय संकटाना सामोरे जावे लागेल तसेच 2000 च्या तुलनेत जवळपास आठ पट जास्त मुले अतिउष्णतेच्या लाटेला सामोरे जातील असेही हा अहवाल नमूद करतो. आफ्रिकेसारख्या कमी संसाधने अन् कमी उत्पन्न असलेल्या देशांत पर्यावरणीय संकटाची तीव्रता अधिक असते. अशा देशात सर्वाधिक मुलांची संख्या असेल. यामुळेच अशा देशांना तातडीने उपाय-योजना आखाव्या लागतील. Children’s Climate Risk Index (CCRI) 2021 मध्ये भारत 163 देशांमध्...

80. विकासाच्या वाटेवरील भारत!

गेल्या काही दिवसांत " लडाखमधील " पर्यावरण कार्यकर्ते आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते ' सोनम वांगचुक ' आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाची चाहूल कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. आपल्या मागण्या पूर्ण होण्याकरिता तब्बल 21 दिवसांचे उपोषण त्यांनी केले. ' कलम 370 ' रद्द केल्याने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. लडाखची तब्बल 90 टक्के लोकसंख्या ही ' अनुसूचित जमातींची ' असल्याने आदिवासी क्षेत्रांच्या संरक्षणासाठीची घटनात्मक तरतूद असलेल्या ' 6 व्या परिशिष्टात ' समावेशाची मागणी सुरुवातीपासून बघायला मिळते. मात्र तिची अद्यापही पूर्तता न झाल्याने लडाखवासियांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. जमिनीच्या, संस्कृतीच्या, भाषेच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी लडाखला सहाव्या परिशिष्टात समाविष्ट करावे, लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे शक्य नसल्यास तेथे दिल्लीसारखी विधानसभा स्थापन करावी, लेह आणि कारगिलमध्ये लोकसभेचे स्वतंत्र मतदारसंघ स्थापन करावे, लडाख मधील तरुणांना नोकऱ्या मिळण्याकरिता स्वतंत्र लोकसेवा आयोगाची स्थापना करावी, अशा प्रमुख मागण्या मांडल्या जात आहे...

39. विकासाच्या वाटेवरील भारत!

जगभरात सतत पर्यावरणीय बदल पहावयास मिळत आहे. हेच बदल नैसर्गिक आपत्तीचे रूप धारण करीत आहे. जसे उष्णतेच्या लाटा (Heat Wave), चक्रीवादळे (Cyclones), ज्वालामुखीय उद्रेक, भूकंप, त्सुनामी, भूस्खलन (Landslide), मोठ-मोठ्या जंगलांना आगी लागणे (Forest Fire), दुष्काळ, इत्यादी... या आपत्ती नैसर्गिक जरी जाणवल्या तरी कुठे ना कुठे मानवाचे योगदान यामध्ये आहे. अगदी 'आदिम काळापासून' मानव निसर्गाचा उपभोग घेत आलायं... त्याकाळी मर्यादित गरजा अन् अमर्याद साधने होती. आत्ताच्या 'उत्तर-आधुनिक' जगाचा विचार केला तर मानवाच्या गरजा वाढल्या आणि संसाधने अपुरी पडली. यातून सुटका करण्यासाठी मानवाने विविध यंत्र-तंत्रांचा शोध लावला. हीच यंत्रे आज पर्यावरणाची राखरांगोळी करायला निघाली. यातील काही परिचित यंत्रांचा आपण रोज उपयोग करतो. जसे वाहने, घरातील AC, Refrigerator इत्यादी. यातून अनेक असदृष्य वायू बाहेर पडतात. जे वायुप्रदूषण म्हणून ओळखले जाते. हा एक आयाम. अशाच प्रकारे मानव विविध प्रकारचे प्रदूषण करतोय.  प्रश्न उपस्थित होतो, येणाऱ्या पिढीसाठी संसाधने उरतील काय..? विविध देशांनी आणि भारताने निर्मिलेल्या ...